गुजरात - भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड
BREAKING : भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
16:07 September 12
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड
15:15 September 12
काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील - सडोलीकरांसह मुलगा, मुलीवर गुन्हा दाखल
सातारा -काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील - सडोलीकर यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
14:13 September 12
गुजरात - केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मनसुख मांडवीय गुजरात भाजप कार्यालयात दाखल
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय गांधीनंगरमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी भाजपा कार्यालयात दाखल झाले आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्री पद कोणाकडे दिले जाणार यावर या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
14:04 September 12
घोडबंदर रोड परिसरातून एकाला अटक, १ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त
ठाणे - ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने घोडबंदर रोड परिसरातून एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या २९ वर्षीय व्यक्तीकडून १ लाख रुपये किंमतीचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
13:07 September 12
पुण्यात प्रशिक्षणासाठी आलेले नागपूरचे 12 पोलीस कोरोनाबाधित
नागपूर शहर पोलीस दलातील 12 पोलिसांना कोरोानाची बाधा झाली आहे. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली.
12:13 September 12
दिल्ली- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक मधील सहभागी खेळाडूंशी साधला संवाद
12:00 September 12
साकीनाका प्रकरण : पोलिसांनी जबाबदारीपासून पळ काढू नये, राष्ट्रीय महिला आयोग
मुंबई - साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम मुंबईत दाखल झाली आहे, यावेळी या आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी साकीनाका प्रकरणानंतर मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका केली आहे. मुंबई पोलिसांनी जबाबदारी पासून पळ काढू नये, असे मत देवी यांनी व्यक्त केले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलीस प्रत्येक घटनास्थळी उपस्थित असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.
11:09 September 12
ठाण्यात राबोडी येथे इमारतीचा भाग कोसळला, दोन ठार, एक जखमी
ठाण्यातील राबोडी परिसरात असणाऱ्या खत्री अपार्टमेंट तळ अधिक चार मजली इमारतीच्या तिसऱ्या माजल्यावरील छताचा भाग कोसळला, या मध्ये तीन जण अडकले होते
सद्या तीन जणांना NDRF च्या टीमने बाहेर काढले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे...
यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
इमारत रिकामी करून जवळच्या मशीद मध्ये नागरिकांना हलविण्यात आले आहे..
1-रमीझ शेख वय 32 वर्ष - मृत्यू
2-गौस तांबोली - वय 38 वर्ष-मृत्यू
3-अरमान तांबोली - वय 14 वर्ष जखमी..
10:25 September 12
साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम मुंबईत दाखल
मुंबई- साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम मुंबईत दाखल
- मलबार हिल येथील सह्याद्री गेस्ट हाऊस येथून टीम निघाली असून थोड्याच वेळात खैराणी रोड येथे पोहचणार
- बलात्कार झालेल्या परिसराला, साकीनाका पोलीस ठाणे, राजावाडी हॉस्पिटलला भेट देणार
- शनिवारीच आयोगाने सुमोटो घेऊन महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहिले होते
10:16 September 12
कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच्या राहत्या घरी दरोडा
वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे राहत असलेले कला दिग्दर्शक सावंत यांच्या घरी रात्रीच्या सुमारास पडला दरोडा, लाखो रुपयांचा ऐवज लंपास....
घटनेची माहिती कळताच जऊळका पोलीस घटनास्थळी दाखल.....
08:24 September 12
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंग तोमर हे आज गुजरातला भेट देणार आहेत. या भाजपा नेत्याच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. शनिवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढीलस घडामोडींना आता वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जोशी आणि तोमर यांचा हा गुजरात दौरा आहे.