सोलापूर :बार्शीतल्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने बुधवारी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी उपचार सुरू असताना आत्महत्या केली आहे. छातीत जळजळ होणे, पोटात दुखणे या आजारावर त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमनाथ बिभीषण पिसाळ असे मृत तरुणाचे नाव आहे.
Breaking News : महाराष्ट्रातील 39,000 रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण देणार - महारेरा अधिकारी - ईटीव्ही भारत ब्रेकिंग न्यूज
20:00 February 15
बार्शीतल्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये रुग्णाची आत्महत्या
19:52 February 15
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार
मुंबई - वरळी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीसह मोहम्मद आफताब कासिम खान वय वर्ष 22 या आरोपीला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्या दुचाकीतून सोन्या आणि चांदीचे दागिने सापडले. आज हा आरोपी लघुशंकेसाठी गेला असताना टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.
19:38 February 15
महाराष्ट्रातील 39,000 रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण देणार - महारेरा अधिकारी
ठाणे - महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा) राज्यभरातील 39,000 रिअल इस्टेट एजंटना घर आणि मालमत्ता खरेदीदारांना चांगली सेवा देण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे. नियामक संस्थेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
19:34 February 15
विद्यार्थी आत्महत्या प्रकरण, आयआयटी मुंबईच्या संचालकांचा मागितला वद्यार्थ्यांनी राजीनामा
मुंबई, 15 फेब्रुवारी (पीटीआय) प्रथम वर्षाच्या दलित विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्या आणि जातीय भेदभावाचा सामना करत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी प्रीमियर संस्थेच्या संचालकाच्या राजीनाम्याची मागणी केली.
18:53 February 15
जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याच्या प्लॅनिंगची क्लिप वायरल
ठाणे - जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याच्या प्लॅनिंगची क्लिप वायरल झाली आहे. कार्यकर्त्यांनी पालिका गेटवर अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे आमच्या प्रतिनिधीने कवळवले आहे. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी बंदूक काढल्याचेही कथित क्लिपमध्ये दिसून येत आहे.
18:33 February 15
यूट्यूबवर 'पठाण'चा टीझर आणि 'बेशरम रंग' गाण्याचे स्ट्रीमिंग रोखण्यास कोर्टाचा नकार
मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील एका न्यायालयाने शाहरुख खान स्टारर 'पठाण' चित्रपटाचे टीझर आणि यू/ए न दाखवता यूट्यूबवर 'बेशरम रंग' गाण्याचे प्रसारण रोखण्यासाठी तात्पुरती मनाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. अहमदनगर येथील श्रीरामपूर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश पी ए पटेल यांनी ८ फेब्रुवारी रोजी याचिका फेटाळून लावली. पीटीआयने यासंदर्भात आज वृत्त दिले आहे.
18:28 February 15
महिला T20 विश्वचषक: नाणेफेक जिंकून WI चा भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय
केपटाऊन - वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने बुधवारी येथे महिला टी-20 विश्वचषक गट 2 च्या सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने यास्तिका भाटिया आणि हरलीन डोएलच्या जागी उपकर्णधार स्मृती मानधना आणि फिरकीपटू देविका वैद्य यांच्यासोबत काही बदल केले आहेत.
18:25 February 15
स्वस्तात घरे देतो सांगून अनेकांची ३.७५ कोटींची फसवणूक, चौघांना अटक
पालघर - मुंबईसह महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये 150 हून अधिक गृहखरेदीदारांची 3.75 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. ही चौकडी आणि त्यांच्या साथीदारांनी संशयास्पद कंपन्या सुरू केल्या. स्वस्त घरे विकण्याचे आश्वासन देऊन लोकांना आमिष दाखवले. नंतर त्यांचे पैसे घेऊन गायब झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
18:14 February 15
हरारेतून आलेल्या महिलेकडे सापडले 84 कोटींचे हेरॉईन, महिलेसह दोघांना अटक
मुंबई - हरारेमधून आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाला विमानतळावर अटक केली आहे. तिच्याकडून 11.94 किलो रंगीत मणी जप्त केले आहेत. यामध्ये 'हेरॉईन' आढळून आले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 84 कोटी रुपये आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या महिला प्रवाशासह इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
18:06 February 15
फटाका कारखाना स्फोट प्रकरणी न्यायासाठी पीडितांचे मुंडण आंदोलन
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. बार्शीमधील पांगरी शिवारातील शिराळा परिसरात 1 जानेवारी 2023 रोजी फटाका फॅक्टरीत मोठा स्फोट झाला होता.या स्फोटात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना आजतागायत शासनाने आर्थिक मदत केली नाही. तसेच तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी यांवर कारवाईची मागणी केली होती. तीही मागणी मान्य झाली नाही. या अवैध फटाका कारखाना चालकाविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आजतागायत प्रलंबित आहे. स्थानिक प्रशासन फटाका कारखाना चालकावर गुन्हे दाखल करुन गप्प बसले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब तलाठी, ग्रामसेवक व तहसीलदार यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करत, अर्धनग्न होत आज मुंडन आंदोलन केले.
17:26 February 15
ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या 2 जणांना अटक; 13 प्रकरणांचा उलगडा
ठाणे - नवी मुंबई पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील दोघांना अटक करून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या 13 गुन्ह्यांची उकल केल्याचा दावा केला आहे. गुन्हेगारांनी पोलीस किंवा प्रभावशाली व्यक्ती असल्याचे भासवून वयोवृद्ध लोक एकटे फिरत असताना सोनसाखळी व इतर मौल्यवान वस्तू लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट II चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी हे सांगितले. यातील बहुतांश घटनांचा संदर्भ या गुन्हेगाराशी असल्याची माहिती त्यांनी दिली.
17:20 February 15
काँग्रेसचे बीबीसी कार्यालयात आयटी सर्वेक्षणाविरोधात 'मूक' आंदोलन
पुणे - काँग्रेसच्या पुणे शहर युनिटने दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात आयकर विभागाच्या सर्वेक्षण कार्याविरोधात 'मूक' आंदोलन केले. नरेंद्र मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून माध्यमे आणि पत्रकारांवर दबाव असल्याचा आरोप केला.
17:16 February 15
अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी नराधमाला २० वर्षांची शिक्षा
जालना- जिल्ह्यातील एका 21 वर्षीय तरुणाला शाळेत जाणाऱ्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अंबड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दोषी योगेश सस्ते याला 2500 रुपयांचा दंडही ठोठावला.
16:56 February 15
सहलीला गेलेल्या तामिळनाडूतील 4 शालेय विद्यार्थिनींचा नदीत बुडून मृत्यू
तामिळनाडूतील विरलीमलाई, पुडुकोट्टई जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक विद्यालयातील चार विद्यार्थिनींचा सहलीच्या प्रवासादरम्यान करूर जिल्ह्यातील मयनुर येथील कावेरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. करूर पोलिसांनी ही माहिती दिली. कावेरी नदीत बुडालेल्या या चारही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
16:32 February 15
ठाण्यातील 45 गोदामे आगीत जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही
ठाणे - येथील आगीत कागद, प्लास्टिक आणि इतर भंगार वस्तूंचा साठा असलेली ४५ गोदामे जळून खाक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र शिळ फाटा परिसरातील उत्तर शिव गावात लागलेल्या या आगीत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली.
15:43 February 15
जेवण बनवण्यास नकार दिल्याने पत्नीला गंभीर मारहाण प्रकरणी पतीना 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा
ठाणे - जिल्ह्यातील न्यायालयाने, पत्नीला जेवण बनवण्यास नकार दिल्याने गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना दहा वर्षांपूर्वीची आहे. आता या प्रकरणी निकाल लागला आहे.
15:39 February 15
आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करा - आठवलेंची मागणी
मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेला आज भेट दिली. त्यांनी प्रथम वर्षाच्या दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूची आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जातीय भेदभावाला सामोरे जावे लागते, ही गंभीर बाब आहे असे ते म्हणाले.
15:30 February 15
21व्या शतकातही मुलींना वस्तू म्हणून हाताळले जाते ही शोकांतिका - मुंबई उच्च न्यायालय
मुंबई - एकविसाव्या शतकातही मुलींना वस्तू समजून त्यांचा आर्थिक फायद्यासाठी वापर केला जात असल्याच्या घटना घडत आहेत, ही चिंताजनक बाब आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी कोर्टाने आरोपींना जामीन मंजूर केला. सातारा जिल्ह्यात एक वर्षाच्या मुलीला तिच्या आईने विकले होते. ही बाब नैतिकता आणि मानवी हक्कांच्या तत्त्वांच्या दृष्टीने अत्यंत आक्षेपार्ह आहे, असे न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्या एकल खंडपीठाने म्हटले आहे. अश्विनी बाबर हिला गेल्यावर्षी सातारा पोलिसांनी अटक केली होती.
15:25 February 15
गोंदिया जिल्ह्यात जमिनीच्या वादातून C-60 कमांडोची हत्या
गोंदिया - जमिनीच्या वादातून सी-60 दलातील कमांडोची हत्या केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. C-60 ही राज्याच्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा सामना करण्यासाठी तयार केलेली पोलिसांची खास तुकडी आहे. विलास रामदास म्हस्के (41) यांच्यावर मंगळवारी प्राणघातक हल्ल्या करण्यात आला. त्यावेळी ते रजेवर होते.
15:22 February 15
औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात बॉम्बची धमकी ठरली अफवाच
औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आवारात बॉम्ब असल्याचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या इमारतीची झडती घेतली. त्यावेळा संबंधित फोन अफवा पसरवण्यासाठी केल्याचे लक्षात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
15:16 February 15
आपण कुणावर तरी नाराज आहे हे माध्यमातूनच कळाले - बाळासाहेब थोरातांनी घेतली पत्रकारांचीच फिरकी
मुंबई - आपण कुणावर तरी नाराज आहे, हे आपल्याला माध्यमातूनच कळाले अशी स्पष्टोक्ती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यांना पटोलेंच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले.
15:02 February 15
बीड जिल्ह्यातील कडा येथे ट्रकची दुचाकीला धडक दोघेजण जागीच ठार
बीड - आष्टी तालुक्यातील कडा येथे मार्केट कमिटीसमोर एका ट्रकने दुचाकी स्वराला उडवल्याने दुचाकीवर असलेले दोघेजण जागीच ठार झाले आहेत. दुचाकीवर असलेले खिळद येथील बाबासाहेब गर्जे वय 47 व नारायण गोल्हार वय वर्ष 51 दोघेही ठार झाले. त्यांना धामणगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
14:51 February 15
थोरात आणि पटोले काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत एकत्र
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादानंतर प्रथमच थोरात आणि पटोले एकत्र आले आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची बैठक सुरू आहे.
14:21 February 15
आत्महत्या केलेल्या आयआयटी विद्यार्थ्याने बहिष्काराची माहिती दिली होती बहीण आणि मावशीला
मुंबई : आयआयटी बॉम्बेमधील दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याने आपल्या बहीण आणि मावशीला, त्याच्या जातीमुळे त्याच्या मित्रांनी बहिष्कृत केल्याबद्दल सांगितले होते, अशी माहिती त्याचा कुटुंबीयांनी दिल्याची माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. दुसरीकडे आयआयटी बॉम्बेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, कॅम्पसमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही.
14:12 February 15
भटक्या कुत्र्यांसाठी इंजिनियरने बनवला क्यूआर कोड आधारित टॅग
मुंबई - अक्षय रिडलान या अभियंता आणि मुंबईतील श्वानप्रेमीने भटक्या कुत्र्यांचा मागोवा ठेवण्यासाठी QR कोड तंत्रज्ञानासह टॅग विकसित केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कुत्र्यांचे स्थान शोधण्यात आणि त्यांच्या नसबंदी किंवा लसीकरणासाठी धोरणे तयार करण्यात सरकारला मदत होईल, असे त्याचे म्हणणे आहे.
14:09 February 15
ई सिगारेट प्रकरणी 'मुच्छड पानवाला'चा मालक शिवकुमार तिवारी याला अटक
मुंबई - अंमली पदार्थ विरोधी सेलने 'मुच्छड पानवाला'चा मालक शिवकुमार तिवारी याला अटक केली आहे. त्याच्या खेतवाडी शाखेत केलेल्या कारवाईत 15 लाख रुपयांच्या प्रतिबंधित ई-सिगारेट जप्त केल्या होत्या. त्यानंतर त्याला अटक केली आहे.
14:06 February 15
रविकांत तुपकरांसह 25 जणांना जामीन मंजूर, शेतकऱ्यांसाठी केले होते आंदोलन
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर आणि त्यांच्या सहकारी आरोपींना आज बुलडाणा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काल सायंकाळी रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी रविकांत तुपकर यांची वकील या नात्याने जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये रविकांत तुपकर यांची बाजू मांडली होती.
13:41 February 15
विशाखापट्टणम-सिकंदराबाद गोदावरी एक्स्प्रेसचे 6 डबे बिबीनगरजवळ घसरले
हैदराबाद - विशाखापट्टणम-सिकंदराबाद गोदावरी एक्स्प्रेसचे सहा डबे आज तेलंगणातील बिबीनगरजवळ रुळावरून घसरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वेचे प्रसिद्धी अधिकाऱ्यांनी सांगितले.
13:34 February 15
कुर्ल्यातील बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू
मुंबई - कुर्ला भागात एका 13 मजली इमारतीला आग लागल्याने एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि इतर आठ जणांनाही धुराचा त्रास झाला. कोहिनूर सिटीच्या प्रीमियर कंपाऊंडमध्ये असलेल्या इमारतीमध्ये सकाळी 7 वाजता आग लागली. त्यानंतर परिसरात धुरामुळे काही लोक वेगवेगळ्या मजल्यावर अडकले होते. त्यांना इमारतीच्या टेरेसवर नेण्यात आले. जिन्याच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.
12:34 February 15
न्यूझीलंडमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप
न्यूझीलंडमधील लोअर हटच्या वायव्येस ७८ किमी अंतरावर ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यामुळे काही हानी झाल्यााचा तपशील अजून मिळालेला नाही. मोठा भूकंप झाल्याने मोठी हानी झाल्याची शक्यता आहे.
12:16 February 15
पुण्यात ८ ठिकाणी आयकर विभागाची मोठी छापेमारी सुरू
पुणे - पुण्यात ८ ठिकाणी आयकर विभागाची मोठी छापेमारी सुरू आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावरती छापे टाकण्यात येत आहेत. शरद पवारांचे निकटवर्ती अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुण्यातील प्रसिद्ध सिटी ग्रुपवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत.
12:04 February 15
शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टाचा सभापतींच्या निःपक्षपातीपणावर सवाल
नवी दिल्ली - शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आता, सभापतींच्या पदच्युतीचा ठराव प्रलंबित असताना ते इतर सदस्यांना अपात्र ठरवू शकत असतील, तर त्याचा त्यांच्या निःपक्षपातीपणावर परिणाम होणार नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.
12:00 February 15
काँग्रेस नेत्या डॉ. जया ठाकूर यांच्या अदानींविरोधातील याचिकेवर 17 फेब्रुवारीला सुनावणी - सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या डॉ. जया ठाकूर यांनी अदानींविरोधात चौकशीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर 17 फेब्रुवारीला सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.
11:52 February 15
बँकेच्या लोकांनी तगादा लागल्याच्या कारणातून शिक्षकाची आत्महत्या
बीड - धारूर तालुक्यातील आसरडोह येथे मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या शिक्षकाने श्री मंगलनाथ मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. माजलगावच्या बँकेचे कर्ज 2019 मध्ये घेतले होत. त्याच्या वसुलीसाठी आलेल्या पथकातील लोकांनी वसुलीसाठी तगादा लावल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. वसुली पथकाच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवले असा आरोप होत आहे. पत्नीच्या तक्रारीवरून वसुली पथकातील दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
11:15 February 15
शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांच्याकडून युक्तीवाद सुरू
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे वकील हरिश साळवे हे युक्तीवाद करत आहेत. अजय चौधरी यांचे गटनेतेपद बेकायदेशीर असल्याचे साळवे यांनी म्हटले आहे.
10:33 February 15
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची घेतली भेट
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. नागपुरातील आरएसएस मुख्यालयात जवळपास एक तास बंददारा आड चर्चा झाली आहे. येणाऱ्या मध्य प्रदे मधील निवडणुका बघता चर्चा करण्यासाठी शिवराज सिंह आल्याची सूत्रांनी माहिती दिली.
10:29 February 15
पंतप्रधान मोदी उद्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमचे करणार उद्घाटन
पंतप्रधान मोदी उद्या दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर 'आदी महोत्सवा'चे उद्घाटन करणार आहेत
10:20 February 15
महिला वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक
बाचाबाचीनंतर २५ वर्षीय महिला वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासह पुणे शहरातून तीन जणांना अटक केली आहे.
09:48 February 15
भाजपने अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले-संजय राऊत
नाशिक : राजकीय विरोधकांना अडकविण्याची रणनीती आहे. भाजपने अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. विरोधी पक्षनेत्याला कोणी अटक केली असती का? भाजपने अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
09:43 February 15
गुजरात रबर फॅक्टरीला आज पहाटे भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे रबर जळून खाक
सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील गुजरात रबर फॅक्टरीला आज पहाटे भीषण आग लागली आहे. आगीत कोट्यवधी रुपयांचे रबर जळून राख झाले आहे. गुजरात रबर फॅक्टरी ही मूळची गुजरात राज्यातील असून देशभरात यांच्या विविध जिल्ह्यात शाखा आहेत.
09:23 February 15
केअरटेकरच्या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
मुंबईत केअरटेकरच्या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर वृद्धाची पत्नी जखमी झाली आहे.
09:22 February 15
कॉपीमुक्त परीक्षा अभियान; परीक्षा केंद्रांच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहणार
मुंबई- महाराष्ट्र सरकारने 10वी आणि 12वीच्या परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रांच्या 50 मीटरच्या परिघात झेरॉक्स दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
08:53 February 15
ऑटोरिक्षामध्ये आरडीएक्स असल्याचा हॉक्स कॉल करणाऱ्या हिस्ट्रीशीटरला अटक
ऑटोरिक्षात आरडीएक्स असल्याबद्दल दारूच्या नशेत मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फसवणूक केल्याबद्दल बोरिवली येथून सूरज जाधव नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जाधव यांच्यावर यापूर्वी खून आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
08:51 February 15
कुर्ला पश्चिममधील आगीत वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कॉम्प्लेक्स जवळील इमारत क्रमांक सात सी विंग येथे आज पहाटे आग लागली. या आगीमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
08:26 February 15
धान्यातील कीड नाशक पावडरच्या उग्र वासाने शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बहिण-भावाचा मृत्यू
धान्यातील कीड नाशक पावडरच्या उग्र वासाने शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बहिण-भावाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे.
08:06 February 15
शिंदे आणि ठाकरे गटाच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस
शिवसेनेतील ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी मंगळवारी युक्तीवाद केला. आज शिंदे गटाचे वकील हरिष साळवे युक्तीवाद करणार आहेत.
07:59 February 15
मी कधीही भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली नाही: अनिल देशमुख
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मंगळवारी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केल्याचा इन्कार केला. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश करू शकतो का, याबाबत देशमुख यांनी चौकशी केली होती, असा दावा महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. देशमुख यांनी दावा केला की बावनकुळे हे संदर्भ सोडून आपले म्हणणे मांडत असून भाजपमध्ये येण्याची त्यांची कधीही इच्छा नव्हती.
07:34 February 15
कंटेनर चालकाने चिरडल्या दुचाकी व वाहने, 1 ठार 7 ते 8 जखमी
येवला(नाशिक)- कोपरगाव मनमाड महामार्गावर येवला शहरातील विंचूर चौफुलीजवळ कोपरगाव वरून येणाऱ्या एका भरधाव कंटनेरने जवळपास 10 ते 15 मोटरसायकलला व 7 ते 8 मोठ्या गाड्यांना ट्रक खाली चिरडले. यात 1 जण ठार तर 7 ते 8 जण जखमी झाले आहे. काही जणांना येवला उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे
07:13 February 15
Maharashtra Breaking News : कॅनडामधील राम मंदिराच्या विटंबनेचा भारताकडून निषेध
मुंबई : मिसिसॉगा येथील राम मंदिराची विटंबना केल्याचा भारताच्या वाणिज्य दूतावासाने निषेध केला आहे.