मुंबई -दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला की, लगेच भाजप सरकारने खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. दिल्लीचा निकाल लागताच भाजप सरकारने सर्वसामान्यांना माहागाईचा करंट दिला असल्याचे म्हणत महाराष्ट्र काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.
घरघुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १५० रुपयापर्यंत वाढ झाली आहे. देशातील विविध शहरात ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. याच मुद्यावरुन महाराष्ट्र काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. दिल्ली विधानसभेत भाजपचा दारुन पराभव झाला आहे. येथील विधानसभेचा निकाल लागताच भाजपने त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
हेही वाचा- सिंचन घोटाळा प्रकरणी ७ गुन्हे दाखल, बडे अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात
हेही वाचा- रत्नागिरी: मनसे पाठोपाठ भाजपनेही केले बांग्लादेशींना लक्ष्य; गैरसमज पसरवत असल्याचा दावा
विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सरकारी कंपनी इंडियन ऑईलने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची (एलपीजी) किंमत १५० रुपयांनी वाढविली आहे. हे दर आजपासून (बुधुवार) लागू होणार आहेत. एलपीजी सिलिंडरचे दर १ जानेवारी २०२० पासून वाढवण्यात आले नव्हते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार दिल्लीत इंडेन गॅसची किंमत ८५८.५० रुपये (१४४.५० रुपयांची दरवाढ) असणार आहे. कोलकात्यात गॅस सिलिंडरची किंमत ८९६. रुपये (१४९ रुपयांची दरवाढ), मुंबईत ८२९.५० (१४५ रुपयांची दरवाढ) रुपये सिलिंडरची किंमत आहे. चेन्नईत १४७ रुपयांनी सिलिंडरची किंमत वाढून ८८१ रुपये झाली आहे.