सांगली - जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रंग भरलेला असताना,आता करणी भानामतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खानापूरच्या एका ग्रामपंचायतीच्या पॅनलवरच थेट करणी-भानामती करण्यात आली आहे,तर वाळवा तालुक्यातल्या कनेगाव या ठिकाणी देखील बारामती केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Breaking News : आंतरजातीय नव्हे आंतर धर्मीय समिती, सरकारचा नवा जीआर - महाराष्ट्र लाईव्ह अपडेट्स
21:30 December 15
ग्रामपंचायत निवडणूक - थेट पॅनलवरचं करणी-भानामतीचा धक्कादायक प्रकार
21:30 December 15
मुंबईच्या राणी बागेचं नामांतर, आता राणीबाग या नावाने ओळखली जाणार
मुंबई - बच्चे कंपनीचं आवडतं ठिकाण म्हणून राणी बागेची ओळख आहे. या ठिकाणी असलेले प्राणी पक्षी आणि झाडे यामुळे पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. या राणी बागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय असे होते. मात्र आता हे मात्र आता राणीबाग वीर जिजामाता भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय या नावाने ओळखली जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मंजूर केला आहे.
21:29 December 15
आंतरजातीय नव्हे आंतर धर्मीय समिती, सरकारचा नवा जीआर
मुंबई - राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केल्याची घोषणा नुकतीच केली होती. मात्र, सरकारने आता या समितीच्या नावात बदल केला असून आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीबाबत महिला व बालविकास विभागाकडून नवा जीआर काढण्यात आला आहे.
20:45 December 15
निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज. 55 ईव्हीएम मशीन सीलबंद
बुलढाणा - तालुक्यातील दहा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रशासन देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने सज्ज झाले आहे आज 15 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात या निवडणूक प्रक्रियेत लागणाऱ्या ईव्हीएम मशीन सीलबंद करण्यात आल्या आहेत.
20:44 December 15
कोरेगावात राष्ट्रवादी-शिंदे गट आमनेसामने, घोषणाबाजीमुळे तणाव
सातारा - कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावात बुधवारी रात्री आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे गट आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने घोषणाबाजी होऊन तणाव निर्माण झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'कोण आला रे कोण आला, गुवाहाटीचा चोर आला', अशा घोषणा दिल्या. कुमठे (ता. कोरेगाव) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची कोपरा सभा होती. सभेची नियोजित जागा बदलल्याने हा राडा झाला आहे. पोलीस फौजफाटा दाखल झाल्यानंतर दोन्ही गटांना पांगविण्यात आले.
19:59 December 15
राज्यात तातडीने नागरी निवडणुका झाल्या पाहिजेत - राज ठाकरे
ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यासह राज्यातील विविध नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्यात याव्यात, असे सांगितले.
19:50 December 15
उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल
लातूर - पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी येथील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. मात्र या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
19:37 December 15
९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्याला अटक, बकरीवरही केला होता बलात्कार
ठाणे : ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी आईच्या कुशीत झोपेत असतानाच ३२ वर्षीय नराधमाने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाचा १४ दिवस अहोरात्र शोध घेऊन त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थनाक परिसरात असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात १ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. सुरज शंकर सिंग उर्फ विरेंद्र शंकर मिश्रा वय ३२ असे अटक केलेल्या नाराधमाचे नाव आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने पूर्वीही अल्पवयीन मुलीसह बकरीवर अत्याचार केल्याचे त्याचे विकृत रूप समोर आले आहे.
19:27 December 15
अग्नी-5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या रात्रीच्या चाचण्या यशस्वी
भारताने आज अग्नी-5 अण्वस्त्रधारण क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या रात्रीच्या चाचण्या यशस्वीपणे केल्या. 5,000 किलोमीटरच्या पलीकडे लक्ष्यांवर हे क्षेपणास्त्र मारा करू शकते, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
19:09 December 15
जग काहीही म्हणो आमच्यासारखे लोक सकारात्मक राहतील - शाहरुख खान
कोलकाता -कोलकाता फिल्म फेस्टीव्हलमध्ये शाहरुख खानने अनेक गोष्टींवर आपले मत मांडले. शाहरुख म्हणाला की, सोशल मिडीया हे बर्याचदा विशिष्ट संकुचित दृष्टीकोनातून चालवले जाते. जे मानवी स्वभावाला त्याच्या मूळ स्वत्वापुरते मर्यादित करते. शाहरुख पुढे म्हणाला की, 'मी कुठेतरी वाचले आहे, नकारात्मकता सोशल मीडियाचा वापर वाढवते. अशा प्रयत्नांमुळे सामुहिक विचारात फूट पडते आणि माणूस तसेच समाज विध्वंसक होतो.' मात्र जग काहीही म्हणो, आमच्यासारखे लोक सकारात्मक राहतील, असेही शाहरुखने यावेळी स्पष्ट केले.
18:29 December 15
17 तारखेच्या महामोर्चाला सर्व जनतेने उपस्थित राहावे - अजित पवार
मुंबई -सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे 17 तारखेचा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नाही. या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
18:17 December 15
पुण्यात नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटिंग
पुणे - येथील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटिंग करण्यात येत होते. चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑफीसच्या शौचालयात हा प्रकार घडला आहे. मोबाईलच्या साह्याने हे शूटिंग करण्यात येत होते. चतुशृंगी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
18:06 December 15
शिवारात सापडले ६० वर्षीय शेतकरी मालकाच्या मृतदेहाचे तुकडे
लातूर : शहराच्या नजिक असलेल्या बाभळगाव शिवारात एका ६० वर्षीय शेतकऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे त्याच्याच शेतात आढळून आले आहेत. त्यामुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या शेतकऱ्याचा खून आहे की हिंस्त्र प्राण्याने केलेला हल्ला हे स्पष्ट झालेले नाही. बशीर शेख असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
17:39 December 15
सीमाप्रश्नाकडे सामाजिक बांधिलकी म्हणून पहा राजकीय मुद्दा म्हणून नाही - एकनाथ शिंदे
मुंबई - केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक महाराष्ट्राच्या वादात हस्तक्षेप केला आहे. आजपर्यंत इतकी सरकारे येऊन गेली कोणालाही हस्तक्षेप करावा वाटला नाही. दोन्ही राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्राने मदतीची घोषणा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते पत्रकारांना माहिती देत होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी तशा सूचना कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही दिल्या आहेत. या प्रश्नाकडे सामाजिक बांधिलकी म्हणून पहा राजकीय मुद्दा म्हणून नाही, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांना काय बोलायचं ते बोलू द्या
16:41 December 15
विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीची बैठक सुरू
मुंबई - १७ डिसेंबरच्या विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीची बैठक सुरू. अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजित पवार, जितेंद्र आव्हाड सचिन आहिर सुभाष देसाई बैठकीत आहेत.
16:29 December 15
सुषमा अंंधारेंनी आरशात बघावे आणि मग दुसऱ्यांना माकड म्हणावे - आशा मामिडी
मुंबई - सुषमाअंंधारेंनी आरशात बघावे आणि मग दुसऱ्यांना माकड म्हणावे असे, बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या उपनेत्या आशा मामिडी यांनी म्हटले आहे. पक्षात त्यांचे योगदान काय असा सवालही त्यांनी केला. प्रसिद्धीसाठी त्या कुणावरही काहीही बोलत आहेत. अंधारे या फक्त टीका करत आहेत. अंधारे सुपारी घेऊन काम करत आहेत, असेही मामडी यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी उजेड बाजूला केला आहे आणि अंधार जवळ केला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
16:14 December 15
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची घेतली भेट
मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. सागर निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. मुंबई-गोवा महामार्ग समृद्धी महामार्गाप्रमाणे तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली.
15:47 December 15
महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून वरिष्ठ अधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती
मुंबई - राज्यपाल कोश्यारी यांनी 15 डिसेंबरपासून महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून वरिष्ठ अधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती केली. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे.
15:37 December 15
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, चंद्रपुरात यावर्षी 50 जण वाघाच्या भक्षस्थानी
चंद्रपूर - महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी एका 50 वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या वर्षभरात वाघांच्या हल्ल्यात चंद्रपूरमध्ये 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
15:11 December 15
मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवा सुरू
मुंबई - मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला त्यामुळे चालना मिळणार आहे. विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी झाले होते.
15:01 December 15
श्रद्धा खून प्रकरणी डीएनए आणि पॉलीग्राफ चाचणी अहवाल पोलिसांना मिळाले
नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणी पोलिसांना दोन्ही अर्थात डीएनए आणि पॉलीग्राफ चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यामुळे पुढील तपासात पोलिसांना मदत होईल. जप्त केलेले मृतदेहाचे तुकडेही तपासासाठी शवविच्छेदन विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत. दिल्लीचे विशेष सीपी कायदा आणि सुव्यवस्था सागर प्रीत हुडा यांनी ही माहिती दिली.
14:51 December 15
बातमीतील चुकीच्या फोटोची सरमिसळ केल्याबद्दल अभिनेत्रीची तक्रार
मुंबई - मुंबईतील जुहू येथे तिच्या मुलाने कथितरित्या खून केलेल्या ज्येष्ठ महिलेच्या जागी संबंधित अभिनत्रीचा फोटो एका बातमीत वापरण्यात आला होता. आता या अभिनेत्रीच्या तक्रारीवरून बदनामीचा एक अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
14:42 December 15
संजय राऊत यांचे न्यायालयात जामीनदार हमीपत्र सादर
मुंबई - शिवसेना नेता संजय राऊत मुंबई सत्र न्यायालय दाखल झाले आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ते हजर आहेत. 4 आठवड्यात जामीनदार हमीपत्र सादर करण्यासाठी ते हजर झालेत. कोर्टासमोर समक्ष हजर होऊन हे हमीपत्र सादर करावे लागते. भाऊसाहेब चौधरी यांनी संजय राऊत यांची हमी दिली आहे. भाऊसाहेब हे शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहेत.
14:14 December 15
पठाण सिनेमावर बंदी घालण्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील - अब्दुल सत्तार
मुंबई -शाहरुख खानच्या पठाण सिनेमात भगव्या रंगाची बिकिनी वापरून जर बेशरम रंग असे गीत असेल तर ते काढून टाकण्यात यावे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर सिनेमावर बंदी घालण्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली आहे.
13:55 December 15
सिल्लोड येथे कृषी महोत्सवाचे आयोजन - अब्दुल सत्तार
राज्यात कृषि महोत्सव घेण्यात येणार आहे. सिल्लोड येथे कृषी महोत्सव होईल. १ जानेवारी ते ५ जानेवारीदरम्यान महोत्सव होणार आहे. सर्व कृषी विद्यापीठे आणि शेतकरी उद्योजक सहभागी होणार आहे.
13:44 December 15
श्रद्धा खून प्रकरण - हाडांचे नमुने श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळले
नवी दिल्ली -श्रद्धा खून प्रकरणी काही हाडांचे नमुने श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळले आहेत. ते श्रद्धाचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही हाडे दिल्ली पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून गोळा केली होती. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
13:41 December 15
अविघ्न पार्क इमारतीला लागलेली आग आता आटोक्यात
मुंबईतील अविघ्न पार्क इमारतीला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे.
13:37 December 15
भूमापन अधिकारी असल्याचे भासवून लाच मागणारा पोलिसांच्या जाळ्यात
ठाणे - रायगडमधील भूखंड विक्रेत्याकडून भूमापन विभागाचे कर्मचारी असल्याचे भासवून 3 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका व्यक्तीला महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. 45 वर्षीय आरोपीने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील धोत्रेगाव येथे आपली जमीन विकणाऱ्या एका व्यक्तीला स्वत:ची ओळख भूमी अभिलेख अधिकारी म्हणून करून दिली. त्याला भूखंडाचे मोजमाप करायचे होते, असे त्याने सांगितले. आरोपींनी जमिनीचे मोजमाप करण्यासाठी आणि प्रमाणपत्र देण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली. एक लाख रुपये स्वीकारताना बुधवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13:29 December 15
भिवंडीत अटकेला विरोध, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक
ठाणे - भिवंडी येथे पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. निजामपुरा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोडीन फॉस्फेट, सामान्यत: वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधाच्या ताब्यात असलेल्या अटकेला विरोध करत असताना भावंडांनी दोन पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर ही अटक करण्यात आली.
13:26 December 15
भिवंडीत ७.११ लाख रुपयांच्या गुटख्यासह दोघांना अटक
ठाणे - जिल्ह्यातील भिवंडी येथे 7.11 लाख रुपयांच्या बंदी असलेल्या गुटख्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
12:36 December 15
केरळमध्ये लिव्ह-इन पार्टनरनेच चाकूने वार करून केली हत्या
सिंदू या महिलेची आज तिचा लिव्ह-इन पार्टनर राजेश याने वार करून हत्या केली. त्याची रवानगी आता पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, राजेश गेल्या 2 वर्षांपासून तिच्यासोबत राहत होता. काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. तिला रुग्णालयात नेण्यात आले पण तिचा मृत्यू झाला.
12:34 December 15
महापुरुषांचा अवमान प्रकरणीवरळी बंदला समिश्र प्रतिसाद
मुंबई - महापुरूषांबाबतच्या सतत वादग्रस्त वक्तव्याचे लोट उसळले आहेत. हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळले जात आहे. नुकताच पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आता मुंबईतील वरळी भागात आंबेडकरवादी संघटनांच्यावतीने बंदची हाक दिली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. वरळीतील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
12:17 December 15
स्वार्थासाठी जातीधर्मात तेढ निर्माण केली जात आहे - खा. उदयनराजे भोसले
सातारा - स्वार्थासाठी जातीधर्मात तेढ निर्माण केली जात आहे. महापुरुषांविरोधात मानहानीची वक्तव्ये केली जात आहेत. जगातील सरगळ्यात मोठ्या लोकशाहीसाठी हे योग्य नाही असे मत खा. उदयनराजे भोसले यांनी मांडले आहे.
12:09 December 15
नवनीत राणा जातपडताळणी प्रकरणी पुढील सुनावणी 22 डिसेंबरला
मुंबई - खासदार नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणात शिवडी कोर्टाकडून अजामीन पत्र वॉरंट काढण्यात आले होते. या प्रकरणात आज शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टासमोर सुनावणी झाली. खासदार नवनीत राणा दिल्लीत असल्याने कोर्टात उपस्थित राहिल्या नाहीत. राणा यांच्या वकीलांनी उपस्थित राहण्यापासून सूट देण्याची विनंती केली. कोर्टाने ती मान्य करुन पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होईल असे स्पष्ट केले.
12:03 December 15
लाचखोरावर कारवाईसाठी थेट पुराव्याची गरज नाही - घटनापीठ
नवी दिल्ली -सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने असे म्हटले आहे की लाच मागितल्याचा थेट पुरावा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यासाठी आवश्यक नाही. त्याच्या किंवा तिच्याविरुद्ध कोणताही थेट पुरावा नसताना परिस्थितीजन्य पुराव्याद्वारे देखील लाच घेतल्याचे सिद्ध होत असेल तर कारवाई होऊ शकते, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
11:58 December 15
बीडच्या रुई गावात भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या जाहीर प्रचार सभेत गोंधळ
बीड - भाजप कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. आमदार लक्ष्मण पवारांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काल रात्री सुरू असलेल्या प्रचार सभेत शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी गोंधळ घातला. यावेळी आमदार पवार यांना घेराव घातल्याने सभा रद्द करण्यात आली. तर घटनेची माहिती कळताच पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड घटनास्थळी दाखल झाले होते.
11:54 December 15
एकसंघेतेला धक्का लागेल असे आमच्याकडून काही घडणार नाही - अजित पवार
मुंबई -राज्याच्या आणि देशाच्या एकसंघेतेला धक्का लागेल असे आमच्याकडून काही घडणार नाही. आम्ही सत्तेत आणि विरोधात काम केले आहे. आजही विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत. तरीपण केंद्र सरकारला किंवा दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शंका असेल तर त्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे, अशी अपेक्षा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते मुंबईत बोलत होते. सगळे सुरळीत सुरू असताना असे का झाले, याच्या मागे कोणी मास्टरमाईंड आहे का, असा सवालही अजित पवार यांनी विचारला.
11:50 December 15
आरएसएसशी संबंधित बीकेएसचा पुढील आठवड्यात दिल्लीत मोर्चा
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) संलग्न भारतीय किसान संघ (बीकेएस) या शेतकर्यांच्या संघटनेने 19 डिसेंबर रोजी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरील 'किसान गर्जना' निषेध मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी विविध मदत उपाययोजना करण्याची त्यांची मागणी आहे. बीकेएसचे कार्यकारी समिती सदस्य नाना आखरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध इत्यादी पुरवणारे शेतकरी आज त्यांच्या शेतमालाचा परतावा न मिळाल्याने खूप निराश झाले आहेत. त्यामुळे ते आत्महत्या करत आहेत.
11:45 December 15
विमानतळावरील गर्दीचा आढावा घेणार केंद्रीय गृहसचिव
नवी दिल्ली - केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला गुरुवारी विमानतळांवर विशेषत: दिल्ली आणि मुंबईतील गर्दीच्या मुद्द्याचा यासंदर्भातील सर्वांच्याबरोबर चर्चा करून आढावा घेतील. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. प्रवेशद्वारांवर होणारी गर्दी, सामान खाली पडणे आणि सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भल्ला यांनी याबाबत बैठक बोलावली आहे.
11:39 December 15
पुण्यात भवानी पेठेत आढळले गोवरचे दोन रुग्ण
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शहरांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. आता पुण्यात देखील गोवरने शिरकाव केला. पुण्यातील भवानी पेठेत गोवरचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील भवानी पेठेतील लोहियानगर, कासेवाडी या भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. गोवरसदृश आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. चाचणीनंतर त्यांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. एकाच भागातील हे रुग्ण असल्याने या भागाला गोवर उद्रेक क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आहे.
11:24 December 15
राज्यसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब
विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.
11:04 December 15
मुंबईतील वन अविघ्न इमारतीला आग
मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीमुळे अनेकजण अडकल्याची माहिती आहे. अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या रवाना झाल्या आहेत.
10:24 December 15
अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल रामचंद्र यादवला अटक
अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल रामचंद्र यादवला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 12 बोअरची शस्त्रे जप्त केली आहेत.
09:45 December 15
महापुरुषाचा अवमान झाल्याचा मोर्चा काढायचा नाही का? संजय राऊत यांचा सवाल
लोकशाही मार्गाने गेलेल्या आंदोलनास सरकार आडकाठी असू शकत नाही. राहुल गांधींची यात्रा एक आंदोलनच आहे. सीमाभागात अजूनही तणाव आहे. महाराष्ट्राचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचू. १७ तारखेच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही. महापुरुषाचा अवमान झाल्याचा मोर्चा काढायचा नाही का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
09:30 December 15
बिहारमध्ये बनावट दारुच्या सेवनामुळे मृतांची संख्या ३० वर पोहोचली
चपरा येथे बनावट दारूच्या सेवनामुळे मृतांची संख्या 30 वर पोहोचली आहे.
09:23 December 15
अर्ध घर तेलंगणात, अर्धे घर महाराष्ट्रात...
1969 मध्ये जेव्हा हद्दीचा सर्व्हे करण्यात आला. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की आमचे अर्धे घर महाराष्ट्रात आहे आणि अर्धे तेलंगणात आहे. आम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. आम्ही दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायतींसाठी कर भरत आहोत. तेलंगणा सरकारच्या योजनांतर्गत अधिक लाभ मिळवत आहोत, असे ग्रामस्थ उत्तम पवार यांनी सांगितले.
07:24 December 15
जवाहरलाल नेहरू ड्रग्ज घ्यायचे, सिगारेट ओढायचे- केंद्रीय राज्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
जवाहरलाल नेहरू ड्रग्ज घ्यायचे, सिगारेट ओढायचे आणि महात्मा गांधींचा एक मुलगा ड्रग्ज घेत असे. तुम्ही वाचले आणि पाहिले तर तुम्हाला कळेल, वादग्रस्त विधान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी केले. ते व्यसमुक्ती जनजागृती कार्यक्रमात राजस्थानमध्ये बोलत होते.
07:21 December 15
हार्बर रेल्वे मार्गावरील ट्रेन 15 मिनिटे उशिरा
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी मार्गावर जुई नगर रेल्वे स्थानका जवळ सिग्नल बिघाड झाला. त्यामुळे ट्रेन 15 मिनिटे उशिरा धावत आहे. याचा फटका प्रवाशांना बसला आहे.
06:50 December 15
गोव्यात कोळसा खाणींचा ई-लिलाव सुरू-प्रमोद सावंत
गोव्यात कोळसा खाणींचा ई-लिलाव सुरू झाला. पहिला ब्लॉक वेदांत कंपनीने विकत घेतला. इतर 3 ब्लॉक्ससाठी ई-लिलाव पुढे चालू राहील. सहा महिन्यांत नियमित खाणकाम पूर्ण रीतीने सुरू होईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
06:48 December 15
मुंबईतील बेस्ट बसेसवर कर्नाटकाच्या जाहिराती, आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
मुंबईतील बेस्ट बसेसवर कर्नाटकाच्या जाहिराती आहेत. कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नावरून मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा, असे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे.
06:47 December 15
कोरोनाची कशी झाली उत्पत्ती, डाटा देण्याची जागतिक आरोग्य संघटनेची चीनकडे मागणी
डब्ल्यूएचओ प्रमुखांनी चीनला कोविड -19 च्या उत्पत्तीची तपासणी करण्यासाठी डाटा देण्याची विनंती केली आहे.
06:09 December 15
Breaking News : राज्यसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब
मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे खार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयासमोर नियमित तारखेला हजर न राहिल्याने राणा दामप्त्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी पुन्हा जामीन पत्र वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे राणा दामप्त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणावर पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होणार आहे.