मुंबई - भाजप सरकारने अनेक भूलथापा लोकांना दिल्या आहेत. देशासह राज्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक उद्योग बंद पडत असून, जिकडे तिकडे मंदीचे वातावरण आहे. हे सरकारचे अपयश आता जनतेच्या समोर येत असल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.
३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख अर्ज, बेरोजगारीवरून काँग्रेसचा भाजपवर निशाणा - मंदीचे वातावरण
भाजप सरकारने अनेक भूलथापा मारल्या आहेत. देशासह राज्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सरकारचे अपयश आता जनतेच्या समोर येत असल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.
![३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख अर्ज, बेरोजगारीवरून काँग्रेसचा भाजपवर निशाणा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4220957-thumbnail-3x2-jjhhh.jpg)
काँग्रेसचा भाजपवर निशाणा
महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीटरच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे. १० कोटी रोजगार, मुद्रा योजनेतून स्वयंरोजगार, ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था या आणि अशा अनेक भूलथापा या सरकारने लोकांना दिल्या आहेत. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी दर्जाच्या पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. ३२ हजार नोकऱ्यांसाठी ३२ लाख तरुणांचे अर्ज आले आहेत. साधारणपणे एका जागेसाठी १०० अर्ज आले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.