महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, चर्चा मात्र होणार सरकारवर झालेल्या आरोपांची?

परमबीर सिंग यांच्या व्यतिरिक्त डी जी संजय पांडे हेही पदोन्नती मध्ये डावलले गेल्याने नाराज आहेत. त्यामुळे त्यांनीही राज्यसरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यसरकारमध्ये अधिकारीच सरकारच्या विरोधात उभे राहिले आहेत का? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

By

Published : Mar 24, 2021, 10:57 AM IST

मुंबई- आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी तीन वाजता मंत्रालयात पार पडणार आहे. सध्या राज्यसरकारवर झालेले आरोप पाहता बैठकीनंतर त्या सर्व मुद्यावर चर्चा होणार आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुखांविरोधात मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रानंतर राज्यसरकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

परमबीर सिंग यांच्या व्यतिरिक्त डी जी संजय पांडे हेही पदोन्नती मध्ये डावलले गेल्याने नाराज आहेत. त्यामुळे त्यांनीही राज्यसरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यसरकारमध्ये अधिकारीच सरकारच्या विरोधात उभे राहिले आहेत का? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ही राज्यात भारतीय जनता पक्षासाठी काम करणारे काही अधिकारी कार्यरत असून त्या अधिकाऱ्यांना बाजूला केले गेले पाहिजे, असा सूर उमटला होता.

काँग्रेसच्या अहवालावरही चर्चा होणार-

काही अधिकारी जाणून बुजून भारतीय जनता पक्षाला मदत होईल असे काम करत आहेत, असा मत प्रवाह काँग्रेस बैठकीत समोर आला होता. त्यामुळे या बाबतही बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारवर परमबीर सिंग यांनी लावलेले आरोप, तसेच सचिन वाझेंमुळे राज्यसरकरची मलिन झालेली प्रतिमा याचा काँग्रेसकडून एक अहवाल दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला पाठवण्यात आला आहे. त्या अहवालावर देखील बैठकीनंतर औपचारिक चर्चा होऊ शकते.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये बाबत चिंता-

राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महानगरात तर रोजच रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळत आहे. मुंबईत तर कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. तसेच मुंबईची वाढती रुंग संख्या पाहता मुंबई लोकल बाबत कडक पावले उचलावी लागणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यामुळे आज मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई लोकल बंद करण्याच्या मुद्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details