कोल्हापूर - कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने लहान मुलांना होणार्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या/विद्यार्थ्यांच्या शिक्षकांशी व पालकांशी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील संवाद साधणार आहेत. या मार्गदर्शन सत्रासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शासकीय व खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षिका व बालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाइन उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या ऑनलाइन बैठकीला हे आमदार जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व सी.पी.आर. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख आदी उपस्थित राहणार आहेत.
#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - undefined
10:39 May 30
06:01 May 30
मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शनिवारी राज्यात 20 हजार 295 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 57 लाख 13 हजार 215 इतकी झाली आहे. राज्यात शनिवारी 31 हजार 964 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली. याबरोबरच राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 53 लाख 39 हजार 838 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 443 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
TAGGED:
corona Live News