मुंबई :राज्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने आतापर्यंत सुमारे 29 हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. उर्वरित पंचनामे सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. विधानभवनात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अर्थसंकल्पाकडे लक्ष :राज्य विधिमंडळाचे आज अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडले जाणार आहे. आज मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्रीतील सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. आमचे सरकार शेतकाऱ्यांचा विचार करणारे आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊसमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. आजवर केलेल्या पंचनाम्यात ३९ हजार हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे.
पंचनामे झाल्यावर मदत :उर्वरित पंचनामे निश्चित झाल्यावर शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेण्यात आली आहे. ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची यापूर्वी केवळ घोषणा झाली. मात्र, शिंदे - फडणवीस सत्तेवर आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली आहे. आता बाधित शेतकऱ्यांना ही भरीव मदत देण्यावर शासनाचा भर असेल, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.