सातारा - पाटण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळी विद्युत रोषणाई करताना वीजेचा शॉल लागून कारखान्यातील कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल अशोक यादव (वय 24, रा. साईकडे, ता. पाटण), असे मृत कर्मचार्याचे नाव आहे.
Breaking News : मंत्री शंभूराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त विद्युत रोषणाई करताना वीजेचा शॉक लागून कर्मचार्याचा जागीच मृत्यू - Marathi online news
21:58 November 15
मंत्री शंभूराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त विद्युत रोषणाई करताना वीजेचा शॉक लागून कर्मचार्याचा जागीच मृत्यू
21:12 November 15
पुसदमध्ये तरुणावर दोघांनी केला गोळीबार; तरुण जखमी
पुसद : बुलेटने कामानिमित्त जात असलेल्या एका तरुणाचा दुचाकीस्वार दोघांनी पाठलाग करून त्याच्यावर देशी कट्ट्यातून अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात संबंधित तरुणाच्या मांडीला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला. तसेच जीव वाचविण्यासाठी बुलेट सोडून त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे तो बचावला. ही गंभीर घटना आज मंगळवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास पोलीस वसाहतीच्या मागील बाजूस आणि शहर ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या घडली. या घटनेने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे.
20:54 November 15
शाहरुख खानला चोरी करताना पकडले
ठाणे : नाव अभिनेत्याचं असल्याने तो चोऱ्याही फिल्मी स्टाईलने करत असल्याचे समोर आले. मात्र त्याचा चोरीचा डाव त्याच्यावर सिमरन झडप घालून उधळून लावल्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने तिला जोरदार धक्का देत तिच्या तावडीतून सुटून पळ काढला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शाहरुख खानवर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहे.
19:38 November 15
पोलीस भरतीचा सराव करताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू
वसई -वसईत पोलीस भरतीसाठी सराव करताना एका २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे.
19:21 November 15
मेटाचे भारतातील प्रमुख राजीव अग्रवाल यांचा राजीनामा
नवी दिल्ली - सार्वजनिक धोरणासाठीचे मेटाचे भारतातील प्रमुख राजीव अग्रवाल यांनी आज राजीनामा दिला आहे. मेटाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्हॉट्सअपचे भारत प्रमुख अभिजित बोस यांनीही राजीनामा दिला आहे, असे मेटा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
18:42 November 15
श्रद्धा हत्याकांड - पंधरा दिवसांपूर्वी आफताब वसईला येऊन गेला होता
मुंबई -पंधरा दिवसांपूर्वी आफताब वसईला येऊन गेला होता. तो राहात असलेल्या कॉम्प्लेक्सच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. इतरही धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यानुसार 18 मे ला आफताफने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतात हे इंटरनेटवर रात्रभर सर्च केले. त्यानंतर मृतदेहाला कसे चिरतात हे त्याने इंटरनेटवर पाहिले. त्याप्रमाणे शरीराचे तुकडे तुकडे केले. मृतदेहाचा वास येईल म्हणून त्याने प्रथम आतड्यांची विल्हेवाट लावली. राहिलेला मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. हत्या करण्यासाठी आफताफने एक फूट लांब सुरीचा वापर केला होता, असेही तपासात उघड झाले आहे.
18:25 November 15
नवाब मलिक यांना किडनी उपचाराकरता पुन्हा टेस्ट करण्याची परवानगी
मुंबई - माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांना किडनी उपचाराकरता पुन्हा टेस्ट करण्याची सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. नवाब मलिक यांना रेनल स्कॅनसाठी परवानगी दिली आहे. नवाब मलिक यांच्यावर सध्या कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
18:16 November 15
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मुंबई - कथित मनी लॉन्ड्रीग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम त्यामुळे वाढला आहे. मनी लॉन्ड्रीग प्रकरणात अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 28 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
17:30 November 15
किरॉन पोलार्डची मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
मुंबई -आपल्या लांबलचक षटकारांनी प्रेक्षकांना चकित करणारा मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना पोलार्डने आयपीएलच्या संपूर्ण 13 हंगामात प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'पॉली' या नावाने प्रसिद्ध असलेला पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. निवृत्तीनंतरही तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडला जाईल. मुंबई इंडियन्सकडून खेळताना पोलार्डने 5 आयपीएल आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकल्या.
17:23 November 15
प्रतापगडावर भव्य शिवस्मारक उभारुन ध्वनी आणि प्रकाश शो सुरू करण्याचा प्रस्ताव
मुंबई - पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतापगड किल्ल्यावर भव्य 'शिवस्मारक' उभारण्यासाठी आणि तेथे ध्वनी आणि प्रकाश शो सुरू करण्यासाठी सातारा जिल्हाधिकार्यांकडून सविस्तर प्रस्ताव मागवण्याचे आदेश पर्यटन विभागाला दिले आहेत.
16:47 November 15
मुंबईत गोवरचे १४२ रुग्ण, ७ संशयितांचा मृत्यू
मुंबई - मुंबईत गोवरचे १४२ रुग्ण आहेत. तर ७ संशयितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
16:18 November 15
पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याविरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली - शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी दाखल करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने दाखल केलेली ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली आहे.
15:46 November 15
बिरसा मुंडा यांच्या विचारधारेवर भाजप आणि संघ करत आहे हल्ला - राहुल गांधी
हिंगोली -आरएसएस आणि भाजपकडून बिरसा मुंडा यांच्या विचारधारेवर हल्ला केला जात आहे. आदिवासींचे नाव आदिवासी वरून वनवासी करण्यामागे भाजपची रणनीती आहे. याद्वारे त्यांनी त्यांचे अनेक हक्क हिसकावून घेतले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी असा थेट आरोप केला आहे.
15:42 November 15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट
बाली (इंडोनेशिया) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक प्रथमच पदभार स्वीकारल्यानंतर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी अनौपचारिक बोलणी झाली.
15:23 November 15
जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर
जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
15:09 November 15
अबू आजमी यांच्याशी संबंधीत २० ठिकाणांवर आयकर विभागाने छापे
मुंबई : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांच्याशी संबंधीत २० ठिकाणांवर आयकर विभागाने आज छापे टाकले. मुंबईबरोबरच लखनौमध्येही छापेमारी करण्यात आली. आज सकाळपासूनच हे छापे सुरू आहेत. अमरावतीच्या दौऱ्यावर असलेले अबू आजमी दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईला रवाना झाले आहेत.
14:58 November 15
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट
बाली (इंडोनेशिया) - येथे G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक बोलणी झाली. नेत्यांनी भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि क्वाड, I2U2 इत्यादी गटांमध्ये चांगले सहकार्य सुरू ठेवणे ही चांगली गोष्ट असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. तसेच समन्वय राखण्याचे मान्य केले.
14:48 November 15
अब्दुल सत्तारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा
मुंबई - अब्दुल सत्तारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी.
14:24 November 15
आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे -अमृता फडणवीस
नाशिक -देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी, आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, असे म्हटले आहे. नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे इत्यादीही उपस्थित होते.
13:01 November 15
आमच्याकडून कायद्याचा भंग झाला तर कारवाई करा - अजित पवार
मुंबई - जे कुणी चुकीचे काम करतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यामध्ये आमच्याकडूनही काही चूक झाली कायद्याचा भंग झाला तर आमच्यावरही कारवाई झाली पाहिजे असे स्पष्ट मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडले. मात्र चुकीच्या पद्धतीने कारवाई होणे गैर असल्याचेही ते म्हणाले.
12:44 November 15
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण 2008 या खटल्यातील आणखी एक साक्षीदार आज फितूर
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण 2008 या खटल्यातील आणखी एक साक्षीदार आज फितूर झाला. त्याने 2008 मध्ये आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्याबद्दल एटीएसला जबाब दिला होता.
12:20 November 15
श्रद्धा हत्याकांड - दिल्ली पोलीस कॉमन फ्रेंडला चौकशीसाठी बोलावणार
नवी दिल्ली - सध्या सुरू असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी आफताब आणि पीडितेच्या एका मित्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्याच्याकडून दोघांच्यातील संबंधाची माहिती पोलीस घेणार आहेत. दरम्यान पोलिसांनी आफताबला त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जिथे-जिथे टाकले तिथे तपासासाठी नेण्यात येत आहे. घरच्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
12:11 November 15
खासदार नवनीत राणा यांना तात्पुरता दिलासा
मुंबई - जात पडताळणी प्रकरणी 19 नोव्हेंबर सुनावणीपर्यंत नवनीत राणा यांच्यावर अजामानीपत्र वॉरंट बजावणार नाही, अशी हमी सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. खासदार नवनीत राणा प्रकरणात, सरकारी वकिलांना उत्तर देण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश. 19 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होईल. सरकारी वकील सादर करणार वस्तुनिष्ठ अहवाल. तोपर्यंत कारवाई करणार नसल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाला दिले अश्वासन. मात्र तोपर्यंत, नवनीत राणा यांना दिलासा द्यायला, सत्र न्यायालयाचा नकार. नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट कोर्टात आक्रमक. तरी, सरकारी वकिलांचा अहवाल आल्यानंतरच निर्णय देणार, या भूमिकेवर सत्र न्यायालय ठाम.
11:54 November 15
जामिन अर्जावर आव्हाड आणि पोलिसांचा युक्तीवाद पूर्ण, दुपारी 2 वाजता निकाल
ठाणे - कोर्टात जितेंद्र आव्हाड आणि पोलिसांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. यामध्ये आव्हाड यांनी सांगितले की, मी कोर्टाने दिलेल्या अटी शर्थीचे पालन करण्यास तयार आहे. माझ्याकडून जप्त करण्यासारखे काहीही नाहीे. तरीही पोलिसांना मला तुरुंगात का डांबायचे आहे. मी इथेच राहतो मला जेंव्हा चौकशीला बोलावतील तेंव्हा मी हजर राहायला तयार आहे. राज्यात सुरू असलेले राजकारण सध्या आपण टीव्हीवर पाहतोय. त्यातूनच या सगळ्या गोष्टी घडत आहेत, असेही ते म्हणाले. दुसरीकडे आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मिळू नये असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला आहे. यावर दुपारी 2 वाजता निर्णय देण्यात येणार आहे.
11:46 November 15
शिवसेनेला जागा दाखवण्याचे काम अमित भाई शहा यांनी केले - फडणवीस
मुंबई - आपल्यासोबत ज्या शिवसेनेने बेईमानी केली त्या बेईमानीला छेद देत, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम अमित भाई शहा यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे विधान केले आहे. ते मुंबईत बोलत होते.
11:42 November 15
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंग प्रकरणाची थोड्याच वेळात सुनावणी
ठाणे - राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या (354 )विनयभंग प्रकरणात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. सुनावणी होईपर्यंत आव्हाड यांना अटक करु नये असे ठाणे न्यायालयाने मुंब्रा पोलिसांना निर्देश दिल्याने न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मुंब्रा पोलिसांकडून ठाणे कोर्टात त्यांचे म्हणणे मांडणार आहे. आव्हाड यांच्या वकीलामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयात करण्यात आलेला आहे.
10:32 November 15
1993 मुंबई बॉम्बस्फोट : 29 वर्षानंतर पकडलेल्या चार आरोपीं विरोधात आरोपपत्र
मुंबईत झालेल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 29 वर्षानंतर पकडलेल्या चार आरोपीं विरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये 81 पानाचे आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात सीबीआयने असे म्हटले आहे की ही चार आरोपी दुबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निवासस्थानी झालेल्या कटाच्या बैठकीत सहभागी होते. 29 वर्षे फरार झाल्यानंतर यावर्षी मे महिन्यात या चौघांना अटक करण्यात आली होती.
09:49 November 15
बनावट नोटा प्रकरणी चार आरोपींना १२ वर्षाची शिक्षा
बनावट नोटा प्रकरणी नागपूर विशेष एनआयए न्यायालयाने चार आरोपींना १२ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तर तीन आरोपींना प्रत्येकी १४ लाख आणि एका आरोपीला २० लाखांचा दंड ठोठावला आहे. २०१५ सालच्या या प्रकरणात एनआयए विशेष कोर्टाने युएपीए कायद्याखाली निकाल देत आरोपींचे कृत्य दहशतवादी कृत्य असल्याचे नमूद करीत शिक्षा सुनावली आहे.Body:४ ऑक्टोबर २०१५ ला नागपूर रेल्वे स्टेशनवर बनावट नोटासह एक व्यक्ती येत असल्याची गुप्त माहिती नागपूर एटीएस ला प्राप्त झाली
08:50 November 15
मिझोराममध्ये सापडले आठ मृतदेह
मिझोरामच्या ह्नथियाल जिल्ह्यातील मौदर्ह गावात घटनास्थळावरून आतापर्यंत आठ मृतदेह सापडले आहेत. दोन अधिकारी आणि 13 कर्मचार्यांचा समावेश असलेले एनडीआरएफचे पथक मंगळवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले, शोध मोहीम सुरू: ह्नथियाल डीसी आर लालरेमसांगा
07:57 November 15
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील मतदानात भारतासह 73 राष्ट्रांची गैरहजेरी
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे झालेल्या नुकसानीसाठी मायदेशी परत आणणे आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आवाहन करणाऱ्या ठरावाच्या बाजूने सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मतदान केले. 94 देशांनी ठरावाच्या बाजूने तर 14 देशांनी विरोधात मतदान केले. भारतासह 73 राष्ट्रांनी गैरहजेरी लावली आहे.
07:18 November 15
ही बहुराष्ट्रीय कंपनी १० हजार लोकांना दाखविणार घरचा स्ता रस्ता
अॅमेझॉन या आठवड्यात सुमारे 10,000 लोकांना कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाच्या नोकऱ्यांमधून काढून टाकण्याची योजना आखली आहे. नोकऱ्यांमधील कपात अमेझॉनच्या डिव्हाइसेस संस्था, तिचा किरकोळ विभाग आणि मानवी संसाधनांवर लक्ष केंद्रित करेल, असे कंपनीने म्हटले आहे.
06:48 November 15
जितेंद्र आव्हाड विनयभंग गुन्हे प्रकरणात वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्या, महिला आयोगाचे रुपाली चाकणकर यांना आदेश
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी महिला आयोगाकडे केली आहे. तक्रार अर्जात म्हटले, की आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबावतंत्र वापरुन दाखल केला आहे. सदर गुन्हा रद्द करुन फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
06:20 November 15
Maharashtra Breaking news 1993 मुंबई बॉम्बस्फोट : 29 वर्षानंतर पकडलेल्या चार आरोपीं विरोधात आरोपपत्र
मुंबई काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 27 वर्षीय श्रद्धा वाकरच्या निर्घृण हत्येचा निषेध केला आहे आणि म्हटले आहे की गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. रमेश यांनी ट्विटरवर म्हटले की, श्रद्धा आणि भारतातील मुलींना न्याय मिळायला हवा.