मुंबई :मंगल प्रभात लोढा यांच्या विधानानंतरलव्ह जिहाद शब्दावरून विधानसभेत गोंधळ झाला आहे. चर्चा सुरू असताना आशिष शेलार आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे.शेतकऱ्यांना खत खरेदी करण्याकरिता माहिती द्यावी लागते. त्या माहितीत जातीचा पर्याय आल्याने विरोधी पक्षनते सभागृहात आक्रमक झाले आहेत. जातीचा पर्याय वगळावा, ही माहिती केंद्राला कळविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून हा अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारने बजेट सादर केला. त्यानंतर पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पंचामृत' या ध्येयावर आधारित असल्याचे सांगितले. राज्य सरकारने शेतकरी, महिला, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, इत्यादी घटकांसंबंधित मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज अधिवेशनात या अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.
महिलांसाठी या तरतूदी : शिंदे फडणवीस सरकारने ज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत 6000 रूपये इतका वार्षिक निधी मिळणार आहे. बससेवेत महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तिकिट दरात शिंदे-फडणवीस सरकारने 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. राजकीय नेत्यांनी या शिंदे भाजप सरकारने सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीं स्तरांमधून सकारात्मक तर काही स्तरांमधून नकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.