मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. दुपारी 1 वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
LIVE UPDATES :
- राजेंद्र येड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली
- प्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- आदिती तटकरे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रण भरणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- डॉ. विश्वजीत कदम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
- अमित विलासराव देशमुख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- सतेज पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- आदित्य ठाकरेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- राष्ट्रवादीच्या शंकरराव गडाखांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- के. सी. पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- शिवसेना नेते अनिल परब यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- संदीपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- शिवसेना आमदार संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- वर्षा गायकवाड यांना शपथ घेताना राज्यपालांनी रोखले
- नवाब मलिक यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- सुनिल केदार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
- राष्ट्रवादीचे माजी महसूल, शिक्षण, आरोग्य मंत्री राहिलेले राजेंद्र शिंगणेंनी मंत्रिपदाची घेतली शपथ
- वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
- विजय वडेट्टीवर यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- अनिल देशमुख यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
- परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडेंनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
- 01.07 PM - अशोक चव्हाणांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- 01.04 PM - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
- 01.01 PM - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शपथविधी सोहळ्यासाठी आगमन, थोड्याच वेळात 36 मंत्र्यांचा शपथविधी
- 12.15 PM - ठाकरे पिता-पुत्र विधानभवनाकडे रवाना, थोड्याच वेळात 36 मंत्र्यांचा शपथविधी
काँग्रेसमधून कोणाला संधी - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ
- 10.12 AM - आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळात वर्णी
- 10.09 AM - अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
- 10.08 AM - मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांचं खातेवाटपही आजच जाहीर होण्याची शक्यता