पंढरपूर : पंढरपूरला देव दर्शनाला जाणाऱ्या खाजगीबस चा अपघात, एक ठार तर 29 जखमी.
Breaking News : पंढरपुरला देव दर्शनाला जाणाऱ्या खाजगी बसला अपघात, एक ठार तर 29 जण जखमी - Maharashtra political news
18:05 January 18
Breaking News : पंढरपुरला देव दर्शनाला जाणाऱ्या खाजगी बसला अपघात, एक ठार तर 29 जण जखमी
17:11 January 18
वादग्रस्त सहायक पोलिस आयुक्त विशाल धुमे निलंबित
औरंगाबाद : येथील वादग्रस्त सहायक पोलिस आयुक्त विशाल धुमे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना निलंबित केले नाही तर शुक्रवारी बंद पाळण्याचा इशारा खासदार जलील यांनी दिला होता. नागेश्वरवाडी येथील पीडितेचा या एसीपीने विनयभंग केला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एसीपीने अनेकांना मारहाण केली होती.
16:58 January 18
सातारा जिल्ह्यात सहलीच्या गाडीला अपघात, विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी
कराड - कोरेगाव तालुक्यातील वाघोलीच्या भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बसला सहलीहून परत येताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका हद्दीत पहाटे अपघात झाला. या अपघातात सुरेश रामचंद्र यादव (वय ४२), उमेश गोपाळराव देशमुख (वय ५५), हनुमंत गोरोबा माने (वय ३५) या शिक्षकांसह आर्यन अमोल गंगावणे (वय १४), आसिफ इम्तियाज पठाण (वय १३) आणि आर्या किशोर भोईटे (वय १३) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाच जणांवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात तर एका मुलीवर सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
16:54 January 18
BMC प्रभाग संख्या आणि वॉर्ड फेररचना याचिकेवरील सर्व पक्षांची सुनावणी पूर्ण
मुंबई - BMC प्रभाग संख्या आणि वॉर्ड फेररचना याचिकेवरील सर्व पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे. कोर्टाने यासंदर्भातील निकाल राखीव ठेवला आहे.
15:25 January 18
मुंबईतील प्रभाग संख्या आणि वॉर्ड पुनरर्चना याचिकेवर सुनावणी सुरू
मुंबई - मुंबईतील प्रभाग संख्या आणि वॉर्ड पुनरर्चना याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हा अत्यंत महत्वाचा खटला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर, समीर देसाई यांची ही याचिका आहे. राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ तर याचिकाकर्त्यांच्या वतीने पावसकर यांनी बाजू मांडली आहे. आज या खटल्याची अंतिम सुनावणी होत आहे.
15:05 January 18
मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडच्या विधानसभा निवडणुका जाहीर, 2 मार्चला निकाल
मुंबई - मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडच्या विधानसभा निवडणुका जाहीर. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला, नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली.
14:12 January 18
सलीम कुरेशीच्या कुटुंबाचा बेकायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये प्रवेश, आरोपपत्रात माहिती
मुंबई - दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य सलीम कुरेशीच्या कुटुंबाने बेकायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी छोटा शकीलच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी 2013 पासून तीनवेळा संयुक्त अरब अमिरातीमार्गे पाकिस्तानात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. राष्ट्रीय तपास संस्थेच्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आल आहे.
13:17 January 18
कुस्तीपटूंची रेसलिंग फेडरेशनविरोधात निदर्शने
कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिकख, विनेश फोगट आणि इतरांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) विरोधात निदर्शने केली. फेडरेशन आपल्या मनमानी नियम आणि नियमांद्वारे कुस्तीपटूंचा छळ केल्याचा कुस्तीपटूंनी आरोप केला आहे.
12:42 January 18
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नो फ्लाय झोन जाहीर
मुंबई - पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या दि 19 जानेवारी रोजी बीकेसी, अंधेरी, मेघवाडी तसेच जोगेश्वरी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट फ्लाइंगवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश आज रात्री 12 ते उद्या रात्री 11 वाजेपर्यंत लागू राहील.
12:17 January 18
नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्याविरुद्ध कुर्ला पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फराज मलिकवर व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. काल रात्री मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात फराज मलिकविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
12:07 January 18
मेघालय, नागालँड, त्रिपुराच्या विधानसभा निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता
नवी दिल्ली - मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा राज्यांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहेत. दुपारी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे.
11:55 January 18
परळी कोर्टाकडून राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द
५०० रुपयांचा दंड ठोठावत परळी कोर्टाने राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द केले आहे.
10:53 January 18
नाना पटोले यांचे नेते व कार्यकर्त्यांवर नियंत्रण नाही- आशिष देशमुख यांचा काँग्रेसला घरचा आहेर
वेळेवर निर्णय न घेतल्याने महाराष्ट्रात काँग्रेसला रोज नवनवीन अपमानाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस महाराष्ट्राला बळकट करू शकते. पण पक्षाच्या राज्य नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे ते होत नाही. महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागतात त्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नियंत्रण नाही, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार आशिष आर देशमुख यांनी केला आहे.
10:52 January 18
नवाब मलिक यांचा मुलगा अडचणीत, बनावट कागदपत्र प्रकरणात गुन्हा दाखल
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरुद्ध कुर्ला पीएस येथे व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्रे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10:49 January 18
हवेच्या गुणवत्तेची देखरेख ठेवण्यासाठी नवीन केंद्रे प्रस्तावित
हवेच्या गुणवत्तेची देखरेख वाढवून शहरातील प्रदूषण स्रोतांना जोडण्यासाठी राष्ट्रव्यापी स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत अधिक देखरेख केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार पाहता ही संख्या वाढवावी लागेल.
10:30 January 18
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर दोन तास मेट्रो धावणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी पश्चिम उपनगरातील मेट्रो 7 कॉरिडॉरला भेट देणार असल्याने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो I सेवा गुरुवारी संध्याकाळी 5. 45 ते 7. 30 दरम्यान धावणार नाही.
10:29 January 18
10:28 January 18
10:25 January 18
मुंबईत कोरोनाचा नव्या वर्षातील पहिला मृत्यू
मृत्यूची नोंद न झाल्याच्या जवळपास एक महिन्यानंतर, मुंबईत कोरोनाने 68 वर्षीय व्यक्तीचे निधन झाले आहे. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी मुंबईत मृत्यूची नोंद झाली होती.
09:31 January 18
आदिवासींचे १४ दिवसांपासून छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर आंदोलन, पुलाच्या बांधकामाला विरोध
इंद्रावती नदीवर पुलाच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील आदिवासी समुदायांचे सदस्य गेल्या १४ दिवसांपासून राज्याच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील 20-25 खेड्यातील लोक इथे आले आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही येथे मूलभूत सुविधा नाहीत. असे पूल केवळ 'जल-जंगल-जमीन' लुटण्यासाठी आहेत. 4 जानेवारीपासून आंदोलन सुरू असल्याचे आदिवासी नेते लालसू नोगोटी यांनी सांगितले.
09:15 January 18
जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना भीषण आग
पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना आज पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली लागल्याची घटना घडली आहे. मंगळवार पेठत जुना बाजारमध्ये अनेक वस्तूंची दुकान आहेत. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझविण्याचे काम अग्निशामन जवानांकडून सुरू होते. अखेर आज विझली आहे.
08:49 January 18
शिवसेना नेते संजय राऊत यांचा जामीन रद्द करा, ईडीच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावे याकरिता ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायमूर्ती नीतीन बोरकर यांच्या एक सदस्य खंडपीठांसमोर सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीच्या याचिकेवर उच्च न्यायालय आज काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
08:28 January 18
निवृत्त आयपीएस अधिकारी पंकज कुमार सिंग यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती
निवृत्त आयपीएस अधिकारी पंकज कुमार सिंग यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी कराराच्या आधारावर पुन्हा नोकरीवर घेण्यात आल्याचे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने म्हटले आहे.
08:10 January 18
काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेला हिमाचल प्रदेशमधून सुरुवात
दाट धुके असताना काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेला हिमाचल प्रदेशातील घट्टा येथून सुरुवात झाली आहे.
07:05 January 18
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्वत:च्या सैन्यावर दाखविला अविश्वास
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांनी अध्यक्षीय निवासस्थानातील 40 रक्षकांना काढून टाकले. त्यांनी सैन्यावर अविश्वास व्यक्त केला आहे.
07:04 January 18
जंगलात लपवून ठेवलेली 10 हजार लिटरहून अधिक दारू नष्ट
उत्तराखंड पोलिसांनी जंगलात लपवून ठेवलेली 10 हजार लिटरहून अधिक कच्ची दारू नष्ट केली. ड्रोनच्या मदतीने पोलिसांनी ही लपविली दारू शोधली.
07:00 January 18
नितीश कुमार यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल आरजेडीने दाखविली सुधाकर सिंह यांना नोटीस
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल आरजेडीने पक्षाचे नेते सुधाकर सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
06:59 January 18
मायक्रोसॉफ्ट आज हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार
मायक्रोसॉफ्ट आज हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. ही अॅमेझॉननंतर मोठी कर्मचारी कपात ठरणार आहे.
06:44 January 18
Breaking News : राज्य शासनाच्या अध्यादेशात हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख, वाद निर्माण होण्याची शक्यता
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने काढलेल्या अध्यादेशात ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे सर्वस्तरातून अध्यादेशावर टीका होत आहे.