मुंबई -देशात लॉकडाऊनच्या परिस्थितीतही महाराष्ट्र राज्यातील जनतेला नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकांचा वर्षाव होत आहे. ठाकरे यांच्या ट्विटरवर 'Thanks_Uddhav_Thackeray' हे ट्रेंड होत आहे. या ट्रेंडमध्ये उध्दव ठाकरे हे पहिल्या क्रमांकावर आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जिंकतायत लोकांची मने - ट्विटर ट्रेंड्स
ठाकरे यांच्या ट्विटरवर 'Thanks_Uddhav_Thackeray' हे ट्रेंड होत आहे. या ट्रेंडमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पहिल्या क्रमांकावर आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात लोकांची मने जिंकत असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. सध्या ट्विटरवर त्यांना धन्यवाद देणारे ट्वीट हे ट्रेंड होत आहे. 'थँक्स उद्धव ठाकरे' अशाप्रकारचे ट्विट हे सध्या ट्रेंडींगवर असून राज्यातीलच नव्हे तर देशभरातील जनतेचे त्यांनी मन जिंकल्याचे यावरुन दिसून येते. फेक आणि बनावट खाते उघडून ट्रेंड करणाऱ्या लोकांना ट्विटरवर महाराष्ट्रच्या जनतेने उत्तर दिलं असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिक व्यक्त करत आहेत.