महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News Live : धारावी येथील नाल्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह - Andheri bypolll election result

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Nov 6, 2022, 6:28 AM IST

Updated : Nov 6, 2022, 10:07 PM IST

22:06 November 06

धारावी येथील नाल्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

मुंबई -धारावी येथील नाल्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नाल्यातून मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी सायन रुग्णालयात पाठवला आहे. धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

21:46 November 06

पुण्याहून बेंगळुरूला जाणारे एअरएशियाचे फ्लाईट तांत्रिक कारणामुळे रद्द

पुण्याहून बेंगळुरूला जाणारे एअरएशिया इंडियाचे फ्लाइट i5-1427 तांत्रिक कारणामुळे टेक ऑफ रद्द केले आहे. विलंबामुळे अतिथींना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरएशिया इंडियाने खेद व्यक्त केला आहे.

21:39 November 06

मी आजी झाले याचा मला प्रचंड आनंद - नीतू कपूर

मुंबई -आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना मुलगी झाले आहे. त्यामुळे मी खरोखर आनंदी आहे. आलिया पूर्णपणे ठीक आहे, अशी माहिती अभिनेत्री नीतू कपूर यांनी दिली आहे.

21:16 November 06

पोटनिवडणूक निकालात भाजपला चार जागा, आरजेडी- शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर विजय

पोटनिवडणूक निकालात भाजपला चार जागा, RJD ला एक तर शिवसेनेला एका जागेवर विजय मिळवता आला. या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

21:12 November 06

गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू

सातारा : पाटण तालुक्यातील शिरळ गावच्या शेतकर्‍याचा रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू (Rangawa attack Farmer death) झाल्याची घटना समोर आली आहे. हरिबा सुर्यवंशी, असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. गुरे चारण्यासाठी गायरानात गेल्यानंतर समोर आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला (Rangawa attack on farmer) केला. रात्री उशीरापर्यंत ते घरी न आल्यामुळे गायरानात त्यांचा शोध घेत असताना ते मृतावस्थेत आढळून आले. (Farmer found dead)

21:11 November 06

योगी सरकार तयार करणार नवीन जिम कॉर्बेट पार्क

लखनौ :राज्यात येणाऱ्या पर्यटक आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी योगी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. त्यासाठी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला लागून असलेला उत्तर प्रदेशचा भाग विकसित करण्याची (New Jim Corbett Park to be built by Yogi government in up) योजना आहे. वाघ ज्या भागात फिरतात त्या भागाच्या संरक्षणासाठी सरकार एक मोहीम राबवणार आहे. या भागाला 'न्यू जिम कॉर्बेट' असे नाव देण्याचा विचार केला जात आहे. स्थानिक-परिवर्तनशील वन्यजीव लोकसंख्येसाठी सुरक्षित आश्रयस्थान प्रदान करणे आणि अशा प्रकारच्या अद्वितीय वनक्षेत्राचे संरक्षण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. (instructions given in high level meeting)

21:11 November 06

हॅन्डग्रेनेड सापडल्याने नगर तालुक्यात पुन्हा खळबळ, घटनास्थळी पोलीस तैनात

अहमदनगर :तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणडोह येथे आज रविवारी दुपारी बारा वाजेचे सुमारास हॅन्डग्रेनेड सापडल्याने (hand grenade found in Ahmednagar taluka) एकच खळबळ (Excitement over discovery of hand grenades) उडाली. हे हॅन्डग्रेनेड फार वर्षांपूर्वीचे (hand grenades from many years ago) असल्याची माहिती असून ते 1814 सालातील हॅन्डग्रेनेड असल्याची सूत्रांची माहिती आहे.

21:11 November 06

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उद्या हजारो पणत्यांनी उजळून निघणार पंचगंगा नदी घाट

कोल्हापूर :कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा घाट उद्या पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघणार आहे. कोल्हापुरातील विविध सामाजिक सेवा संस्था आणि नागरिकांच्यावतीने दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त ( Occasion on Tripurari Poornima ) पंचगंगा नदी घाटावर ( Panchganga river ghat in kolhapur ) हजारो पणत्या प्रज्वलित करुन आनंद साजरा केला जातो. बोचरी थंडी असतानाही मिण-मिणत्या हजारो पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकर दरवर्षी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी करत असतात. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे तो उत्साह साजरा करता आला नाही, मात्र उद्या मोठ्या उत्साहात हा दीपोत्सव साजरा होणार असल्याची संयोजकांनी माहिती दिली आहे.

20:17 November 06

ठाण्यातील दिवा डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग

ठाणे - जिल्ह्यातील दिवा डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

19:53 November 06

चंद्रपूर जिल्ह्यातील 419 गावांची आणेवारी 50 पैशाहुन कमी; अतिवृष्टीमुळे बसला फटका

चंद्रपूर :जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील एकूण १८३६ गावांपैकी तब्बल ४१९ गावांतील आणेवारी ही 50 पैशांहून कमी आलेली आहे.

19:49 November 06

मुंबईत आज ६७ नवे कोरोना रुग्ण, शून्य मृत्यू

मुंबई :गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांची (67 NEW ADDED CORONA PATIENTS) संख्या शंभरच्या खाली आली आहे. आज ६७ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या अडीच वर्षात १५७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ४६५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. Mumbai Corona Update .CORONA PATIENTS INCREASES IN MUMBAI

18:20 November 06

आमच्या विरोधात कारस्थानं करूनही आम्ही जिंकलो - उद्धव ठाकरे

मुंबई : आमच्या विरोधात कारस्थानं करूनही आम्ही पोटनिवडणूक जिंकली. ही आमच्या विजयाची सुरुवात आहे. आमचे नाव आणि चिन्ह गोठवले गेले, ज्यांच्यामुळे आमच्या पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठले त्यांच्याबद्दल बोलणे मूर्खपणाचे आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी लटके यांच्या विजयानंतर दिली आहे.

16:56 November 06

नीरा नदीवरील सारोळा पुलावरून नदीत उडी मारुन तरुणाची आत्महत्या

सातारा :अज्ञात तरूणाने नीरा नदीवरील सारोळा पुलावरून ( jumping into Neera river in satara ) नदीत उडी मारून आत्महत्या केली ( Suicide in satara ) आहे. रेस्क्यू टीमच्या मदतीने तरूणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

16:56 November 06

विजयाची मशाल अखंड तेवत राहण्यासाठी आम्ही सतत कार्यरत - आदित्य ठाकरे

अंधेरी पोटनिवडणूकीत दणदणीत यश मिळवून विजयी झालेल्या श्रीमती ऋतुजा लटके यांच्या विजयाचा आनंद शिवसेना परिवारासह उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर साजरा केला. हा निष्ठेचा विजय आहे आणि विजयाची ही मशाल अखंड तेवत राहण्यासाठी आम्ही सारे शिवसैनिक सतत कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

15:29 November 06

अंतिम मतमोजणी

अंतिम मतमोजणी

महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत उमेदवारांना टपाली मतपत्रिका (पोस्टल) आणि 'ईव्हीएम' याद्वारे मिळालेली एकत्रित अंतिम मते खालील प्रमाणे :

१) श्रीमती ऋतुजा लटके: ६६५३०

२) श्री. बाला नाडार : १५१५

३) श्री. मनोज नायक : ९००

४) श्रीमती नीना खेडेकर : १५३१

५) श्रीमती फरहाना सय्यद : १०९३

६) श्री. मिलिंद कांबळे : ६२४

७) श्री. राजेश त्रिपाठी : १५७१

आणि

नोटा : १२८०६

एकूण मते : ८६५७०

14:02 November 06

ऋतुजा लटके यांची १९ फेऱ्यांमध्ये सर्वाधिक आघाडी, मिळविले ६६२४७ मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

शेवटची फेरी. (१९)

ऋतुजा लटके - ६६२४७

बाळा नडार - १५०६

मनोज नाईक - ८८८

मीना खेडेकर - १५११

फरहान सय्यद - १०८७

मिलिंद कांबळे - ६१४

राजेश त्रिपाठी - १५६९

नोटा - १२७७६

एकूण - ८६१९८

13:49 November 06

पतीचा वचननामा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन-ऋतुजा लटके

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

सतरावी फेरी. (१७)

ऋतुजा लटके - ६१९५६

बाळा नडार - १३९०

मनोज नाईक - ८४२

मीना खेडेकर - १३९४

फरहान सय्यद - १०००

मिलिंद कांबळे - ५८४

राजेश त्रिपाठी - १४५२

नोटा - १२१६६

एकूण - ८०७८४

सर्वांनी मला पाठिंबा दिला म्हणून सर्वांचे मी आभार मानते. पोटनिवडणुकीत मतदान कमीच होते. सहानुभूती व माझ्या पतीची मेहनत याचा हा परिणाम आहे. माझ्या पतीने एक वचन नामा दिला होता. तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन.

भाजप कडे सहानुभूती असती तर त्यांनी अगोदर फॉर्म भरलाच नसता. नोटाला भेटलेली मते ही भाजपचीच, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

आठरावी फेरी.

ऋतुजा लटके - 62335

बाळा नडार - 1485

मनोज नाईक - 875

मीना खेडेकर - 1489

फरहान सय्यद - 1058

मिलिंद कांबळे - 606

राजेश त्रिपाठी - 1550

नोटा - 12691

एकूण - 85089

ऋतुजा लटके यांनी घेतली त्यांचे दिवंगत पती रमेश लटके यांच्यापेक्षा जास्त मते. २०१९ मध्ये रमेश लटके यांना भेटली होती६२,७७३ मते. १८ फेरी नंतर ऋतुजा लटके यांना भेटली आहेत ६५३३५ मते. अजून एक शेवटची फेरी बाकी.

13:22 November 06

ऋतुजा लटके विजयाच्या दिशेने, सोळाव्या फेरीअखेर 58875 मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

सोळावी फेरी. (16)

ऋतुजा लटके - 58875

बाळा नडार - 1343

मनोज नाईक - 812

मीना खेडेकर - 1347

फरहान सय्यद - 971

मिलिंद कांबळे - 567

राजेश त्रिपाठी - 1380

नोटा - 11569

एकूण - 76855

13:16 November 06

पंधराव्या फेरीअखेर ऋतुजा लटके यांना 55946 मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

पंधरावी फेरी. (15)

ऋतुजा लटके - 55946

बाळा नडार - 1286

मनोज नाईक - 785

मीना खेडेकर - 1276

फरहान सय्यद - 932

मिलिंद कांबळे - 546

राजेश त्रिपाठी - 1330

नोटा - 10906

एकूण - 73007

13:03 November 06

चौदाव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना ५२,५०७ मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

चौदावी फेरी. (14)

ऋतुजा लटके - 52507

बाळा नडार - 1240

मनोज नाईक - 748

मीना खेडेकर - 1190

फरहान सय्यद - 897

मिलिंद कांबळे - 519

राजेश त्रिपाठी - 1291

नोटा - 10284

एकूण - 68676

नोटाने ओलांडला १० हजार चा आकडा. नोटाला आतापर्यंत १०,२८४ मते.

ऋतुजा लटके यांनी पर केला ५० हजार चा आकडा..१४ फेरीनंतर ऋतुजा लटके यांना ५२,५०७ मते.

12:50 November 06

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीत ऋतुजा लटके यांना 48015 मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीत ऋतुजा लटके यांना 48015 मते मिळाली आहेत.

तेरावी फेरी. (13)

ऋतुजा लटके - 48015

बाळा नडार - 1151

मनोज नाईक - 708

मीना खेडेकर - 1156

फरहान सय्यद - 859

मिलिंद कांबळे - 499

राजेश त्रिपाठी - 1211

नोटा - 9547

एकूण - 63146

12:24 November 06

अजून ८ फेऱ्या बाकी, ऋतुजा लटके यांना ७० हजारांपेक्षा अधिक मते मिळणार?

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत १९ फेऱ्या आहेत. अजून ८ फेऱ्या बाकी आहेत. ऋतुजा लटके यांना ७० हजाराच्या आसपास मते मिळण्याची शक्यता आहे.

12:13 November 06

ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

अकरावी फेरी.

ऋतुजा लटके - 42343

बाळा नडार - 1052

मनोज नाईक - 622

मीना खेडेकर - 948

फरहान सय्यद - 753

मिलिंद कांबळे - 455

राजेश त्रिपाठी - 1067

नोटा - 8379

एकूण - 55619

12:10 November 06

ऋतुजा लटके यांना ३७७५२ मते मिळाली, विरोधी उमेदवारांना हजाराच्या आतच!

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

दहावी फेरी. (10)

ऋतुजा लटके - 37469

बाळा नडार - 975

मनोज नाईक - 584

मीना खेडेकर - 898

फरहान सय्यद - 720

मिलिंद कांबळे - 428

राजेश त्रिपाठी - 986

नोटा - 7556

एकूण - 49616

आतापर्यंत १० फेरीनंतर ५० हजार मतांची मतमोजणी पूर्ण. ऋतुजा लटके यांना ३७४६९ अधिक २८३ टपाल मते अशी एकूण ३७७५२ मते मिळाली आहेत. तर नोटाला ७५५६ मते भेटली आहेत. १० फेऱ्यांची मतमोजणी होऊनही ऋतुजा लटके यांच्या विरोधात उभा असलेल्या ६ पैकी एकाही उमेदवाराला १ हजार मतांचा टप्पा अजून ओलांडता आला नाही.

11:50 November 06

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या नवव्या फेरीपर्यंत ऋतुजा लटकेंना 32515 मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

नववी फेरी. (9)

ऋतुजा लटके - 32515

बाळा नडार - 897

मनोज नाईक - 543

मीना खेडेकर - 863

फरहान सय्यद - 667

मिलिंद कांबळे - 409

राजेश त्रिपाठी - 889

नोटा - 6637

एकूण - 43420

11:40 November 06

अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाने ५ हजारांचा टप्पा ओलांडला

अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नोटाला आठव्या फेरी अखेर ५६५५ मते मिळाली आहेत.

11:32 November 06

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणी फेरीत दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला -819 मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

आठव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

*ऋतुजा लटके -29033*

*बाळा नाडार -819*

मनोज नाईक - 458

मीना खेडेकर - 789

फरहान सय्यद - 628

मिलिंद कांबळे - 358

राजेश त्रिपाठी - 787

*नोटा - 5655*

एकूण मतमोजणी - 38527

11:17 November 06

टपाल मतदानाही ऋतुजा लटके यांनी राखली आघाडी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

टपाल मतदान

ऋतुजा लटके - २८३

बाळा नडार -९

मनोज नाईक -१२

मीना खेडेकर -२०

फरहान सय्यद -६

मिलिंद कांबळे - १०

राजेश त्रिपाठी - २

नोटा -३०

अवैध्य - २२

एकूण - ३९४

11:12 November 06

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या सातव्या फेरीत ऋतुजा लटके यांनी इतकी मते मिळाली?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

सातवी फेरी. (७)

ऋतुजा लटके - 24955

बाळा नडार -733

मनोज नाईक -416

मीना खेडेकर -646

फरहान सय्यद -545

मिलिंद कांबळे - 312

राजेश त्रिपाठी - 679

नोटा -4712

एकूण -32998

10:56 November 06

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांची नाराजी, कमी टक्केवारीनंतर आता नोटाला पसंती

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

सहावी फेरी. (६)

ऋतुजा लटके - २१०९०

बाळा नडार - ६७४

मनोज नाईक - ३९८

मीना खेडेकर - ५८७

फरहान सय्यद -४४८

मिलिंद कांबळे - २९१

राजेश त्रिपाठी - ६२१

नोटा - ४३३८

एकूण - २८४४७

10:45 November 06

ऋतुजा लटके यांची पाचव्या फेरीतही आघाडी कायम

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

पाचवी फेरी. (5)

ऋतुजा लटके - 17278

बाळा नडार - 570

मनोज नाईक - 365

मीना खेडेकर - 516

फरहान सय्यद - 378

मिलिंद कांबळे - 267

राजेश त्रिपाठी - 538

नोटा - 3859

एकूण - 23771

10:37 November 06

चौथ्या फेरीत ऋतुजा लटके यांना 14648 मते, दुसऱ्या क्रमांकावर या उमेदवाराला मिळाली मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

चौथी फेरी. (4)

ऋतुजा लटके - 14648

बाळा नडार - 505

मनोज नाईक - 332

मीना खेडेकर - 437

फरहान सय्यद - 308

मिलिंद कांबळे - 246

राजेश त्रिपाठी - 492

नोटा - 3580

एकूण - 20548

10:14 November 06

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत तिसरी फेरी, नोटांना मिळालेली मते धक्कादायक

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

दुसरी फेरी. (3)

ऋतुजा लटके - 11361

बाळा नडार - 432

मनोज नाईक - 207

मीना खेडेकर - 281

फरहान सय्यद - 232

मिलिंद कांबळे - 202

राजेश त्रिपाठी - 410

नोटा - 2967

एकूण - 16092

10:04 November 06

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल, दुसऱ्या फेरीत कोण आहे पुढे?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल

दुसरी फेरी. (२)

ऋतुजा लटके - 7817

बाळा नडार -339

मनोज नाईक -113

मीना खेडेकर -185

फरहान सय्यद -154

मिलिंद कांबळे - 136

राजेश त्रिपाठी - 223

नोटा -1470

एकूण -10437

ऋतुजा लटके यांना दुसऱ्या फेरीनंतर एकूण ७८१७ मते तर नोटा ला १४७० मते पडली आहेत.

09:25 November 06

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर

पहिली फेरी. (१)

ऋतुजा लटके - ४२७७

बाळा नडार -२२२

मनोज नाईक -५६

मीना खेडेकर -१३८

फरहान सय्यद -१०३

मिलिंद कांबळे - ७८

राजेश त्रिपाठी - १२७

नोटा -६२२

एकूण - ५६२४

पहिल्या फेरीत ऋतुजा लटके (४२७७) यांच्या पाठोपाठ नोटाला जास्त मते (६२२) मिळाली आहेत.

09:18 November 06

उत्तराखंडच्या अनेक भागात रविवारी भूकंपाचे धक्के

उत्तराखंडच्या अनेक भागात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. डेहराडूनपासून उत्तरकाशीपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. या दरम्यान लोक घराबाहेर पडले आहेत. उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयासह दुंडा, भटवाडी, बरकोट आणि नौगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी आहे.

09:08 November 06

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मतमोजणीला सुरुवात

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाल मतदान मोजणी संपली आहे.

08:48 November 06

बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

बीड जिल्ह्यात हजारो हेक्टरवर कापूस लागवड झालेली आहे. त्यातच कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी परतीच्या पावसाला मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आ. हे परतीच्या पावसानं हाकार माजवला, हात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून गेल्याचे चित्र बीड जिल्ह्यात यावर्षी पाहायला मिळत आहे. जे कापूस उत्पादन निघायला पाहिजे ते उत्पादन निघाले नाही त्या मालाला भावही नाही त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे.

08:29 November 06

रांजणगाव एमआयडीसी तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदाराला अटक

पुणे: पुण्यातील रांजणगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या फियाट कंपनीत मैलामिष्रीत पाण्यात बुडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीसांकडून या प्रकरणी ठेकेदाराला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

08:09 November 06

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, मतमोजणीत १९ फेऱ्या होणार

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीत १९ फेऱ्या होणार आहेत. टपाल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ८ ते ८:३० पर्यंत टपाल मतमोजणी होणार आहे. साडेआठनंतर ८:३० ईव्हीएम यंत्रणेद्वारे झालेल्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

07:09 November 06

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात जाहीर सभा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित करतील. भावनगरमधील सामूहिक विवाह समारंभाला उपस्थित राहतील. वलसाड जिल्ह्यातील कपराडा गावात दुपारी ३ वाजता पंतप्रधान मोदी जाहीर सभेला संबोधित करतील. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांची त्यांच्या गुजरातला ही पहिलीच भेट असेल.

06:51 November 06

कुस्तीपटू सुशील कुमारची तिहार तुरुंगातून जामिनावर सुटका

कुस्तीपटू सुशील कुमारला सागर धनकर खून प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर रात्री तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला वेगळ्या गेटमधून सोडण्यात आले. पाठीच्या खालच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

06:47 November 06

राखी सावंतची शर्लिन चोप्राच्या विरोधात पोलिसात तक्रार

राखी सावंतने शर्लिन चोप्राच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप राखी सावंतने केला आहे. शर्लिनने नुकतेच आरोपी चित्रपट निर्माता साजिद खान विरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती.

06:32 November 06

माजी मंत्री नसीम खान यांच्या उजव्या पायाला अपघातात दुखापत

राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरिफ (नसीम) खान यांच्या उजव्या पायाला अपघातात दुखापत झाली आहे. ते हैदराबादहून नांदेडला 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी जात होते.

06:13 November 06

Maharashtra Breaking news ऋतुजा लटके यांची १९ फेऱ्यांमध्ये सर्वाधिक आघाडी, मिळविले ६६२४७ मते

मुंबई अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान हे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आले होते. मतदानानंतर आज (रविवार ६ नोव्हेंबर २०२२) मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे ३०० अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच २० सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजेरी लावणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.

Last Updated : Nov 6, 2022, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details