मुंबई :नुकतेच काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. यंदा अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्राला काहीतरी वेगळे मिळण्याची अपेक्षा आहे. त्यात शिक्षण क्षेत्रही मागे राहिले नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिकची अपेक्षा शिक्षण विभागाची आहे. गेल्यावर्षी महाविकास आघाडीच्या काळात अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडले होते. यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पा मांडणार आहेत.
शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटींचा निधी : गेल्या वर्षी अर्थसंकल्पात महर्षी कर्वे, साने गुरुजी, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटींचा निधी राज्य सरकारने दिला होता. शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. आत्ताचे विरोधी पक्षनेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला होता. कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटींची तरतूद शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
प्रत्येक विभागात इनोव्हेशन हब : संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधीसाठी प्रत्येक विभागात इनोव्हेशन हब, तरुणांना स्टार्ट अपसाठी भांडवल, 100 कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड , कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याशिवाय लता मंगेशकर यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद, शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबईच्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद 2022च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. एसएनडीटी विद्यापीठासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटी निधी देण्यात आला होता. शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती.
केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी तरतूदी :केंद्रीय अर्थसंकल्पात वन क्लास-वन टीव्ही चॅनल उपक्रमात वाढ करण्यात आली आहे. 200 टीव्ही चॅनेलपर्यंत हा उपक्रम वाढवला जाणार आहे, असे सांगण्यात आले होते. महत्वपूर्ण विचार कौशल्य आणि हुबेहूब शैक्षणिक वातावरणाला चालना देण्यासाठी आभासी प्रयोगशाळा आणि कौशल्य ई-लॅबची स्थापना केली जाणार आहे. त्याशिवाय डिजिटल शिक्षकांद्वारे वितरणासाठी उच्च दर्जाची ई-सामग्री विकसित केली जाणार आहे. जागतिक दर्जाच्या सार्वत्रिक शिक्षणासाठी डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे.
हेही वाचा :Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022-23 मध्ये उद्योग क्षेत्रासाठी 'या' होत्या तरतुदी, यंदा उद्योगांच्या वाढल्या अपेक्षा