महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News Live : चिपळूणमध्ये येताच भास्कर जाधव यांना अश्रू अनावर

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

By

Published : Oct 21, 2022, 6:49 AM IST

Updated : Oct 21, 2022, 9:52 PM IST

21:51 October 21

चिपळूणमध्ये येताच भास्कर जाधव यांना अश्रू अनावर

रत्नागिरी - शिवसेना (ठाकरे गट) नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर आज भास्कर जाधव यांचं चिपळूणमध्ये आगमन झालं. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले.

20:47 October 21

मुंबई पोलिसांनी 43 लाख रुपये किंमतीचे 215 ग्रॅम एमडी ड्रग्ज केले जप्त

मुंबई -पोलिसांनी 43 लाख रुपये किमतीचे 215 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले, ड्रग सप्लायरला वांद्रे युनिट, मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने अटक केली. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले; न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

19:42 October 21

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ, महिला जखमी

गडचिरोली - कुरखेडा तालुक्याच्या सीमेलगत कोरची तालुक्यातील लेकुरबोडी येथे जंगली हत्तींनी उभ्या पिकांची व घरांची नासधूस केली. यामध्ये एक 80 वर्षिय वृद्ध महिला सनकूबाई कोलूराम नुरूटी ही गंभीर जखमी झाली. तिला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मसेली येथून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती केले. नंतर तिला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे पाठवल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

19:18 October 21

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धक्का लावल्यास तलवारीने हात छाटणार - आमदार देवेंद्र भुयार

अमरावती -मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे, असे वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत. आमच्या नादाला लागायचे नाही. निवडणुकीमध्ये जाणीवपूर्व तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धक्का लावण्याचे काम केले, तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी विरोधकांना दिला. वरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला आमदार भुयार यांनी संबोधित करताना विरोधकांना धारेवर धरले.

18:44 October 21

दीपोत्सवासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस दीपोत्सवाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल. थोड्याच वेळात होणार मनसे दीपोत्सवाच उद्घाटन.

17:44 October 21

बदलापूरजवळच्या कुंडामध्ये चार मुले बुडाली

ठाणे - बदलापूरजवळच्या कुंडामध्ये चार मुले बुडाली. कोंडेश्वरमधील ही घटना आहे. धबधब्यावर फिरण्यासाठी ही मुले आली होती.

17:31 October 21

ग्रँड हयात हॉटेलला बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक

मुंबई -मद्यधुंद अवस्थेत काल रात्री सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलला बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी वाकोला पीएसने सूरज जाधव याला अटक केली आहे. पोलिसांना कोणतेही संशयित साहित्य सापडले नाही. IPC च्या 505(2) आणि 505(1)(b) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

17:14 October 21

धर्मांतरित अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण थांबवावे, विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे

नागपूर - धर्मांतरित अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण थांबवण्यात यावे, विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची मागणी. केवळ हिंदू अनुसूचित जातींनाच आरक्षणाचा अधिकार असताना अनुसूचित जातीतील धर्मांतरितांना आरक्षण देण्याची मागणी करण्याचे कारस्थान सुरू झाले आहे, असा आरोप परांडे यांनी केला.

17:03 October 21

देशातील द्वेषपूर्ण भाषणांच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली - देशातील द्वेषपूर्ण भाषणांच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोहोचलो आहोत, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की अशी विधाने (द्वेषपूर्ण भाषण) त्रासदायक आहेत. विशेषत: लोकशाही देशासाठी हे घातक आहे. भारतातील मुस्लीम समुदायाला लक्ष्य करून दहशत निर्माण करण्याच्या कथित वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने ही निरीक्षणे नोंदवली आहेत.

16:53 October 21

समृद्धी महामार्ग सुरू करा, ट्विटवरुन सुप्रिया सुळे यांची मागणी

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा मार्ग सुरु केला तर प्रवास करणे अधिक सोयीचे होईल, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुढे म्हणतात, ही नागरिकांची मागणी आहे. जनतेच्या सोयीसाठी हा मार्ग तातडीने सुरु करण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, कृपया हा महामार्ग लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत रुजू करावा.

16:47 October 21

एचपीव्ही लसीचे उत्पादन 2023 च्या पहिल्या तिमाहीत सुरू - अदर पूनावाला

पुणे - गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी एचपीव्ही लसीचे उत्पादन 2023 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. अदर पूनावाला यानी हे स्पष्ट केले आहे.

16:16 October 21

एसटी भाडेवाढ फक्त तात्पुरती, 21 ते 31 ऑक्टोबर पर्यन्त दर लागू

एसटी भाडेवाढ फक्त तात्पुरती आहे. 21 ते 31 ऑक्टोबरपर्यन्त नवीन दर लागू राहतील. शिवनेरी, अश्वमेध बससेवेला, तसेच विद्यार्थी पासेसला 10 टक्के भाडेवाढीतून वगळले आहे.

15:47 October 21

दिवाळी किटची 300 रूपयात विक्री, शहापूर तालुक्यातील आदिवासी भागात प्रकार

ठाणे -शिंदे सरकारने 100 रुपयाची रेशन किटाची स्वस्त धान्य दुकानदाराकडून शिधा धारकांना दिवाळी भेट म्हणून गाजावाजा करत जाहीर केली. मात्र त्या दिवाळी किटची 300 रूपयात विक्री शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी भागात होत आहे. याप्रकारे गोरगरीब आदिवासींची बांधवांची फसवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आता याबाबत शहापूर तहसीलदार कार्यालयात दाखल तक्रार केली आहे.

15:20 October 21

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान संपत्ती लपवल्याने निवडणुकीस अपात्र

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना संपत्ती लपवल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवले. सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी ऑगस्टमध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे (ECP) खान यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. त्यांनी सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेले पैसे उघड करण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.

15:02 October 21

कवठेमहांकाळ नगरपरिषदेत भाजपकडे सत्ता, रोहित पाटील गटाला धक्का

सांगली - आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहीत पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषदेत सत्ता काबीज केली. खासदार संजय काका पाटील यांना रोहीत पाटील यांनी चांगलाच दणका दिला होता. परंतु अवघ्या 10 महिन्यात संजय काका पाटील यांच्या गटाकडून रोहित पाटील गटाला चांगलाच धक्का देण्यात आला. कवठेमंकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. तिथे भाजपाचा अध्यक्ष झाला आहे. सिंधूताई गावडे यांच्या गळ्यात नगरपंचायत अध्यक्षपदाची माळ पडली.

14:49 October 21

नवनीत राणांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या. न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट. राणांच्या अटकेची शक्यता.

14:36 October 21

अग्नी प्राइम न्यू जनरेशन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भुवनेश्वर - अग्नी प्राइम न्यू जनरेशन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आज भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवर सुमारे 9.45 वाजता यशस्वी चाचणी केली. संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. क्षेपणास्त्राने चाचणीत जास्तीत जास्त पल्ला गाठला आणि सर्व चाचणी उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाली. अग्नी प्राइम क्षेपणास्त्राच्या या सलग तिसऱ्या यशस्वी उड्डाण चाचणीमुळे, प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हता स्थापित झाली आहे.

14:27 October 21

सायबर दहशतवाद प्रकरणात आरोपीला जन्मठेप

मुंबई -सायबर दहशतवाद प्रकरणात आरोपीला जन्मठेप. आरोपी अनिस शकिल अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा. एटीएसच्या गुन्ह्यातील प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निकाल. 2014 च्या एका प्रकरणात आरोपी अनिस अन्सारी याला अटक करण्यात आली होती. बिकेसीत एका अमेरिकन स्कूलवर सुसाईड बॉम्ब हल्ला करण्याचा होता कट. कटाची माहिती मिळताच एटीएसने अनिस अन्सारी याला केली होती अटक.

14:05 October 21

ठाण्यातील दोन्ही गोळीबाराच्या घटना एकमेकांशी संबंधित

ठाण्यातील दोन्ही गोळीबाराच्या घटना एकमेकांशी संबंधित. नौपड्यातील 6 राउंड गोळीबारानंतर आरोपींनी लोकमान्यनगरमध्ये केला गोळीबार. काळा गण्याला डोक्यात घातल्या गोळ्या.

13:48 October 21

शिवराज पाटलांचा DNA तपासा तो मुघलांचाच निघेल - आचार्य तुषार भोसले

मुंबई -शिवराज पाटील महाराष्ट्राच्या नावाला कलंक आहेत. त्यांच्या सर्व सरकारी सुविधा काढून त्यांना महाराष्ट्राबाहेर हाकला, अशी मागणी. भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. जिहाद वक्तव्य प्रकरणी त्यांनी याप्रकरची प्रतिक्रिया दिली आहे.

13:42 October 21

एकनाथ खडसेंचे भोसरी जमीन खरेदी प्रकरणाची चौकशीचे न्यायालयाचे आदेश

मुंबई - एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या. भोसरी जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश.

13:36 October 21

मुंबईत १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ अन्वये १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या १५ दिवसांसाठी मुंबईत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

12:46 October 21

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आज पुन्हा गोळीबार, एकजण गंभीर जखमी

ठाण्यात गोळीबाराची आजची दुसरी घटना गणेश जाधव उर्फ काळा गण्या गोळीबारात गंभीर जखमी डोक्यात लागली गोळी. घटनास्थळी वर्तक नगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जखमी गणेशला वेदांत रुग्णालयात केले दाखल.

12:42 October 21

साताऱ्यातील मंगळवार पेठेत घुसले तरस, वनविभागाने सोडले जंगलात

सातारा - शहरातील मंगळवार पेठेत तरस घुसल्याने एकच खळबळ उडाली. पेठेतील एका गल्लीत हे तरस फिरताना आढळले. परिसरातील लोकांमध्ये मात्रत्यामुळे घबराट पसरली होती. नागरी वस्तीतून त्याला डोंगराकडे जाण्यासाठी वाट सापडत नव्हती. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तरसाला वाचवून जंगलात सोडले.

12:18 October 21

अरुणाचलमधील अप्पर सियांग जिल्ह्याजवळ लष्करी हेलिकॉप्टर कोसळले

इटानगर - अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सियांग जिल्ह्यातील तुटिंग मुख्यालयापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ शुक्रवारी लष्करी हेलिकॉप्टर कोसळले.

12:14 October 21

राज्यातील प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयला सर्वसाधारण संमती पुन्हा बहाल

मुंबई - महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयला सर्वसाधारण संमती पुन्हा बहाल केली आहे. महाराष्ट्र गृह विभागाच्या सुत्रांनी ही माहिती दिली. राज्य सरकारची सर्वसाधारण संमती यापूर्वी आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या आदेशाने मागे घेण्यात आली होती.

12:05 October 21

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर - भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जमाल सिद्दिकी यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र पाठवून धमकी देण्यात आली. गुस्ताख ए रसूल की एक सजा सर तन से जुदा असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आला आहे. जमाल सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांनी पत्रासोबत दोन फोटोही पाठवले आहेत. या प्रकरणात जमाल सिद्दिकी यांनी नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन गुन्हा तक्रार दाखल केली आहे.

12:01 October 21

चंद्रशेखर बावकुळे यांना खुळखुळ्याची दिवाळी भेट

पुणे- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर तसेच काँग्रेसमधील नेत्यांवर टीका करत आहेत. त्यांच्याकडून होत असलेल्या टीका यात कोणतेही तारतम्य नाही. तसेच ते करत असलेले विधान हे फक्त पक्षातील लोकांना खुश करण्यासाठी करत असतात. त्यांच्या अशा विधानामुळे आज प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या माध्यमातून दिवाळी निमित्ताने खुळखुळ्याचा बॉक्स बावनकुळे यांना पाठविण्यात आला आहे.

11:52 October 21

शिवराज पाटील चाकूरकर यांनी कथित जिहाद संदर्भातील वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली - माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी कथित जिहाद संदर्भातील वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण. प्रश्नार्थक स्वरुपात जिहादचा उल्लेख केला होता, असे सांगितले. पत्रकारांनी अर्धवट वाक्य घेऊन अर्थाचा अनर्थ केल्याचा केला आरोप.

11:02 October 21

रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर ठाण्यात गोळीबार

घंटाळी रोड परिसरामध्ये एका व्यक्तीवर गोळीबार झाला. गोळीबार झालेला व्यक्ती गंभीर आहे. पहाटे पाच साडेपाचची घटना आहे. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. ठाण्यातील वर्दळीचा आणि उच्चभ्रू परिसर मानल्या जाणाऱ्या घंटाळीमध्ये गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

10:57 October 21

काँग्रेसने माफी मागावी अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरेल-अतुल भातखळकर

सोनिया गांधींच्या मर्जीतील नेते कायम हिंदू समाजाचा अपमान करत आले आहेत. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद… अशी अनेक उदाहरणे देतां येतील. त्यात भगवद् गीतेच्या तत्वज्ञानाची जिहादशी तुलना करुन शिवराज पाटील यांनी ताजी भर टाकली आहे. काँग्रेसने माफी मागावी अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला

10:23 October 21

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडला पोलीस स्मृतिदिन संचलन

पुणे- आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.पुण्यात आज पुणे शहर पोलिस आयुक्तालय यांच्या मार्फत आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांच्या उपस्थितीत पाषाण येथील पोलिस संशोधन केंद्र येथे पोलीस स्मृतिदिन संचलन पार पडला.

09:22 October 21

सोसायटीच्या चेंबरमधे काम करताना दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

वाघोली, मोझे कॉलेज रस्ता येथील एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना आहे. यातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले तर एकाचा शोध सुरू आहे.

08:50 October 21

पंतप्रधान मोदींनी उत्तराखंड दौऱ्यात घातला चोला डोरा

पीएम मोदींनी हिमाचल प्रदेशातील चंबा येथील महिलांनी बनवलेला हाताने बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसला चोला डोरा म्हणतात. हा पोशाख पंतप्रधानांच्या नुकत्याच राज्याच्या दौऱ्यात त्यांना भेट देण्यात आला होता.

08:46 October 21

नेरळ माथेरान ट्रेन परवापासून धावणार

मुंबई22 ऑक्टोबर 2022 पासून नेरळ - माथेरान एनजी लाईनवर पुढील वेळेसह रीस्टार्ट होईल नेरळ - माथेरान - नेरळ मिनी ट्रेन सेवा नेरळ - माथेरान डाऊन ट्रेन 52103 नेरल प्रस्थान 08.50 वाजता माथेरानमध्ये 11.30 वाजता आगमन (दररोज) तर 52105 नेरल प्रस्थान 14.20 वाजता माथेरानमध्ये 17.00 वाजता आगमन (दररोज)
माथेरान - नेरळ अप ट्रेन प्रस्थान 52104 माथेरान 14.45 वाजता, नेरळ येथे 17.30 वाजता आगमन (दररोज) तर 52106 माथेरान 16.20 वाजता प्रस्थान, नेरळ 19.00 वाजता आगमन

07:53 October 21

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांचा विकास, सुमारे ४४३ कोटीचा निधी अखेर मंजूर

मुंबई - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती करणार आणि त्यांचे काँक्रिटीकरण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला असून लवकरात लवकर काम सुरू होईल असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने रद्द केलेल्या कल्याण-डोबिंवलीमधील रस्त्यांच्या विकासांच्या कामांना आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मान्यता मिळाल्याने कल्याण डोंबिवली वासियांसाठी ही गोड बातमी असल्याचे ते म्हणाले.

07:17 October 21

डेंग्यू रुग्णाला रक्तातील प्लेटलेट्सऐवजी फळांचा रस, खासगी रुग्णालयाला ठोकले सील

डेंग्यू रुग्णाला रक्तातील प्लेटलेट्सऐवजी फळांचा रस दिल्याप्रकरणी प्रयागराजमधील एका खासगी रुग्णालयाला सील ठोकण्यात आले. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सीएमओने चौकशीचे आदेश दिले. तपासणीत काही अनियमितता आढळून आल्या आहे.

07:15 October 21

केंद्राच्या धर्तीवर राज्यात नीती मित्र

मुंबई - केंद्राच्या धर्तीवर नीति आयोगाप्रमाणेच राज्यात प्रथमच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. देशातील प्रादेशिक मित्र संकल्पना राबवणारा पहिला राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव आघाडीवर आहे.

06:59 October 21

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथला देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधील केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार आहेत. गौरीकुंड ते केदारनाथ आणि गोविंदघाट ते हेमकुंड साहिब यांना जोडणाऱ्या दोन नवीन रोपवे प्रकल्पांसह 3400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांची ते पायाभरणी करणार आहेत.

06:24 October 21

Breaking News and live update

मुंबईमुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शदर पवार (Sharad Pawar) व भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. या पॅनेकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आली होती. ज्येष्ठ आणि प्रख्यात क्रिकेटपटू माजी कर्णधार संदीप पाटील यांना 150 मते मिळाली आहेत, तर पवार शेलार पॅनलचे अमोल काळे यांना 183 मते पडले आहेत.

अशी पडली मते

अध्यक्ष पदाची निवडणूक

विजयी उमदेवार- अमोल काळे १८३

पराभूत उमेदवार संदीप पाटील १५८

सचिव पदाची निवडणूक

विजयी उमेदवार अजिंक्य नाईक - २८६

पराभूत उमेदवार खंडवाला मयांक - ३५

खजिनदार पदाची निवडणूक

विजयी उमेदवार मल्लिक अर्मान- १६२

पराभूत उमेदवार जगदीश आर्चेकर -१६१

Last Updated : Oct 21, 2022, 9:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details