महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार अधिकृत आमदार, दुपारी एक वाजता घेणार शपथ - Uddhav Thackeray to take oath as MLC today

गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले ठाकरे विधानसभेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. 28 मेपर्यंत त्यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने त्यांना सभासद होणे बंधनकारक होते. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले असते.

Uddhav Thackeray to take oath as MLC today
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार अधिकृत आमदार

By

Published : May 18, 2020, 9:43 AM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेले नऊ नवनिर्वाचित सदस्य आज दुपारी 1 वाजता शपथ घेतील. ठाकरे यांची 14 मे रोजी विधानसभेवर बिनविरोध निवड झाल्याने सत्ताधारी महाविकासआघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले ठाकरे विधानसभेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. 28 मेपर्यंत त्यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने त्यांना सभासद होणे बंधनकारक होते. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले असते.

उद्धव ठाकरेंच्या रुपात ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती आमदार झाली आहे. याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. ते सध्या पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आहेत. दरम्यान, सध्या विधानभवनावर ठाकरे यांच्याशिवाय आठ सदस्य निवडून आले आहेत. यात शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपचे रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details