मुंबई - कोरोनाचा विषाणू म्युटेंट होत आहे, म्हणजेच ती बदलत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ''डेल्टा प्लस" समोर आला आहे. जे अधिक भयानक आहे. त्यातच, प्रसार माध्यमांमध्ये राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचे 7 रुग्ण सापडले असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. त्यातले 5 रुग्ण रत्नागिरीचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, डेल्टा प्लस या व्हेरियंटचा एकही रुग्ण राज्यात सापडला नसल्याचे राज्याचे वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनी सांगितले आहे.
#MHCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर... - corona maharashtra live
![#MHCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर... maharashtra corona update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12197018-thumbnail-3x2-k.gif)
20:58 June 20
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही - डॉ. तात्याराव लहाणे
16:08 June 20
कोरोनाची तिसरी लाट : अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत लहान मुलांचे कक्ष
रायगड -कोरोनाची दुसरी लाट ही काही प्रमाणात जिल्ह्यात आटोक्यात आली आहे. दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत असताना तिसरी कोरोनाची लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या लाटेत मुलांना लागण झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात सीएफटीआय या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी अद्ययावत आयसीयू युनिट तयार करून दिले आहे. यात एक कोटी रुपयांचे अत्याधुनिक यंत्र सामुग्रियुक्त 15 बेड उपलब्ध आहेत.
15:15 June 20
मुंबईत २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण
मुंबई -केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २१ तारखेपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू होणार आहे. त्यानुसार यात टप्पे पाडून लसीकरण केले जाईल. विशेषतः सुपरस्प्रेडरना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. तसेच गुरुवार ते शनिवार या दिवशी नोंदणीकृत लोकांचे लसीकरण केले जाते. त्या दिवशी काही प्रमाणात वॉक इन लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
10:59 June 20
रुग्ण बरे होण्याचा दर - 96.27%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांच्या खाली
सध्याच्या पॉझिटिव्हिटी दर - 3.43%
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर - 3.22%
10:57 June 20
देशातील कोरोनाची सद्यस्थिती -
एकूण रुग्णसंख्या -2,98,81,965
एकूण बरे झालेले रुग्ण -2,87,66,009
एकूण मृत्यू -3,86,713
एकूण सक्रिय रुग्ण - 7,29,243
लसीकरण -27,66,93,572
10:54 June 20
मागील 24 तासांत देशात 58,419 नविन कोरोनाबाधितांची नोंद करणयात आली आहे. मागील 81 दिवसांतील 60 हजारपेक्षा कमी ही रुग्णसंख्या आहे. तर याबरोबरच 87,619 जणांनी डिस्चार्ज देण्यात आला. तसेच 1576 बाधितांचा मृत्यूची नोंद करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
06:16 June 20
महाराष्ट्र कोरोना अपडेट्स
मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत आहे. राज्यात शनिवारी नविन 8912 कोरोना रुग्णांची भर पडली असून 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी 10373 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 132597 सक्रिय रुग्ण असून 5710356 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.76 टक्के एवढे झाले आहे.