मुंबई :राज्य सरकाने अर्थसंकल्पात शोलेय विद्यार्थ्यांसाठी आंनदाची भातमी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थ संकल्प सादर केला. यात शिक्षणासाठी भरीव तरतुद करण्यात आली आहे. यापुढे शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गणवेशही राज्य सरकार मोफत देणार आहे. ५ ते ७ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक हजारवरुन ५ हजार रुपय पर्यंत शिष्यवृतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सराकारने घेतला आहे. तसेच ८ ते १० वी च्या विद्यार्थांना १ हजार ५०० वरुन ७ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
आदिवासी आश्रम आदर्श शाळा :आदिवासी विभागाच्या माध्यमातून २५० शासकीय आदिवासी आश्रम शाळांना आदर्श आश्रम शाळा म्हणून घोषित करण्यात येईल अशी माहिती विधिमंडात अर्थसंकल्प सादर करतांना फडणवीस यांनी दिली आहे. अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ३ हजार बचत गटाची निर्मिती करण्यात येईल अशी घोषणा देखील करण्यात आली आहे.
दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती :राज्य सरकाने शासनाने डिसेंबर २०२२ मध्ये स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण विभागाची निर्माण केला आहे. या विभागाकडून दिव्यांगांचे शिक्षण, पुनर्वसन, रोजगार स्वयंरोजगार यासंबंधी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात करण्यात येणार आहे.
महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण : बचत गटातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत २५ हजारावरून पन्नास हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.