महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - corona Update Live

corona Update Live
राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स

By

Published : Jun 6, 2021, 6:31 AM IST

Updated : Jun 6, 2021, 9:47 AM IST

09:46 June 06

देशातील कोरोनाची आकडेवारी -

एकूण रुग्णसंख्या - 2,88,09,339

एकूण बरे झालेले - 2,69,84,781

एकूण मृत्यू : 3,46,759  

सक्रिय रुग्ण : 14,77,799  

एकूण लसीकरण - 23,13,22,417

09:45 June 06

देशात मागील 24 तासांत 1,14,460 नविन बाधितांची नोंद करण्यात आली. तर 1,89,232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबरोबरच 2677 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

06:25 June 06

24 तासांत 300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

तीन महिन्यात शनिवारी प्रथमच सर्वात कमी 13 हजार 659 कोरोना रुग्णांचे निदान झाले. 10 मार्च 2021ला शनिवारी आढळले इतकेच रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 लाख 19 हजार 224 इतकी झाली आहे. याबरोबरच राज्यात शनिवारी 21 हजार 776 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 55 लाख 28 हजार 834 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

06:25 June 06

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात शनिवारी प्रथमच 95 टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी राज्यात 13 हजार 659 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Last Updated : Jun 6, 2021, 9:47 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details