महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना ई़डीचे समन्स; 26 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश - Sitaram Kunte got ed summons news

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबई पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसंदर्भात काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठविले आहे.

Maharashtra Chief Secretary Sitaram Kunte
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे

By

Published : Nov 24, 2021, 4:19 PM IST

Updated : Nov 24, 2021, 7:36 PM IST

मुंबई -राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबई पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसंदर्भात काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठविले आहे. त्यांना 25 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांच्या नियुक्त्या आणि बदल्यांसंदर्भात सक्तवसुली संचालनालय चौकशी करत आहे.

तपासात महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता...

मुंबई पोलीसचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपानंतर गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले. शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा धक्कादायक अहवाल दिला होता. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आणि त्यांच्या पोस्टींगसाठी मध्यस्थांमार्फत लाचेचा मुद्दा समोर आला. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सीतीराम कुंटे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती मिळू शकते म्हणूनच त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत. त्यांची कस्टडी 29 नोव्हेंबरला संपणार आहे. तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्याने त्यांना हजर राहणार शक्य नाही त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Corona Third Wave : महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर, सौम्य स्वरूपाची असेल - राजेश टोपे

Last Updated : Nov 24, 2021, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details