महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar On Police Recruitment : पोलीस भरतीत उमेदवारांची गैरसोय दूर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची विधानसभेत मागणी - Maharashtra budget session

पोलीस भरतीसाठी मुंबईत येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे.

Ajit Pawar On Police Recruitment
विरोधी पक्षनेते अजित पवार

By

Published : Mar 3, 2023, 1:44 PM IST

मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे पोलीस भरती केंद्रांवरच्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईसह राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. भरती केंद्रांवर तरुण मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या निवास, भोजनाची गैरसोय होत असल्याने, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर केल्या पाहिजेत याकडे पवार यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी उमेदवारांच्या धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याची माहिती दिली. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत घ्यावी असेही सांगितले.


पोलीस भरती दरम्यान दुर्घटना टाळा : पोलिस शिपाई भरतीसाठी, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, एमएस्सी झालेले तरुण येत आहेत. शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ही मुले आहेत. उच्चशिक्षण घेऊनही नोकऱ्या नसल्याने हे तरुण पोलीस भरतीसाठी येत आहेत. त्यांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये भरतीच्या वेळी, गणेश उगले या १७ वर्षांच्या तरुणाला १६०० मीटर धावल्यानंतर चक्कर आली आणि तो कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिथे त्याचा मृत्यू झाला. मुंबईत भरतीसाठी आलेल्या अमर अशोक सोलंके या २७ वर्षांच्या तरुणाला, तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये हार्टअ‍ॅटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.


धावण्याच्या चाचणीची वेळ बदला : भरती केंद्रांवर येणाऱ्या तरुणांची निवासाची सोय सभागृहात किंवा बंदिस्त ठिकाणी केली पाहिजे. अंघोळ व स्वच्छतागृहांची सोय असली पाहिजे. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली पाहिजे. वैद्यकीय उपचारांची सोय ठेवली पाहिजे. धावण्याची चाचणी आपण दुपारी भर उन्हात घेतो अशी विनंतीही अजित पवार यांनी केली. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांपैकी ज्यांची निवड होईल किंवा ज्यांची होणार नाही, त्या सर्वांच्या मनात शासनाबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचे काम आपण केले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :Palghar crime news: वडिलांनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार करत किशोरवयीन मुलीची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details