मुंबई - मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली.
'मुंबई २४ तास' योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी - आदित्य ठाकरे - Aaditya Thackeray Mumbai 24 tas
मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.
रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकेच नाही. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकाने सुरू ठेवणे बंधनकारक नसून हे प्रत्येकावर अवलंबून असेल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.