महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Congress Leaders Silent Satyagraha: दिल्लीत काँग्रेसच्या पक्ष श्रेष्टींच्या बैठकीनंतर...मुंबईत मौन आंदोलनात काँग्रेस नेत्यांमध्ये एकोप्याचे दर्शन - मुंबईत मौन सत्याग्रह

दिल्लीमध्ये मंगळवारी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीस राहुल गांधी देखील हजर होते. या बैठकीनंतर बुधवारी कॉंग्रेसच्यावतीने मुंबईत मौन सत्याग्रह करण्यात आला. त्यामध्ये काँग्रेस नेत्यामध्ये एकी असल्याचे चित्र दिसले.

congress leaders silent Satyagraha
कॉंग्रेस नेत्यांची बैठक

By

Published : Jul 13, 2023, 9:03 AM IST

मुंबई :भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात केलेले सूडबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई पक्षाच्या वतीने एक दिवशीय मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलन ठिकाणी काँग्रेस पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांनी अंतर्गत गटबाजी बाजूला ठेवून काँग्रेस पक्षातील नेत्यांचे एकोप्याचे दर्शन झाले.

दिल्लीत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची पक्ष श्रेष्टींनी घेतलेल्या बैठकीचा परिणाम बुधवारी झालेल्या काँग्रेस आंदोलनात पाहायला मिळाला. मात्र, येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस-पवार सरकार विरोधात अधीकच आक्रमक होऊ शकतो. फक्त माध्यमांसमोर आम्हीच एकसंघ असल्याचे सांगून दिल्लीश्वरांचे आदेश किती पाळले जातात, हे येणारा काळच ठरविणार आहे.

काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी :राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पायउतार होऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. महविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शिंदे फडणवीस सरकार जनतेच्या प्रश्नावर टार्गेट करत होते. शिंदे फडणवीस सरकार विरोधातील महाविकास आघाडीची वज्रमूठ अधिकच घट्ट करण्याचे काम सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून सत्तेत बसला. काँग्रेस पक्षात फूट पडणार का? यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.


दिल्लीतील बैठकीचा परिणाम :राज्यातील काँग्रेस पक्षात गेल्या एक वर्षांपासून प्रदेश अध्यक्ष पदावरून गटबाजी सुरू आहे. त्यातच काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीचा धसका काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी घेतला. त्यानंतर राज्यातील सर्वच महत्वाच्या नेत्यांची बैठक घेतली. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन, वेणू गोपालराव, माजी खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पक्षाचे माजी 3 मुख्यमंत्री बैठकीत 25 पेक्षा जास्त नेते उपस्थित होते. अनेक विषयावर चर्चा झाल्याचे समजते. जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर द्या, अंतर्गत गटबाजी थांबवा अशा प्रकारे काहींची कानउघडणी केल्याची चर्चा सुरू आहे. पक्षात फूट पडल्यामुळे विधानसभेतील काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष नेतापदाचा प्रबळ दावेदार बनला आहे. त्या दृष्टिकोनातून विजय वडेट्टीवार यांच्या नावावर चर्चा झाल्याची समजते.

हेही वाचा :

  1. Congress Satyagraha Against BJP: भाजप विरोधात काँग्रेसचा मुंबईत एकदिवसीय मौन सत्याग्रह, गांधी पुतळा परिसरामध्ये काँग्रेस पक्षाची बॅनरबाजी
  2. Balasaheb Thorat On CM : मंत्रिमंडळ खातेवाटपावरून बाळासाहेब थोरातांची शिंदेंवर टीका
  3. Dr Sujay Vikhe Patil: संसदेत पहिल्या टर्मच्या उत्कृष्ट १० खासदारांमध्ये डॉ. सुजय विखे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details