मुंबईMaharashtra Cabinet Decisions Today : शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते.
राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन होते. अशा स्थितीत अडचणीत सापडलेल्या सहकार कारखान्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दुसरीकडे राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्यानं पोलिसांसमोर आव्हानं वाढली आहेत. सायबर गुन्ह्यांचा तपास करणे व त्यांना शोधून पीडितांना मदत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासत आहे. सायबर गुन्हेगारी ही जगातील सर्वात मोठी संघटित गुन्हेगारी म्हणून वाढत सायबर फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळात सायबर सुरक्षेच्या निधीला मंजूर दिलीय.
हे आहेत मंत्रिमंडळातील महत्त्वाचं निर्णय
- मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
- मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
- राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प ( 837 crore cyber security project ) हाती घेण्यात येणार आहे.
- आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँक शिखरकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. हे कर्ज एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात उपलब्ध करण्यात येणार आहे.
- केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सवलत देण्यात येणार आहे.
- मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आलीय.
सायबर प्रकल्पाचे असे असणार स्वरुप-
- नागिरकांना २४ तास कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर तक्रार नोंदविता येणार आहे.
- अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांच्या तक्रारीचा तपास केला जाईल.
- गुन्ह्याचा मूळापर्यंत जाऊन गुन्हा उघड करणे व गुन्हा सिद्ध करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.
- सायबर गुन्ह्यांचे गुंतागुंतीचे स्वरूप पाहून राज्याला एक ‘सायबर सुरक्षित’ राज्य बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधनांनीयुक्त अशा प्रकल्पाची आखणी केली आहे.
- एकाच छताखाली कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स, सर्ट महाराष्ट्र, क्लाऊड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांचा समावेश असणार आहे.
- राज्याभरातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयांमधील सर्व सायबर पोलीस ठाणी या प्रकल्पाशी जोडण्यात येणार आहेत.
9 दिवस मुंबईत मुंबईत आंतरराष्ट्रीय महोत्सव होणार साजरा-मुंबईत आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी जानेवारी महिन्याचा 3 रा शनिवार ते 4 था रविवार असे एकूण 9 दिवस आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव लोकसहभागातून सातत्याने सुरु राहावा म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाऊंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष असणार आहे. याशिवाय यामध्ये सचिन तेंडूलकर, हर्ष जैन, अमिताभ चौधरी, रॉनी स्क्रूवाला, पार्थ सिन्हा, निरजा बिर्ला हे मान्यवर असणार आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आजपासून अनुदानाचं वाटप-राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आजपासून अनुदान मिळणार आहे. हे अनुदान दिलासा १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी मिळणार आहे. ३५० रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटींचे अनुदान वितरित होणार आहे. या अनुदान वितरणाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं.
हेही वाचा-
- Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक आक्रमक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत रात्री उशिरा 'खलबतं'
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; उपमुख्यमंत्र्यांची आंदोलकांसोबत चर्चा