महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maha Budget Session Live Updates: काद्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी - महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन दुसरा दिवस

Maharashtra Budget Session 2023 Second Day Live Updates Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Aaditya Thackeray Ambadas Danve
महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरा दिवस.. पहा सर्व लाईव्ह अपडेट्स

By

Published : Feb 28, 2023, 9:36 AM IST

Updated : Feb 28, 2023, 4:57 PM IST

16:56 February 28

काद्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज कांद्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी आक्रमक झालेल्या विरोधकांनी नाफेडमार्फत कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले.

16:45 February 28

कांदा प्रश्नावरून विरोधक आक्रमक; चर्चेची केली मागणी

मुंबई - कांदा प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अधिवेशनात चर्चेची मागणी केली आहे.

13:13 February 28

पत्रकार वारिसेंच्या हत्येप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी चर्चा सुरु

  • पत्रकार वारीशे हत्या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी चर्चा सुरु
  • कडक कायदा करण्याची सुनील प्रभूंची मागणी
  • वारिसे प्रकरणात एसआयटीवर दबाव नको: अजित पवार

11:17 February 28

कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरु.. चुकीचं असेल तर हक्कभंग आणा : देवेंद्र फडणवीस

  • २ लाख क्विंटल कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरु.. चुकीचं असेल तर हक्कभंग आणा : देवेंद्र फडणवीस
  • कांदा निर्यातीवर बंदी नाही : मुख्यमंत्री शिंदे
  • विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

11:15 February 28

कांद्याच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ

सरकार कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी: मुख्यमंत्री शिंदे

आमचं सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार

11:15 February 28

कांदा उत्पादक शेकऱ्यांसाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी: विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

कांदा उत्पादक शेकऱ्यांसाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी: विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

11:11 February 28

अमरावतीत हरभरा उत्पादक शेकऱ्यांवर लाठीचार्ज झाला: नाना पटोले

अमरावतीत हरभरा उत्पादक शेकऱ्यांवर लाठीचार्ज झाला: नाना पटोले

हे सरकार व्यापाऱ्यांसाठी चालत का?

11:05 February 28

कांद्याच्या निर्यातीला परवानगी द्यावी: छगन भुजबळ

लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक: छगन भुजबळ

अनेक देशांमध्ये कांद्याचा तुटवडा

नाफेडने कांदा उचलला पाहिजे

11:02 February 28

सरकारने कांद्याची खरेदी करावी : अजित पवारांची विधानसभेत मागणी

कांदा दराच्या प्रश्नावर तोडगा काढा: अजित पवारांची विधानसभेत मागणी

  • सरकारनं कांद्याची खरेदी करावी

11:01 February 28

माजी मंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद

अनिल देशमुख, माजी मंत्री पत्रकार परिषद

विदर्भ असो नाहीतर मराठवाडा कापसाचे उत्पादन काढणारे शेतकरी अडचणीत आहेत. कापसाचे दर घसरले आहेत. कापसाची आयात केली गेली याचा फटका बसला. निर्यात वाढवली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, पण सरकार करत नाही. आयात थांबवली जात नाही तोपर्यंत दिलासा मिळणार नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा. 30 लाख गाठी कापसाची निर्यात झाली. राज्य शासनाने धोरण जाहीर करावे आणि कापूस उत्पादकाना दिलासा द्यावा.

10:08 February 28

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु

09:56 February 28

विधानभवनाच्या गेटवर विरोधकांनी आणले कांदे.. कांद्यासह कापसाच्या भावावरून जोरदार घोषणाबाजी

विधानभवनाच्या गेटवर विरोधकांनी आणले कांदे.. जोरदार घोषणाबाजी

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांचं आंदोलन

महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांचा आंदोलनात सहभाग

कांद्याच्या माळा घालत सरकारचा निषेध

09:31 February 28

महाविकास आघाडीच्या नेत्यांची १० वाजता महत्त्वाची बैठक

महाविकास आघाडीच्या नेत्यांची १० वाजता महत्त्वाची बैठक

09:25 February 28

ठाकरे तळीरामांचं सरकार चालवत होते का? आशिष शेलार यांचा सवाल

आशिष शेलार पत्रकार परिषद

ठाकरे तळीरामांचं सरकार चालवत होते का? आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरे गटाला कुणाची मान्यता आहे?

राज्यात फक्त शिवसेना आहे.

दिल्लीतील घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत..

उद्धवजींची मनःस्थिती समजू शकतो.

ठाकरे गट कायदेशीर नाही

09:20 February 28

Maha Budget Session Live Updates

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहावयास मिळू शकतो. दोन्ही बाजूंनी आरोप - प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

Last Updated : Feb 28, 2023, 4:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details