मुंबई :राज्यातील सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांच्या देखभाल, जीर्णोद्धार आणि विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी 1700 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांच्या देखभाल, जीर्णोद्धार आणि विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि वैजनाथ ज्योतिर्लिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकारने 1 हजार 700 कोटींहून अधिक निधीची तरतूद केली आहे.
उमरी तीर्थक्षेत्र विकासाठी 500 कोटी : राज्य सरकाने धार्मिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी राज्यच्या अर्थसंकल्पात तरतुद केली आहे. श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकासाठी राज्य सरकाने 500 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजुर केले आहेत. त्यामुळे धार्मिक विकासाचा चालना मिळणार आहे. तसचे धार्मिक स्थळांचा वारसा यातून जतन होणार आहे.
प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी धार्मिक स्थळासांठी विशेष आराखडा सादर केला आहे. राज्याती महत्वाच्या धार्मिक स्थळांमध्ये भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.