महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये अव्वल - राष्ट्रपती मुर्मू

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jan 25, 2023, 6:46 AM IST

Updated : Jan 25, 2023, 7:59 PM IST

19:55 January 25

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये अव्वल - राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली - केंद्राची अत्यंत उत्तम आर्थिक धोरणे देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. त्यामुळेच भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये अव्वल असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्या बोलत होत्या.

19:40 January 25

योगी सरकारमुळे उत्तर प्रदेशमध्ये काहीही प्रगती नाही - काँग्रेस आमदार आराधना मिश्रा

नागपूर - उत्तर प्रदेश काँग्रेसच्या आमदार आराधना मिश्रा यांनी सांगितले की, जोपर्यंत व्यावसायिकांना चांगल्या पायाभूत सुविधांसोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचीही खात्री मिळत नाही तोपर्यंत नवीन उद्योग उत्तरेकडील राज्यात येणार नाहीत. त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीवर टीका केली. गेली पाच वर्षे त्यांनी काहीच सुविधा निर्माण केल्या नाहीत, त्यामुळे उद्योग येत नाहीत असे त्या म्हणाल्या.

19:23 January 25

नवाब मलिक यांच्या मुलाला दिलासा, खोटी कागदपत्रे प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई - माजी मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि त्याची फ्रेंच पत्नी लॉरा हेमेलिन उर्फ आयशा यांनी फसवणूक आणि बोगस कागदपत्रे तयार केल्याचा काही ठोस पुरावा नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे मुंबई न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

19:16 January 25

भारतीय अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी गगनयान कार्यक्रम प्रगतीपथावर - राष्ट्रपती

नवी दिल्ली - भारतीय अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी गगनयान कार्यक्रम प्रगतीपथावर आहे. हे भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण असेल अशी माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात दिली.

18:55 January 25

अविनाश भोसले यांना तीन दिवसात तुरुंगात टाका - कोर्टाचे आदेश

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना न्यायालयाने दणका दिला आहे. डीएचएफएल आणि येस बँक घोटाळा प्रकरणी तीन दिवसात जे.जे. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासणी चाचणी पूर्ण करून तुरुंगात पाठवावे असा आदेश पीएमएलए कोर्टने दिला आहे. अविनाश भोसले यांच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीबीआयच्या वतीने अविनाश भोसले यांच्या उपचाराला विरोध करण्यात आला आहे.

18:47 January 25

उद्या जगातील पहिली मेड-इन-इंडिया कोविड-19 नाकातून देण्याची लस लाँच होणार

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्री उद्या जगातील पहिली मेड-इन-इंडिया कोविड-19 नाकातून देण्याची लस लाँच करणार आहेत. हैदराबाद येथील भारत बायोटेकचा इंट्रानासल हेटरोलॉगस बूस्टर डोस फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

18:08 January 25

ऑस्ट्रेलियन ओपन : नोव्हाक जोकोविचने आंद्रे रुबलेव्हला पराभूत करून गाठली उपांत्य फेरी

मेलबर्न - नऊ वेळचा चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला आहे. त्याने उत्कृष्ट खेळ करुन आंद्रे रुबलेव्हला हरवले. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याने प्रवेश केला आहे.

16:12 January 25

वांद्रे परिसरात बेस्टच्या बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षित

मुंबई - वांद्रे परिसरात बेस्टच्या बसला आग लागली होती. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या अपघाताचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. या अपघातात सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची पुष्टी केली. आग व धुराचे लोट पाहून बेस्टच्या चालकाने तात्काळ बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले.

15:38 January 25

प्रजासत्ताक दिनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क

मुंबई : उद्या संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत.

15:32 January 25

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीसाठी पात्र

हैदराबाद - टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. इंग्लंडच्या नील स्कुप्स्की आणि युनायटेड स्टेट्सच्या डेसिरे क्रॉझिक या तिसऱ्या मानांकित जोडीचा पराभव त्यांनी केला.

15:27 January 25

भिवंडीत लागोपाठ दोन अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार करून खून

ठाणे - जिल्ह्यात लागोपाठ दोन अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार करून हत्येच्या घटनांनी भिवंडी हादरली आहे. अशा निर्घृण घटना लागोपाठ घडल्याने शहर परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांच्यापुढे अशा घटनांना चाप कसा घालायचा हे एकप्रकारे आव्हान उभे राहिले आहे.

15:06 January 25

आता हाफकिन कोरोना लस निर्मिती करणार नाही - मंत्री राठोड यांची माहिती

मुंबई - हाफकिन औषध निर्मिती संस्थेला कोरोना लस तयार करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली होती. मात्र आता हाफकीन मार्फत कोरोना लस निर्मिती केली जाणार नाही अशी माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. त्याऐवजी हाफकिनला अन्य रोगांवरील लस निर्मिती करण्यास सांगितले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

14:56 January 25

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर गोंधळ केल्याप्रकरणी 4 विद्यार्थी ताब्यात

नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर बीबीसी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगवरून गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली.

14:16 January 25

हत्येचा बदला घेण्यासाठीच घडवून आणले हत्याकांड-तीन भावांसह बहिणीला अटक

यवतमधील सात जणांच्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी तीन भाव आणि एका बहिणीला अटक केली आहे. सकृतदर्शनी हत्या ही अंधश्रद्धेतून झाली नसल्याचे दिसत नसल्याचे पोलीस अधिकारी अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

14:15 January 25

पुण्यातील दोन विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखामध्ये बदल

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुकीच्या जागांसाठी मतदानाची तारीख सुधारित 26 फेब्रुवारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत मतदानाच्या तारखांमध्ये बदलली आहे. दहावीच्या व बारावीच्या परीक्षेमुळे हा बदल करण्यात आला आहे.

14:03 January 25

उल्का सदृश्य वस्तू छत फोडून घरात कोसळली!

अहमदनगर जिल्ह्यातील भोजडे गावात किरण ठाकरे यांच्या घरात उलका सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर उल्का सदृश्य वस्तू ठाकरेंच्या घराचे छत फोडून घरात येऊन पडल्याने ठाकरे कुटुंबात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.

13:43 January 25

वर्ध्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, नौदल उपप्रमुखाकडून सन्मानित


वर्धा जिल्ह्यातील तळेगांव श्यामजी पंत हे गाव मुबंई ते नागपूर या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर वसलेले आहे. या गावात कर्नल डॉ राजेश अढाऊ यांचे कुटूंबीय राहतात. पण देशसेवेचा विडा उचललेले राजेश अढाऊ यांनी स्वतःला देशासाठी समर्पित केले आहे. नौदल उपप्रमुखाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांची आई भाऊ व परिवार राहत असून आज त्यांच्या गावात आनंदोस्तव साजरा करण्यात आला आहे.

13:40 January 25

दिलीप वळसे पाटील, संजय पांडे, विश्वास नांगरे पाटील वळसे पाटील यांची नार्को टेस्ट करा-सदावर्ते यांची मागणी

दिलीप वळसे पाटील, संजय पांडे, विश्वास नांगरे पाटील वळसे पाटील यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी वरिष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

13:26 January 25

पठाणमुळे मराठी चित्रपटांचे शो रद्द, मनसेच्या चित्रपट सेनेचा खळखट्याकचा इशारा

अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेकडून देखील या चित्रपटाला विरोध करण्यात आला आहे.

13:10 January 25

100 कोटी कथित वसुली प्रकरणात संजीव पालांडे यांना जामीन मंजूर

100 कोटी कथित वसुली प्रकरणात संजीव पालांडे यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. संजीव पालांडे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी आहेत. या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. अनिल देशमुख यांना देण्यात आलेल्या अटी व शर्ती पालांडे यांना देखील कायम ठेवण्यात आल्या आहेत.

13:09 January 25

नालासोपाऱ्यात एलईडी लाईट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

नालासोपाऱ्यात एलईडी लाईट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. वसई विरार पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

13:06 January 25

डीएमके-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला कमल हासन यांचा पाठिंबा

इरोड पूर्व पोटनिवडणुकीत डीएमके-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार ईव्हीकेस एलांगोवनला पाठिंबा देणार असल्याचे मक्कल नीधी मैयम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी सांगितले.

13:06 January 25

11,000 हून अधिक लष्करी जवानांना मानद पदे प्रदान

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी 11,000 हून अधिक लष्करी जवानांना मानद पदे प्रदान करण्यात आली. दरवर्षी, सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सैन्यातील त्यांच्या विशिष्ट सेवेची दखल घेऊन मानद पदे दिली जातात.

13:04 January 25

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशं यांच्या विमानाचे एमर्जन्सी लँडिंग

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे आज सकाळी इरोडमधील सत्यमंगलम येथे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हवामान स्वच्छ झाल्यानंतर हेलिकॉप्टरने 50 मिनिटांनी उड्डाण केले.

12:42 January 25

बीबीसीचा माहितीपट आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर कसा परिणाम करू शकतो? शशी थरुर

बीबीसीचा माहितीपट आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर कसा परिणाम करू शकतो? बंदी ही केंद्राची अनावश्यक आहे. आम्ही एक मजबूत देश आहोत, आम्ही याकडे दुर्लक्ष करू शकलो असतो. आमची सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा ही माहितीपटामुळे सहज प्रभावित होणारी गोष्ट नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी सांगितले.

12:30 January 25

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी शरद पवारांची घेतली भेट

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेटीचे कारण अद्याप समोर आले नाही.

12:03 January 25

जेएनयूच्या विद्यार्थ्याकडून कार्यकर्त्याला मारण्याचा प्रयत्न झाला-अभाविप

जेएनयू प्राधिकरणाने बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवू नका, असा कडक इशारा दिला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने अभाविपच्या कार्यकर्त्याला मारण्याचा प्रयत्न केला. डीयू आणि जामिया विद्यापीठातील विद्यार्थी डॉक्युमेंट्रीला हजेरी लावण्यासाठी आले होते. मला आशा आहे की दिल्ली पोलीस गैरकृत्य करणाऱ्यांची ओळख पटवून योग्य कारवाई करतील, असे अभाविपच्या कार्यकर्त्याने म्हटले आहे.

11:20 January 25

अर्थसंकल्पापूर्वी उद्या होणार हलवा समारंभ

उद्या केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांच्या लॉक-इन प्रक्रियेपूर्वी परंपरेप्रमाणे हलवा समारंभ केला जाईल. हा समारंभ केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. अर्थमंत्री कढईत हलवा ढवळून समारंभाची सुरुवात करतात आणि त्यानंतर दिल्लीतील मंत्रालयाच्या मुख्यालयात त्यांच्या सहकाऱ्यांना देतात.

10:00 January 25

अनिल के अँटोनी यांनी सोडला काँग्रेस पक्ष

काँग्रेस नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल के अँटोनी यांनी काँग्रेस पक्ष सोडला.

09:33 January 25

चार्टड फ्लाईटने जाण्यात गैर काय-दीपक केसरकर

चार्टड फ्लाईटने जाण्यात काय गैर, असा सवाल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्होसच्या प्रवासावर प्रश्न उपस्थित केले होते. शिंदे ७६ तासामधील केवळ चार तास झोपल्याचाही त्यांनी दावा केला.

09:32 January 25

संसदेसमोर स्वत:ला पेटवून घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

नेपाळच्या संसदेसमोर स्वत:ला पेटवून घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

08:29 January 25

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूरच्या जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अखिल उर्फ अक्की महादेव भोंगे आणि पवन विठ्ठल भासकवरे असे आरोपींचे नाव असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे

08:27 January 25

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना जामिन मंजूर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 2016 च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात 1 लाख रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला, अधिवक्ता मोहन टेकवडे यांनी दिली आहे.

06:54 January 25

सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबई डीआरआयने केले २१ कोटी रुपयांचे सोने जप्त

डीआरआय मुंबईने सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने जप्त केले. 20 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. दुकानातील सोने वितळवणाऱ्या दुकानाच्या प्रभारीलाही अटक करण्यात आली. हे सोने परदेशातून मुंबईत वेगवेगळ्या हवाला ऑपरेटर्समार्फत आणण्यात आल्याचे डीआरआयने म्हटले आहे.

06:54 January 25

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच तृतीयपंथीय सहभागी होणार

छत्तीसगड प्रथमच बस्तरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बस्तर सेनानींमधील तृतीयपंथीय देखील सहभागी होणार आहेत. यामुळे प्रदेशात सकारात्मक संदेश जाईल, असे आयजीपी बस्तर पी सुंदरराज यांनी सांगितले.

06:53 January 25

जाहिरातींच्या बाजारपेठेतील वर्चस्वाविरोधात गुगलवर खटला

यूएस जस्टिस डिपार्टमेंटने ऑनलाइन जाहिरातींच्या बाजारपेठेतील वर्चस्वाविरोधात गुगलवर खटला दाखल केला. त्यामुळे नवीन कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.

06:53 January 25

लखनौमध्ये इमारत कोसळली

लखनौमध्ये इमारत कोसळली आहे. लखनौमधील वजीर हसनगंज रोडवर एक निवासी इमारत कोसळल्यानंतर आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

06:53 January 25

वॉशिंग्टनमधील स्टोअरमधील चौफेर गोळीबारात 3 ठार

वॉशिंग्टनमधील स्टोअरमधील चौफेर गोळीबारात ३ ठार झाले आहेत.

06:19 January 25

Breaking News : ऑस्ट्रेलियन ओपन : नोव्हाक जोकोविचने आंद्रे रुबलेव्हला पराभूत करून गाठली उपांत्य फेरी

मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्यावर तयार केलेल्या बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रिनिंगदरम्यान दगडफेक झाल्याचा दावा जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी दिल्लीतील वसंत कुंज येथील पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले. त्यामुळे पंतप्रधानांची बीबीसी डॉक्युमेंटरीचा वाद चांगलाच पेटला आहे.

Last Updated : Jan 25, 2023, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details