महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाते वाटपाला राज्यपालांची मंजुरी... आज होणार अधिकृत घोषणा? - गृहमंत्री

सहा दिवसांच्या नाराजीनाट्यानंतर आज अखेर खातेवाटप अंतिम करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादीला मंजुरी देत ही यादी राज्यपालांकडे पाठविली आहे. खातेवाटपात महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. खातेपाटपात अपेक्षेप्रमाणे गृह,अर्थ, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, उत्पादन शुल्क कामगार अशी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत.

ठाकरे सरकारच्या खाते वाटपाची यादी जाहीर
ठाकरे सरकारच्या खाते वाटपाची यादी जाहीर

By

Published : Jan 5, 2020, 7:19 AM IST

Updated : Jan 5, 2020, 8:41 AM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होऊन महिना आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटूनही मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर न झाल्याने मंत्र्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला होता. तर यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप यादीला हिरवा कंदील दाखवला आहे. या यादीला मंजूरी देत त्यांनी मंत्र्यांच्या खात्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. आज (रविवार) सकाळी खातेवाटपाला राज्यपालांनीही मंजूरी दिली आहे. त्यामुळे खातेवाटपाची अधिकृत घोषणा रविवारी होण्याची शक्यता आहे.

सहा दिवसांच्या नाराजीनाट्यानंतर आज अखेर खातेवाटप अंतिम करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादीला मंजुरी देत ही यादी राज्यपालांकडे पाठविली आहे. खातेवाटपात महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. खातेपाटपात अपेक्षेप्रमाणे गृह,अर्थ, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, उत्पादन शुल्क कामगार अशी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत. महसूल खाते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले असून, अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्याचे समजते. तर नितीन राऊत यांना ऊर्जा खाते देण्यात आल्याचे समजते.

अधिकृत घोषणा नाही

मंत्रिमंडळाचे खातेवाटप मुख्यमंत्र्यांकडून मान्यतेसाठी राजभनवकडे पाठविले जाते. राज्यपालांनी त्याला मान्यता दिल्यावर फाईल मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा येते. त्यानंतर राजपत्रात नावे व खाती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू होते. खातेवाटपाची यादी सायंकाळी राजभवनकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत अधिकृतपणे यादी प्रसिद्ध झाली नव्हती.


शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री-

  • उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन व कायदा-सुव्यवस्था
  • एकनाथ शिंदे - नगरविकास, एमएसआरडीसी
  • सुभाष देसाई - उद्योगमंत्री
  • संजय राठोड - वनमंत्री
  • शंकरराव गडाख - जलसंधारण
  • अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य
  • उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण
  • आदित्य ठाकरे - पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार
  • दादा भुसे - कृषी मंत्रालय
  • संदीपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन

राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्री

  • अजित पवार - उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री
  • अनिल देशमुख - गृहमंत्री
  • जयंत पाटील - जलसंपदा मंत्री
  • छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
  • दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क
  • धनंजय मुंडे - सामाजिक न्यायमंत्री
  • नवाब मलिक - अल्पसंख्याक मंत्री
  • बाळासाहेब पाटील - सहकारमंत्री
  • जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण मंत्री
  • हसन मुश्रीफ - ग्रामविकास मंत्री
  • राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य

काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री-

  • बाळासाहेब थोरात - महसूलमंत्री
  • अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
  • नितीन राऊत - ऊर्जामंत्री
  • वर्षा गायकवाड - शालेय शिक्षणमंत्री
  • के.सी. पाडवी - आदिवासी विकासमंत्री
  • अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
  • विजय वडेट्टीवार - मदत व पुनर्वसन, खार जमीन
  • यशोमती ठाकूर - महिला व बालविकास मंत्री
  • अस्लम शेख - बंदर विकास, वस्त्रोद्योग, मत्स्य संवर्धन
  • सुनील केदार - दुग्धविकास आणि पशुसंवर्धन

ठाकरे सरकारचे राज्यमंत्री

  • शंभुराजे देसाई - गृहराज्यमंत्री (ग्रामीण), अर्थ, वाणिज्य
  • सतेज पाटील - गृहराज्यमंत्री (शहर)
  • बच्चू कडू - जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री
  • राजेंद्र येड्रावकर - आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक राज्यमंत्री
  • दत्तात्रय भरणे - जलसंधारण राज्यमंत्री
  • अदिती तटकरे - उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
  • संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
  • प्राजक्त तनपुरे - नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री
  • विश्वजीत कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री
  • अब्दुल सत्तार - महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री
Last Updated : Jan 5, 2020, 8:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details