महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Salary Of Gram Sevak : ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल १० हजारांची वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय - ग्रामसेवकांचे वेतन

महाराष्ट्र सरकारने ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. सध्या कंत्राटी ग्रामसेवकांना 6 हजार रुपयांचे वेतन आहे.

Mantralay
मंत्रालय

By

Published : Jun 13, 2023, 3:50 PM IST

मुंबई : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा दिला गेला आहे. या बैठकीत ग्रामसेवकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ होणार असून त्यांचे वेतन आता 16 हजार रुपये होणार आहे.

अनेक वर्षापासूनची मागणी : ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. आता त्यांच्या वेतनात थेट 10 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. सध्या कंत्राटी ग्रामसेवकांना 6 हजार रुपयांचे वेतन आहे. आता त्यात वाढ झाल्याने ते थेट 16 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे.

ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक : ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक ही दोन्ही पदे एकच असून दोघांची कामे सुद्धा सारखीच आहेत. फरक फक्त इतकाच आहे की, ग्रामसेवक म्हणून एकदा रुजू झाल्यावर 3 वर्षांचा कालावधी हा कंत्राटी असतो. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर नियमित ग्रामसेवक होतो. तसेच कंत्राटी ग्रामसेवक यांना मानधन कमी असते, पण नियमित झाल्यावर त्यांना वेतन श्रेणी नुसार वेतन मिळते.

मंत्रिमंडळात घेण्यात आलेले इतर महत्त्वाचे निर्णय :

  • सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. 1500 कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता.
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.
  • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली.
  • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
  • पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.
  • अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
  • मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृह योजना.
  • स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली.
  • चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.

हे ही वाचा :

  1. Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळणार का? शिंदे सरकारवर वाढता दबाव..
  2. राज्य सरकारचे दबावतंत्र! एकीकडे मागण्यांबाबत आश्वासन; दुसरीकडे 75 हजार कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्तीचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details