दिवाळी मुहूर्ताचा व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स ६५१.१६ अंकांनी वाढला, सध्या ५९,९५८.३१ वर स्थिर आहे
Breaking News Live : मुंबईत दिवाळी मुहूर्त ट्रे़डिंग सुरू; सेन्सेक्स ६५१.१६ अंकांनी वाढला - Breaking news update
18:45 October 24
मुंबईत दिवाळी मुहूर्त ट्रे़डिंग सुरू; सेन्सेक्स ६५१.१६ अंकांनी वाढला
18:28 October 24
शिंदे गटाच्या आमदाराने शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेवण करत केली दिवाळी साजरी
बुलढाणा - शिवसेना-एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराने शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेवण केले. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली असून ते दिवाळी साजरी करत नाहीत. त्यांच्यासोबत जेवून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया आमदार एस गायकवाड
17:01 October 24
दिवाळीनिमित्त मंदीरात जाणाऱ्या मायलेकीवर बिबट्याचा हल्ला, दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
मुंबई - गोरेगाव येथील आरे परिसरात सोमवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दिवाळी पहाटच्या निमित्ताने आईसोबत सकाळी मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या इतिका अखिलेश लोटे या दीड वर्षांच्या मुलीवर वाटेतच बिबट्याने हल्ला केला..
15:18 October 24
परिवहन सेवेच्या बसमधून गॅस गळती; प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली
ठाणे :ऐन दिवाळीत कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅलसमोर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या सीएनजी बसमधून गॅस गळती झाली. मेट्रो माॅल भागातील बघ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा करुन चालकाला बस थांबविण्याचा इशारा केला. चालकाने बस थांबविताच बसच्या सीएनजी टाकीतून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी उपाययोजना करून गॅस गळती रोखली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
14:06 October 24
श्रीनगरमध्ये सापडली संशयास्पद पिशवी
परिमपोरा, श्रीनगर अंतर्गत बागांमध्ये एक लहान गॅस सिलेंडर आणि युरिया असलेली एक संशयास्पद पिशवी सापडली. ही माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
14:02 October 24
भंगार वाहनांची समस्या सुटणार
मुंबई वाहनांची ऐच्छिक विल्हेवाट लावणाऱ्यांना (स्क्रॅपिंग) करणाऱ्यांना व्याज व दंड माफ करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे भंगारवाहनांचा प्रश्न सुटण्यास आता मदत होणार आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये भंगार वाहनांची संख्या कमी झाल्यास रस्त्यावरील वाहनांची गर्दी सुद्धा कमी होणार आहे.
13:25 October 24
आदिवासी पाड्यांवर 'एक करंजी प्रेमाची' उपक्रम संपन्न : महिलांना साड्यांचे वाटप
पालघर व ठाणे जिल्ह्यामधील आदिवासी- डोंगराळ भागामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या शिवक्रांती सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी 'एक करंजी प्रेमाची ' हा उपक्रम राबविण्यात येतो. समाजातील विविध घटकांकडून करंजी , मिठाई , कपडे , साड्या , लाडू व फराळाचे साहित्य भेट म्हणून मिळवून त्यांचे वाटप गोर - गरिबांना करण्यात येते. गेली ते ३३ वर्ष हा उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतो. यावर्षीही वाडा तालुक्यातील तरेपाडा व वळवीपाडा या गावापासुन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शरद यशवंत पाटील यांच्या हस्ते करंजी व फराळाचे वाटप करण्यात आले.
13:22 October 24
२८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक
माटुंगा परिसरात एका २८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 302, 504 आणि 506 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाईल, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
13:05 October 24
अभियांत्रिकी शिक्षणसाठी विद्यार्थ्याला चार दिवसात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई- कोल्हापूर येथील विद्यार्थ्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका निकाली काढत ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांना फटकारले आहे, विद्यार्थ्याला चार दिवसात जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला मोठा दिलासा मिळाला आहे,
12:44 October 24
मेलबोर्नमध्ये मॅच पाहायला बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली - एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे आज ठाण्यात मासुंदा तलाव भागात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांनी सर्व युवकांशी संवाद साधला. यावेळी काल भारत पाकिस्तान मॅचच्या विजयानंतर आम्हीदेखील तीन महिन्यांपूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकलो असे सांगितले. युवकांना ही मॅच आवडली का, असा सवालदेखील विचारला. युवकांनी ही मॅच आवडल्याचे प्रत्युत्तर दिले. मेलबोर्नमध्ये मॅच पाहायला बाळासाहेबांची शिवसेना पोहचली हे देखील त्यांनी अभिमानाने सांगितले.
12:23 October 24
व्हायरल इनफेक्शनचा नेत्यांनाही बसला होता फटका
पुणे- परतीचा पाऊस लांबल्याने सर्दी खोकल्याच्या आजारात वाढ झेलेली पाहायला मिळत आहे. शहरात मोठ्या प्रमाणत व्हायरल इन्फेक्शनचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना सर्दी खोकल्याच आजार होत आहे.आत्ता राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनादेखील या व्हायरल इन्फेक्शनचा फटका बसला होता. त्यांना दौरा रद्द करावा लागला होता.
12:04 October 24
फलटण येथे राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन
फलटण येथे राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ ऑक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत ३० राज्यांमधील ६० संघ सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.
11:03 October 24
तुमच्या सर्वांमध्ये दिवाळी साजरी करणे हा एक विशेषाधिकार-पंतप्रधान नरेंद्र मोदी
माझ्यासाठी, तुम्ही सर्वजण आता वर्षानुवर्षे माझे कुटुंब आहात... तुमच्या सर्वांमध्ये दिवाळी साजरी करणे हा एक विशेषाधिकार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील सशस्त्र दलाच्या सदस्यांशी संवाद साधताना म्हटले.
10:35 October 24
अडीच वर्षात ज्यांनी काहीच केले नाही, ते टीका करत आहेत-आशिष शेलार
शेतकऱ्यांना आम्ही केलेली मदत विरोधी पक्षाला खुपत आहे. अडीच वर्षात ज्यांनी काहीच केले नाही, ते टीका करत आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरून केली आहे.
10:30 October 24
'सितारंग' चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्यास सुरुवात
'सितारंग' चक्रीवादळ गेल्या 6 तासांत 15 किमी प्रतितास वेगाने उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे. पुढील 12 तासांत ते तीव्र चक्री वादळात आणखी तीव्र होण्याची अपेक्षा आहे आणि त्याची हालचाल सुरू ठेवा; उद्या पहाटे तीनकोना बेट आणि संद्वीपच्या बांगलादेश किनारपट्टीला ओलांडण्याची शक्यता आहे.
09:57 October 24
पंतप्रधान मोदी आज सैनिकांसोबत करणार दिवाळी साजरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलला पोहोचले. आज येथे पंतप्रधान मोदी हे सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
09:25 October 24
गर्दी रोखण्यासाठी पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची वाढवली किंमत
पुणे : दिवाळीत घरी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची एकच गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत शनिवारी सायंकाळी उशिरा पुणे रेल्वे स्थानकावर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा आजारपणात कोसळून मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली. दुसरीकडे प्रवाशाचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाल्याची चर्चा आहे.मात्र अस असल तरी गर्दी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आत्ता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर हे 10 रुपयांवरून 30 रुपये वाढवण्यात आले आहे.
08:54 October 24
दोन ट्रक भरून शिवसेनेचे ८.५ लाख शपथ पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर
मुंबई शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीकरण शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यानंतर नेमकी शिवसेना कोणाची याबाबतची कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दाखल करण्यात येत आहे.
08:24 October 24
टँकर-दुचाकी भीषण अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू
पुण्यात सोनावणे हॉस्पिटल जवळ अपघात झाला आहे. या अपघातात ७५ वर्षीय लिलावती लाहोटीया यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
07:17 October 24
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देताना म्हटले, की तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिव्यांचा हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
07:13 October 24
ठाणे येथील तलाव पाळी दिवाळी पहाट उत्सवाचे आयोजन, शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट शक्ती प्रदर्शन रंगणार
मोठ्या प्रमाणात दिवाळी पहाट उत्सव ठाणे येथील तलाव पाळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या दिवाळी पहाटमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा शक्ती प्रदर्शन रंगणार असून याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणतेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
06:59 October 24
शिवसेनेच्या दोन गटात चुरस-मनसेचा फायदा, दोन्ही गटातील अनेक नेते राज ठाकरे यांच्या संपर्कात
ठाणे आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेची झालेली दुफळी मनसे च्या फायद्याची आहे असे चित्र पाहायला मिळत आहे. सध्याचे राजकारण हे गटा तटाच्या चुरशीचे राजकारण आहे. या फोडाफोडीच्या राजकारणात भाजप करता करविता असला तरीही महत्वाची राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. अनेक नेते संपर्कात आहेत. योग्यवेळी राज ठाकरे निर्णय घेतील या वक्तव्याने आता पुन्हा दोन्ही गट झालेली शिवसेना फुटणार कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
06:35 October 24
पोलिसांकडून क्रिकेटप्रेमींवर सौम्य लाठीमार
पुण्यातील गुडलक चौकातून येथे नागरिकांकडून जल्लोष साजरा करत असताना खूपच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याने आणि खूपच वेळ जल्लोष साजरा होत असल्याने पोलिसांकडून क्रिकेटप्रेमींवर लाठीमार करण्यात आला.
06:08 October 24
Maharashtra Breaking News श्रीनगरमध्ये सापडली संशयास्पद पिशवी
मुंबई : लोअर परेल गणपतराव कदम मार्ग येथील ए टू झेड इंडस्ट्रियल इस्टेट मधील एका गाळ्याळा रात्री ११ च्या सुमारास आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही आग लेव्हल १ ची असून त्यात अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.