महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking news भारत समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावरून चालावे लागेल - राहुल गांधी - Etv Bharat breaking news

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Nov 9, 2022, 7:10 AM IST

Updated : Nov 9, 2022, 7:42 PM IST

19:40 November 09

भारत समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावरून चालावे लागेल - राहुल गांधी

नांदेड - शेतकरी आणि कामगारांचा भारत वाहनाने प्रवास करत नाही, तो रस्त्यावर चालतो. हे विमान, हेलिकॉप्टर किंवा वाहनांमधून समजू शकत नाही. तो भारत समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावरून चालावे लागेल, असे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. नांदेड येथील नायगाव येथे त्यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

18:48 November 09

संजय राऊत यांची तुरुंगातून अखेर सुटका, सिद्धी विनायकाचे दर्शन घेण्यासाठी रवाना

मुंबई - खासदार संजय राऊत यांची सुटका. स्पेशल पीएमएलए कोर्टाने जामिन मंजूर केल्यानंतर संजय राऊत तुरुगांतून बाहेर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर मोठ्या प्रमाणात लोक आणि शिवसैनिक जमा झाले आहेत. सुटका झाल्यानंतर राऊत थेट सिद्धी विनायकाचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन घरी जाण्याची शक्यता आहे.

18:34 November 09

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

नवी दिल्ली -भारतीय जनतापक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक पक्षाच्या मुख्यालयात होत आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि इतर नेते उपस्थित आहेत. या बैठकीत महत्वाची चर्चा होणार आहे.

18:13 November 09

भारत जोडो यात्रेत रायगड जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार, आदिवासी होणार सहभागी

रायगड - सर्वहारा जन आंदोलनच्या नेतृत्वाखाली आदिवासी, शेतमजूर, शेतकरी, मच्छिमार बांधव उद्या सकाळीच नांदेड येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निघणार आहेत. महाराष्ट्रात विविध जनसंघटनांनी एकत्र येऊन भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी व यात्रेमधील सहभाग नियोजित पद्धतीने करण्यासाठी व्यापक प्रक्रिया चालवली. यात्रेमधे रोज विविध मुद्यांवर मांडणी केली जाणार आहे. राहुल गांधींना रोज संबंधित शिष्टमंडळ भेटून चर्चा करणार आहे.

16:56 November 09

संजय राऊत यांच्या जामिनावर स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई -ईडीतर्फे संजय राऊत यांना जामिन देण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर उच्च न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामिनावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टासमोर ईडीने या प्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. मुंबई हाय कोर्टात ईडीच्या अर्जावर सुनावणी झाली.

16:48 November 09

राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान

मुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली आहे.

15:42 November 09

संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई -ईडीतर्फे संजय राऊत यांना जामिन देण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान.न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टासमोर ईडीने या प्रकरणी तातडीची सुनावणीची केली मागणी. काही वेळात मुंबई हाय कोर्टात ईडीच्या अर्जावर होणार सुनावणी.

15:29 November 09

दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम - जितेंद्र आव्हाड यांचे राऊत यांच्या सुटकेनंतर ट्विट

मुंबई - संजय राऊत यांच्या जामीनानंतर जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट. दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम, असे ट्विट करुन जुना फोटो आव्हाड यांनी केला शेअर. वेल कम बॅक, असे केले ट्विट.

15:06 November 09

संजय राऊत जेलमधून बाहेर येणार हे निश्चित

मुंबई - संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा. संजय राऊत यांच्या जामीन विरोधातील ईडीची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळली. संजय राऊत आज जेलमधून बाहेर निघणार.

15:00 November 09

न्यायदेवतेचे आभार मानतो - संजय राऊत

मुंबई - संजय राऊत यांची पी एम एल ए न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया. न्यायालयाच्या आवारात व्यक्त केली प्रतिक्रिया. न्यायदेवतेचे आभार मानतो, संजय राऊत यांची प्रतिक्रिया. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांचे अभिनंदन. जामीन आनंतर उद्धव ठाकरे यांनी केले राऊत यांचे अभिनंदन.

14:52 November 09

मध्य रेल्वेवर 12 डिसेंम्बरपर्यन्त इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉक

मुंबई - मध्य रेल्वे 8 नोव्हेंबर 2022 ते 12 डिसेंबर 2022 पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायाभूत सुविधांचा ब्लॉक घेईल. ज्यामुळे पुढील गाड्या प्रत्येक नमूद केलेल्या तारखांपासून शॉर्ट टर्मिनसवरुन सोडल्या जातील. अर्थात त्या छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यन्त न येता पनवेल, ठाणेपर्यन्त येतील. तेथूनच पुन्हा रवाना होतील.

14:09 November 09

अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाराला 10 लाखांचं बक्षिस

जालना - कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा महेश तौर यांनी केली आहे. रेखा महेश तौर या असंघटीत कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा आहेत. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे आज राज्यभरात पडसाद उमटले आहेत. आजही ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आले. त्याचबरोबर सत्तार यांचे जो कुणी कपडे फाडेल त्याला दहा लाख रुपये बक्षीस दिले जाईल अशी घोषणाच रेखा महेश तौर यांनी केली आहे.

13:41 November 09

ईडीच्या अर्जावरील निर्णयानंतरच संजय राऊत जेलमधून बाहेर येणार की नाही ते ठरणार

मुंबई -ईडीच्या अर्जावर दुपारी 3 वाजता मुंबई सत्र न्यायालय देणार निर्णय आहे. त्यानंतरच संजय राऊत आज जेलमधून बाहेर येणार की आणखी मुक्काम वाढणार स्पष्ट होणार आहे.

13:14 November 09

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्यात जामीन मंजूर

12:54 November 09

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

मुंबई - पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील पीएमएलए कोर्ट आज निर्णय देणार आहे.

12:17 November 09

दीपाली सय्यद शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता

मुंबई - अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्या शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता आहे. त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

12:11 November 09

शरद पवार आदित्य ठाकरे 11 नोव्हेंबरला काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत

नांदेड - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे 11 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या 'भारत जोडो यात्रे'त सामील होतील. तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उद्या सामील होतील. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.

11:53 November 09

ट्रॉन्सफार्मरमध्ये बिघाडामुळे स्टील कंपनीमध्ये भीषण आग

जालना -औद्योगिक वसाहतीत असलेल्या राजुरी स्टील कंपनीमध्ये काल मंगळवारी रात्री अकरा वाजेदरम्यान मोठी आग लागली. ही आग विजेच्या ट्रॉन्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे लागली असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस घटनास्थळावर दाखल झाले नंतर आग विझवण्यात आली.

11:41 November 09

मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या महिलानेत्या राज्यपालांना भेटणार

मुंबई -कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेला आक्षेपार्ह वक्तव्याचा राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध नोंदवला जात आहे. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाही राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी असे संबोधल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्हीही मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे. आता या दोन्ही नेत्यांनी केलेल्या आक्षपार्ह वक्तव्याबाबत दोन्ही पक्षाच्या महिला नेत्यांचे शिष्टमंडळ राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करणार आहेत.

10:40 November 09

सुमारे 5000 कोटी रुपये खर्चून कर्नाटकात विमानतळ, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन करणार आहेत. हे विमानतळ सुमारे 5000 कोटी रुपये खर्चून बांधले गेले.

10:39 November 09

डेक रुळावरून घसरल्याने अनेक गाड्या रद्द

राजमुंद्री यार्ड येथे डाउन मेन लाईनवर एनएमजी रेक रुळावरून घसरल्यामुळे, 9 नोव्हेंबर रोजी अनेक गाड्या रद्द/अंशत: रद्द/पुनर्निर्धारित केल्याचे दक्षिण मध्य रेल्वेने म्हटले आहे.

09:49 November 09

नांदेड येथून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील नांदेड येथून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली

09:46 November 09

येरवडा कारागृहात दोन कैद्याच्या गटात तुफान दगडफेक, 4 कैद्याविरोधात गुन्हे दाखल

पुण्यातील प्रसिद्ध येरवडा कारागरात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे.जुने कैदी आणि नवीन कैद्या एकमेकावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदारांला कैद्याच्या जमावाने केली मारहाण केली आहे.

09:15 November 09

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा शासकीय तांदूळ पोलिसांनी पकडला

गुजरातच्या काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा शासकीय तांदूळ पोलिसांनी पकडला. ही कार्यवाही आयपीएस ब . धीरजकुमार यांनी तालखेड तालखेड फाटा येथे करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे . लेलँड कंपनीच्या १४ टायर ट्रक क्रमांक एम.एच. २१ , बीजी २२१८ या ट्रक मधून राशनचा तांदूळ तालखेड फाट्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.

08:55 November 09

ट्विटरपाठोपाठ फेसबुकदेखील करणार कर्मचाऱ्यांमध्ये कपात

ट्विटरपाठोपाठ फेसबुकदेखील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणार आहे. याला कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीदेखील पुष्टी दिली आहे.

08:07 November 09

उत्तर प्रदेशमध्ये अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार

किश्नी पीएस अंतर्गत एका अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता. माहिती मिळाल्यानंतर पीडितेचे तातडीने मेडिकल केले. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी जगमोहन यादव याला अटक करण्यात आली. याप्रकरणी आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

07:55 November 09

उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीड तास चर्चा केली.

07:43 November 09

इलॉन मस्क यांनी 3.95 अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स विकले

अब्जाधीश उद्योजक आणि ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी 3.95 अब्ज डॉलर किमतीचे 19.5 दशलक्ष टेस्ला शेअर्स विकले. ही माहिती अमेरिकन शेअर बाजाराने दिली आहे.

07:12 November 09

पिथौरागढमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आज सकाळी ६.२७ वाजता उत्तराखंडमधील पिथौरागढमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीपासून ५ किमी खाली होती, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने म्हटले आहे. दरम्यान, नेपाळमध्ये भूकंपात ६ जणांचा मृत्यू झाला.

07:10 November 09

भारतीय महिलेचे उत्तुंग यश, मेरीलँडमध्ये लेफ्टनंट गव्हर्नपदी नियुक्ती

अरुणा मिलर या भारतीय-अमेरिकन महिला आहेत. त्या मेरीलँडमध्ये लेफ्टनंट गव्हर्नरचे पद धारण करणाऱ्या पहिल्या स्थलांतरित व्यक्ती ठरल्या आहेत.

07:00 November 09

Maharashtra Breaking news सुमारे 5000 कोटी रुपये खर्चून कर्नाटकात विमानतळ, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

मुंबईराज्यात 100 किंवा त्याहून अधिक वयोगटातील 2.5 लाखांहून अधिक मतदार आहेत, ही माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. ते पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मतदार जागृती सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बोलत होते.

Last Updated : Nov 9, 2022, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details