मुंबई - राज्यात कोरोनाचा रुग्ण संख्या चढ-उतार दिसून येत आहे. ( Corona Patients in Maharashtra ) राज्यात आज (मंगळवारी) 39 हजार 207 नवे रुग्ण आढळून आले. ( Maharashtra Corona Update on 18 January ) त्यापैकी 53 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णदेखील 2 लाख 67 हजार इतके आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रोनने दिलासा दिला आहे. आज एकही रुग्ण आढळून आलेला नाही, ( Zero Omicron Patient in Maharashtra ) अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात डोके वर काढलेल्या कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत चढ उतार दिसून येत आहेत. सोमवारी 31 हजार 111 रुग्णांची नोंद झाली होती. आज आठ हजार रुग्णांची यात भर पडली आहे. त्यामुळे आजची रुग्ण संख्या 39 हजार 207 इतकी झाली आहे. त्यापैकी 53 रुग्ण दगावले आहेत. राज्यातील मृत्यूदर १.९४% एवढा आहे. तर 38 हजार 824 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 68 लाख 68 हजार 816 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९४.३२% एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी २३ लाख २० हजार ३६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७२ लाख ८२ हजार १२८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,४४,९१९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,९६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 67 हजार 659 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
राज्यात आज ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. रविवारी 8 रुग्ण तर सोमवारी 122 रुग्ण सापडले होते. 1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 93 हजार 484 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 92 हजार 247 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 563 आणि इतर देशातील 652 अशा एकूण 1215 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 5080 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 80 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत आज पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले, 'इतक्या' जणांचा झाला मृत्यू
- विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 6149
ठाणे - 522
ठाणे मनपा - 1231
नवी मुंबई पालिका - 1290
कल्याण डोबिवली पालिका - 567
मीरा भाईंदर - 375
वसई विरार पालिका - 446
नाशिक - 891
नाशिक पालिका - 1585
अहमदनगर - 829
अहमदनगर पालिका - 536
पुणे - 2219
पुणे पालिका - 6398
पिंपरी चिंचवड पालिका - 2962
सातारा - 1006
नागपूर मनपा - 1934
- ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - 656
पुणे मनपा - 582
पिंपरी चिंचवड - 114
नागपूर - 116
सांगली - 59
मीरा भाईंदर - 52
ठाणे मनपा - 40
पुणे ग्रामीण - 46
अमरावती - 25
कोल्हापूर, औरंगाबाद - 19
पनवेल - 18
सातारा - 14
नवी मुंबई - 13
उस्मानाबाद, अकोला - 11
कल्याण डोंबिवली - 7
बुलढाणा, वसई - विरार - 6
भिवंडी मनपा - 5
अहमदनगर - 4
नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर - 3 प्रत्येकी
गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर - 2 प्रत्येकी
रायगड, भंडारा आणि वर्धा - प्रत्येकी 1