महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : गिरगाव येथील एलआयसी बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याला लागली आग - महाराष्ट्र गुन्हे वृत्त

महाराष्ट्र ब्रेक्रिंग न्यूज
Maharashtra breaking News

By

Published : Feb 9, 2023, 6:47 AM IST

Updated : Feb 9, 2023, 11:02 PM IST

23:01 February 09

मुंबई विमानतळ कस्टमच्या अधिकार्‍यांची मोठी कारवाई

मुंबई विमानतळ कस्टमच्या अधिकार्‍यांनी 8-9 फेब्रुवारी 2023 रोजी 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 1.44 कोटी रुपये मूल्याचे सुमारे 2.8 किलो सोने आणि 90,000 AED आणि 90,000 USD, 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 92.43 लाख रुपयांचे सोने जप्त केले.

22:23 February 09

गिरगाव येथील एलआयसी बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याला लागली आग

मुंबई - गिरगाव येथील एलआयसी बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

22:19 February 09

नांदेड शहरात पुन्हा गोळीबार, मित्रानेच झाडली मित्रावर गोळी

नांदेड-शहराच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुरी चौक माळटेकडी परिसरात चक्क मित्रानेच मित्रावर गावठी कट्ट्यातून फायरिंग केली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरुवार दि.९ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

22:17 February 09

अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगणसिद्धी दौरा करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ समाजसेवक , पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा-आशीर्वाद दिले. हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची जोडगोळी गतिमान राज्यकारभार करत आहे, अशी भावना व्यक्त केली.

21:52 February 09

उपचारासाठी गेलेल्या रुग्णाने, रुग्णालयातूनच उडी मारून केली आत्महत्या; कोल्हापुरातील प्रकार

कोल्हापूर - शहरातील लक्ष्मीपूरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका रुग्णांनी आज पहाटेच्या सुमारास पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. जयसिंग ज्ञानदेव कणसे वय वर्ष 48 असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव असून तो करवीर तालुक्यातील पुलाची शिरोली येथील राहणारा आहे. दरम्यान त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

21:01 February 09

बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनसाठीच्या निविदा 15 मार्च रोजी उघडणार

मुंबई - बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भातील निविदाची स्थिती समोर आली आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी बुलेट ट्रेनचे रेल्वे स्थानक केले जाणार आहे. त्याला पॅकेज सी वन असे म्हटले गेलेले आहे .आणि या संदर्भातली आर्थिक बाबीची बोली जी आहे ती 28 डिसेंबर 2022 रोजी उघडण्यात आली होती.बुलेट ट्रेन मार्गासाठी ठाणे डेपोच्या निविदा 15 मार्च 2023 रोजी खुल्या होणार आहेत.

19:46 February 09

बहिणीशी भांडतो म्हणून मेव्हण्याचा केला कुऱ्हाडीने वार करुन खून

पालघर - मोखाडामध्ये दिलीप महाले या तरुणाने आपला मेहुणा महेंद्र भोये याचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचा आरोप आहे. अनेकदा बहीणीशी भांडण होत असल्याचे हे कृत्य केल्याची दिलीपने पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी आरोपी दिलीपला अटक केली आहे.

19:31 February 09

जम्मू-काश्मीरमधील 12 जिल्ह्यांना हिमस्खलनाचा इशारा, लोकांना खबरदारी सल्ला

जम्मू काश्मीर - जम्मू आणि काश्मीर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मोठ्या हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. येत्या 24 तासात अनंतनाग, बारामुल्ला, गंदरबल, डोडा, राजौरी आणि पूंछसह 12 जिल्ह्यांसाठी हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र सपाटीपासून 2 ते अडिच हजार मीटवर हिमस्खलन होईल. त्यामुळे या भागातील लोकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.

19:16 February 09

काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून रायपूरमध्ये होणार आहे. त्या अधिवेशनानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात येईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे.

18:30 February 09

आंध्रप्रदेशमध्ये खाद्यतेलाचा टँकर साफ करताना विषारी वायूमुळे 7 जणांचा मृत्यू

आंध्रप्रदेशमध्ये चित्तुर जिल्ह्यात खाद्यतेलाचा टँकर साफ करताना कामगारांना श्वसनाचा त्रास झाला होता. त्यानंतर अनेकजणांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

18:28 February 09

निर्मला सीतारामन उद्या संध्याकाळी लोकसभेत बजेटवरील चर्चेला उत्तर देण्याची शक्यता

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या संध्याकाळी ६ च्या सुमारास लोकसभेत बजेटवरील चर्चेला उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.

17:49 February 09

वेरूळच्या लेण्यांचे सौंदर्य पाहणे हा एक अद्भुत अनुभव - हिलरी क्लिंटन

औरंगाबाद - अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी आज औरंगाबादला भेट दिली. त्या म्हणाल्या की, ऐतिहासिक महत्वपूर्ण स्थळ असलेल्या वेरूळच्या लेण्यांचे सौंदर्य पाहणे हा एक अद्भुत अनुभव होता. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मला या अद्भूत देशाबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली, याचे समाधान वाटले असही क्लिंटन म्हणाल्या.

17:34 February 09

छत्तीसगडमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात, 7 विद्यार्थी ठार

छत्तीसगड मधील कांकेर जिल्ह्यातील कोरार गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थी आणि ऑटोचालक जखमी. जखमी विद्यार्थ्यांना कोरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, बस्तरचे पोलीस अधिकारी पी सुंदरराज यांनी ही माहिती दिली.

17:27 February 09

आमदार प्रज्ञा सातव, आदित्य ठाकरेंवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंचा शोध लावा - अजित पवारांची मागणी

पुणे : काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरील हल्ल्याच्या मास्टरमाईंचा शोध लावण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडवणीस यांना केली आहे. प्रज्ञा सातव यांच्यावर काल आणि दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला होता. मास्टरमाईंचा शोध लावून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

17:11 February 09

एटीएमवर ग्राहकांना टार्गेट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

पालघर - मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांनी एटीएम केंद्रांवर लोकांचे लक्ष विचलित करणाऱ्या आणि त्यांचे पैसे चोरणाऱ्या चार जणांना अटक केली. या कारवाईतून १६ प्रकरणांचा छडा लावला आहे. पोलिसांनी आंतरराज्य टोळीकडून 5.28 लाख रुपये किमतीची कार, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त केले. तसेच 94 एटीएम कार्डेही जप्त केली आहेत, अशी माहिती विरारच्या झोन II चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.

17:00 February 09

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन रुग्णालयात दाखल

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

16:42 February 09

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे; राहुल गांधींनी साधला थेट संवाद

पुणे - कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी पुकारलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षश्रेष्ठीकडून कालपासून दाभेकर यांची मनधरणी करण्यात आली असून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर दाभेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

16:24 February 09

घोषणाबाजीवरुन पंतप्रधान मोदींनी विरोधकांची उडवली जोरदार खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची भाषण संपवताना जोरदार खिल्ली उडवली. ते म्हणाले, एक व्यक्ती अनेकांना कसे तोंड देत आहे हे देळ पाहत आहे. विरोधी पक्षाकडे पुरेशा घोषणाही नाहीत. एकटा मी भाषण करत आहे आणि त्यांना त्यांच्या घोषणा देण्यासाठी माणसं बदलावी लागत आहेत. एका माणसाचाही ते सामना करु शकत नाहीत. कारण आपण देशासाठी जगतोय, असे मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणाच्या आभफार प्रस्तावाच्या भाषणात शेवटी स्पष्ट केले.

16:02 February 09

गुजरातमध्ये काँग्रेसच्या राजवटीत अदानींची भरभराट - मुनगंटीवार

पुणे - गुजरातमध्ये काँग्रेसच्या काळात गौतम अदानींची भरभराट झाल्याचा दावा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत उद्योगपतीबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत दाढी वाढवून कुणी पंतप्रधान होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. हिंडेनबर्ग अहवालाचा हवाला देत गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तेवर आल्यानंतर अदानींचे नशिब फळफळले. मात्र ते चुकीचे आहे, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

15:40 February 09

देशात 600 सरकारी योजना गांधी-नेहरू कुटुंबाच्या नावावर होत्या - मोदी

योजनांच्या नावावरुन पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत काँग्रेसला सुनावले. ते म्हणाले, काहींना नावांमध्ये सरकारी योजनांची नावे आणि संस्कृत शब्दांची अडचण होती. मी एका अहवालात वाचले की 600 सरकारी योजना गांधी-नेहरू कुटुंबाच्या नावावर होत्या. मला समजत नाही की त्यांना नेहरू नाव एवढे आवडते, तर ते नेहरू असे आडनाव का ठेवत नाहीत. त्यांना कशाची भीती आणि लाज वाटते, असा सवा पंतप्रधान मोदींनी केला.

15:27 February 09

महाराष्ट्रात शरद पवारांच्या सरकारला काँग्रेसने पाडले - मोदी

शरद पवार त्या काळी 40-45 वर्षांचे असतील. त्यांच्या सरकारलाही त्रास देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पवारांचे सरकार पाडण्यात आले. दक्षिणेत एमजीआर, करुणानिधींची सरकारे पाडली. आंध्रप्रदेशात एनटीआर यांचे सरकारही पाडले. इंदिरा गांधीच्या काळात निवडुन आलेले सरकार कलम 356 चा वापर करुन पाडण्याचे सर्वाधिक प्रयत्न झाले.

15:25 February 09

आज 350 हून अधिक खासगी कंपन्या संरक्षण क्षेत्रात आल्या आहेत - मोदी

आज 350 हून अधिक खासगी कंपन्या संरक्षण क्षेत्रात आल्या आहेत. आपला देश या क्षेत्रात जवळपास 1 लाख कोटी रुपयांची निर्यात करत आहे. किरकोळ विक्रीपासून पर्यटनापर्यंत, प्रत्येक क्षेत्राचा विकास झाला आहे. अशी माहिती पीएम मोदींनी राज्यसभेत दिली.

15:19 February 09

आपल्या शास्त्रज्ञांचा अपमान करण्याचे प्रयत्न झाले - मोदी

आपल्या लस बाजारात विकण्यासाठी जगभरातील लोकांचा दबाव होता. त्यासाठी लेख लिहिले गेले, टीव्हीवर मुलाखती दिल्या गेल्या. कालपर्यंत आपल्या शास्त्रज्ञांचा अपमान करण्याचे प्रयत्न झाले. पण माझ्या देशाच्या शास्त्रज्ञांनी अशा लसी बनवल्या ज्यांना मान्यता मिळाली आणि 150 देशांना त्याचा फायदा झाला.

15:15 February 09

भारतात डिजीटल इकॉनॉमीने रोजगाराची नवीन दारे खुली झाली - मोदी

भारतात डिजीटल इकॉनॉमीने रोजगाराची नवीन दारे खुली झाली आहेत. विरोधकाना रोजगार आणि नोकरी यातील फरक कळत नाही ही शोकांतिका आहे. लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक क्षेत्रात सरकारने संधी निर्माण केल्या आहेत. तसेच त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळत आहे.

15:12 February 09

भारतात सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करुन सर्वसामान्यांचे हित - मोदी

भारतात सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करुन सर्वसामान्य लोकांच्यासाठी केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना ड्रोनचा वापर करता येईल याची सोय केली. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. खतांचेही विविध पर्याय उपलब्ध करुन देत आहे.

15:05 February 09

जगात सर्वाधिक पेटंट घेण्यासाठी भारतीय तरुण पुढे येत आहेत - मोदी

जगात सर्वाधिक पेटंट घेण्यासाठी पुढे येत आहेत. हा सरकारच्या धोरणामुळे झालेला बदल आहे. तरुणांना संशोधनासाठी उद्युक्त करण्यासाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे हा बदल घडला आहे.

15:02 February 09

देशातील जनता काँग्रेसला वारंवार नाकारत आहे - मोदी

अनेक दशके आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. त्यांच्या हिताला आमच्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले. देशातील जनता काँग्रेसला वारंवार नाकारत आहे. लोक काँग्रेसला शिक्षा देत आहेत. असे मोदींनी राज्यसभेत काँग्रेसवर टीका केली.

14:55 February 09

भाषणबाजी बंद करा, प्रश्नांची उत्तरे द्या अशा विरोधकांची राज्यसभेत घोषणाबाजी

पंतप्रधानांचे भषण सुरू असताना राज्यसभेत सुरुवातीपासून सतत विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे. विरोधक भाषणबाजी बंद करा, प्रश्नाची उत्तरे द्या अशा घोषणा दिल्या.

14:51 February 09

देशभरात 110 जिल्हे निवडून त्यांचा शिस्तबद्ध पद्धतीने विकास केला - मोदी

आम्ही देशातील 110 आकांक्षा जिल्हे निवडले. त्यांच्यावर सतत लक्ष केंद्रित केले. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. या जिल्ह्यांमध्ये शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे. याचा 3 कोटींहून अधिक आदिवासींना फायदा झाला, असे मोदींनी राज्यसभेत सांगितले.

14:47 February 09

देश खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष बववण्यासाठी सरकाचे प्रयत्न सुरू - मोदी

विविध सरकारी योजनांचे लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री सरकारने केली. देश खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष बववण्यासाठी सरकारने सामाजिक सुरक्षेच्या योजना राबवल्या.

14:42 February 09

तंत्रज्ञानाच्या बळावर आम्ही वर्क कल्चरमध्ये बदल केले - मोदी

मोदींनी राज्यसभेत सांगितले की, तंत्रज्ञानाच्या बळावर आम्ही वर्क कल्चरमध्ये बदल केले. आमचा भर कामाचा वेग वाढवण्यावर आहे. त्यातून विकास साधला जात आहे.

14:38 February 09

काँग्रेसने ‘गरीबी हटाओ’ची घोषणा दिली, मात्र 40 वर्षाहून अधिक काळ काहीही केले नाही - मोदी

काँग्रेस ‘गरीबी हटाओ’ म्हणत होती. पण त्यांनी 40 वर्षाहून अधिक काळ काहीही केले नाही. आता मात्र देशातील लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत. आमची प्राथमिकता सामान्य जनता आहे. यामुळेच आम्ही देशातील २५ कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून दिले, अशी माहिती मोदींनी दिली.

14:34 February 09

खरगेंचे खाते बंद झाले, त्यांची वेदना समजू शकतो - मोदी

पंतप्रधान राज्यसभेत म्हणाले, खरगे जी तक्रार करतात की मी कलबुर्गीला भेट देतो. तेथे झालेले काम त्यांनी पाहिले पाहिजे. कलबुर्गीमध्ये 8 लाखांहून अधिक जनधन खाती उघडली आहेत. तर संपूर्ण कर्नाटकात 1 कोटी 70 लाख जन धन बँक खाती उघडली आहेत. अनेक लोक सशक्त होत आहेत, तर कोणाचे खाते बंद होत आहे, मी त्यांची वेदना समजू शकतो, असा टोला पंतप्रधान मोदींनी खरगेंना लगावला.

14:30 February 09

11 कोटी घरांना नळ जोडणी मिळाली, देशभरात 48 कोटी जनधन खाती उघडली - मोदी

गेल्या 3-4 वर्षात सुमारे 11 कोटी घरांना नळ जोडणी मिळाली आहे. सामान्य लोकांच्या सक्षमीकरणाची चर्चा सरकार करत आहे. आम्ही जन धन खाते चळवळ सुरू केली. गेल्या 9 वर्षात देशभरात 48 कोटी जनधन खाती उघडण्यात आली, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

14:26 February 09

कर्नाटकात जनधन खाती किती मोठ्या प्रमाणात उघडली ते पाहा - मोदींचा खरगेंना टोला

कर्नाटकात जनधन खाती किती मोठ्या प्रमाणात उघडली आहेत. ते पाहा असा टोला मोदींनी खरगे यांना लगावला.

14:23 February 09

तुम्ही जेवढा चिखल टाकाल, तितके चांगले कमळ फुलेल - मोदी

मोदी म्हणाले की, मला या विरोधी खासदारांना सांगायचे आहे की, तुम्ही जेवढा चिखल टाकाल, तितके चांगले कमळ फुलेल.

14:20 February 09

काही खासदार या सभागृहाची बदनामी करत - मोदी

राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना विरोधी खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली आहे. अदानी मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्याची मागणी करत विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. या सभागृहात काय बोलले जाते ते देश काळजीपूर्वक ऐकतो. काही खासदार या सभागृहाची बदनामी करत आहेत. असे मोदींनी राज्यसभेत सांगितले.

14:17 February 09

काँग्रेसने फक्त खड्डे खोदून ठेवले होते - मोदी

काँग्रेसने फक्त खड्डे खोदून ठेवले होते. त्यामध्ये काँग्रेस गुरफटली होती.

14:15 February 09

राज्यसभेत मोदींची भाषणाला सुरुवात

राज्यसभेत मोदींची भाषणाला सुरुवात. विरोधकांची सुरवातीपासूनच घोषणाबाजीला सुरुवात.

13:53 February 09

2008 मध्ये मनसेच्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

ठाणे - ठाणे न्यायालयाने 14 वर्षांपूर्वी शहरातील आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या गटातील निर्दोष मुक्त केले आहे. सत्र न्यायाधीश डॉ. रचना आर तेहरा यांनी सांगितले की आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अयशस्वी ठरला आहे. मंगळवारी दिलेल्या आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध करून देण्यात आली.

13:39 February 09

राहुल गांधी यांनी फोन केल्यानंतर बाळासाहेब दाभेकर यांचे बंड थंड!

कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी पुकारलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षश्रेष्ठीकडून कालपासून दाभेकर यांची मनधरणी करण्यात आली असून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केल्यानंतर दाभेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

13:36 February 09

भाजपकडून त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री माणिक साहा यांनी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

13:35 February 09

उद्धव ठाकरे यांचे भाईंदरमध्ये शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश झाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी काशिमीरा येथिल शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी पुष्पहार घालून, उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत केले. भाईंदर पश्चिमेला कस्तुरी हॉस्पिटल समोरील वालचंद हाइटस या कॉम्प्लेक्समध्ये जैन मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

13:10 February 09

उपराष्ट्रपती आणि कायदा मंत्र्यांविरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई - उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या विरोधात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायपालिका आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात सार्वजनिक विधाने केल्यामुळे उपराष्ट्रपती आणि कायदामंत्री यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायवृंद न्यायपालिका आणि सर्वोच्च न्यायालयाविरोधात, सार्वजनिक आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुख्य न्यायाधीशांनी फेटाळून लावली.

13:06 February 09

कोचीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची राज्याच्या अर्थसंकल्पाविरोधात निदर्शने

कोची - केरळमधील कोची येथे भाजप कार्यकर्त्यांनी केरळ राज्याच्या अर्थसंकल्पाविरोधात निदर्शने केली. कामगारांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला.

12:55 February 09

भाजपाच्या कार्यक्रमातच वरिष्ठ महिला पदाधिकार्‍याला मारहाण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

वसई : भाजपच्या कार्यक्रमात एका महिला पदाधिकाऱ्याने वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. या कार्यक्रमात अनेक वरिष्ठ नेते हजर असताना हा प्रकार घडला आहे. भाजपतर्फे नालोसापारा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, जिल्हाध्यक्ष राजन नाईक तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

12:50 February 09

पुण्यातील व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याकडून फ्री सूप देणार्‍या स्टॉल मालकाला मारहाण

पुणे - एका 27 वर्षीय फूड स्टॉल मालकावर त्याच्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. हा विक्रेता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्री सूप देत होता. त्यावरुन नाराज झाल्याच्या कारणाने ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खडकी भागात सोमवारी ही घटना घडली. जेथे पीडित महिला आणि आरोपी त्यांचे फूड आउटलेट चालवत होते. पीडित मुलायम पाल यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जेवणापूर्वी फ्री सूप ची ऑफर दिली होती, असे खडकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

12:35 February 09

पंतप्रधानांना अस्वस्थ करणारे प्रश्न ऐकायचे नसतात - अधिररंजन चौधरी

नवी दिल्ली - पंतप्रधान कधीही मीडियाला सामोरे जात नाहीत कारण त्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न ऐकायचे नसतात. राहुल गांधींचे प्रश्न अस्वस्थ करणारे होते. राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाचे खंडन करण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतेही उत्तर नाही. हेच कालच्या मोदींच्या भाषणावरुन दिसते असा दावा अदानी मुद्द्यावर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.

12:31 February 09

आंध्रप्रदेशमध्ये रागमपेटा गावात खाद्यतेलाचा टँकर साफ करताना कामगारांना श्वसनाचा त्रास, अनेकजण दवाखान्यात

आंध्रप्रदेशमध्ये रागमपेटा गावात खाद्यतेल उत्पादक कंपनीचा टँकर साफ करताना त्यातील वायुचा श्वास घेतल्यानंतर कामगारांना त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेक कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे.

12:14 February 09

दाढी वाढवल्याने कोण प्रधानमंत्री होत नाही तर त्याला बुद्धी वाढवावी लागते - सुधीर मुनगंटीवार

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असतात ते म्हणाले की कोणीही दाढी वाढवली की पंतप्रधान होत नाही. तर त्याला बुद्धी वाढवावी लागते.

11:59 February 09

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी हायकोर्टाचा मार्ग मोकळा; भूसंपादनाविरोधातील याचिका फेटाळली

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राष्ट्रीय महत्त्वाचा आणि सार्वजनिक हिताचा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गोदरेज आणि बॉईस कंपनीने महाराष्ट्राने सुरू केलेल्या अधिग्रहण प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली. प्रकल्पासाठी विक्रोळी उपनगरातील जमीन आता सरकारला अधिगृहित करता येणार आहे.

11:49 February 09

एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन-हसन मुश्रीफ

एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका, असे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

11:48 February 09

भांडणाच्या कारणावरून नराधमाकडून बहिणीच्या पतीची हत्या

पालघर जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या बहिणीच्या पतीची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी गुरुवारी केला. ही घटना बुधवारी मोखाडा तालुक्यात घडली असून त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोखाडा परिसरातील ब्राम्हणगाव येथे राहणारा मयत महेंद्र भोये (30) याचे पत्नीसोबत वारंवार भांडणे होत असत.

11:48 February 09

ठाण्यात कारला आग; रहिवासी सुरक्षितपणे बचावले

ठाणे शहरात गुरुवारी पहाटे गाडीला आग लागल्याने कारमधील पाच प्रवासी थोडक्यात बचावले, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख 45 ते 65 वयोगटातील तीन पुरुष आणि दोन महिला कराड येथून मीरा रोड परिसरात घरी परतत असताना घोडबंदर रोडवरील गायमुख येथे पहाटे 1.40 च्या सुमारास ही घटना घडली.

11:47 February 09

आरपीएफ उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी हवालदाराला अटक

कल्याणमध्ये आरपीएफ उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी पंकज यादव नावाच्या आरपीएफ कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. त्याची पगारवाढ थांबवल्याने हवालदाराने हत्या केली आहे.

10:22 February 09

महाराष्ट्रातील जनता भीतीच्या छायेत-खासदार संजय राऊत

महाराष्ट्रातील जनता भीतीच्या छायेत आहे. जनता सरकारच्या कामकाजावर नाराज असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

10:14 February 09

पोर्तुगीज राजवटीच्या काळात उद्धवस्त झालेल्या मंदिराची गोवा सरकार करणार पुनर्बांधणी

गोव्यात पोर्तुगीज राजवटीच्या काळात उध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांची गोवा सरकारकडून नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील अनेक मंदिरे उध्वस्त करत तेथील नागरिकांचे धर्मांतरण करण्यात आले होते. आता हीच उध्वस्त करण्यात आलेली मंदिरे गोवा सरकारच्या वतीने नव्याने पुनर्बांधित करण्यात येणार आहेत. सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे 19 मंदिरांची यादी उपलब्ध झाली आहे.

09:46 February 09

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला प्रारंभ

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

09:44 February 09

डिस्ने 7,000 नोकऱ्या कमी करणार

डिस्ने 7,000 नोकऱ्या कमी करणार आहे. दुसरीकडे शेअरहोल्डरला बक्षीस देण्याची योजना आखत आहे.

09:43 February 09

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर निकाल आधी मग, शिवसेनेच्या चिन्हाचा निकाल-उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा

निवडणूक आयोगाच्या आदेशाला मी तयार आहे. पण जोपर्यंत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही, तोपर्यंत शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी, असे उद्धव ठाकरे यांनी मुंबईत म्हटले आहे.

09:35 February 09

हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार ओंकारेश्वर मंदिरापासून काढणार पदयात्रा

भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) , आर.पी.आय, शिवसंग्राम पक्ष, रा.स.प. महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिर येथून पदयात्रेची सुरुवात होणार आहे.

09:19 February 09

भारताला इस्लामिक राज्य बनवण्याचा पीएफआयचा प्लॅन, एनआयएच्या आरोपपत्रात माहिती

पीएफआयची 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राज्य बनवण्याचा प्लॅन असल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. प्रत्येक मुस्लिम घरातून एका व्यक्तीला संघटनेत भरती करण्याचा पीएफआयचा प्लॅन आहे.

09:18 February 09

नाशिकमधील तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल

गर्भागृहातील पिंडीवर बर्फ टाकल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकमधील तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09:17 February 09

महाविद्यालयामधून राज्याच्या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण करा-राजस्थान सरकारचे आदेश

राजस्थान सरकारने एक आदेश जारी करून सर्व सरकारी आणि खासगी विद्यापीठांना राज्याच्या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षक बजेटचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील. 10 फेब्रुवारीला राजस्थानच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर होणार आहे.

09:14 February 09

मराठवाड्यातील रेल्वे कोच कारखान्याला विलासराव देशमुख यांचे नाव द्या, काँग्रेस नेत्याची मागणी

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे नामकरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मातीचे सुपुत्र दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि लातूरचे माजी महापौर यांनी केली आहे.

08:41 February 09

केमिकलच्या स्फोटाने घर कोसळले एकाचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

औरंगाबादच्या हर्सूल परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टँकर मागे घेतना त्यामधील केमीकल खाली पडून झालेल्या स्फोटामुळे एक तरूण मजूर ठार, तर त्याचे आई-वडील आणि भाऊ जखमी झाले. रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्सल परिसरातील चेतनानगर येथील वीटभट्टीजवळ ही घटना घडली आहे.

07:57 February 09

आसाममध्ये ३३ लाखांच्या बनावट जप्त, दोघांना अटक

पोलिसांनी बनावट भारतीय नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करत आसाममधील नागाव जिल्ह्यात दोघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या बनावट चलनाची किंमत 33 लाखांपेक्षा जास्त आहे.

07:32 February 09

ट्विटरच्या सेवेत त्रुटी, वापरकर्ते झाले त्रस्त

ट्विटर वापरकर्त्यांना बुधवारी रात्री मायक्रोब्लॉगिंग साइटवर विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. नवीन ट्विट पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या काही वापरकर्त्यांना "तुम्ही ट्विट पाठवण्याची दैनिक मर्यादा ओलांडली आहात, असे पॉप-अप प्राप्त झाले.

07:09 February 09

एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, मृतामध्ये ३ मुलांचा समावेश

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले आहेत. मृतामध्ये ३ मुलांचा समावेश आहे.

07:07 February 09

तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू

तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत 15,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

06:25 February 09

Breaking News Maharashtra Today : कितीही हल्ले करा, मी घाबरणार नाही- आमदार प्रज्ञा सातव

हिंगोली : माझ्यावर अशाप्रकारे किती हल्ले करा. मी अजिबात घाबरणार नाही. एका महिला आमदारावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला केल्यासारखे आहे. परंतु अशा हल्ल्याने माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. माझ्या पाठीमागे दिवंगत खासदार राजू सातव यांचे आशीर्वाद आहेत. त्यांचे राहिलेले स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी अहोरात्र लोकांची कामे करणार आहे. त्यामुळे अशा हल्ल्याने माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच मी अजिबात कुणाचे वाईट करत नाही. माझ्या जीविताला धोका असला तरीही मी जनतेची कामे करणार आहे असे आमदार प्रज्ञा सातव यांनी सांगितले.

Last Updated : Feb 9, 2023, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details