महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : शरद पवार यांच्या डोळ्यावर उद्या शस्त्रक्रिया

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jan 9, 2023, 6:57 AM IST

Updated : Jan 9, 2023, 6:57 PM IST

18:55 January 09

अमूल फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी जयेन मेहता

अहमदाबाद - आरएस सोधी हे यापुढे अमूल फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत राहणार नाहीत. जयेन मेहता यांच्याकडे अमूल फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा तात्काळ कार्यभार सोपवण्यात आला आहे.

18:50 January 09

शरद पवार यांच्या डोळ्यावर उद्या शस्त्रक्रिया

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोळ्याचे मंगळवारी ऑपरेशन होणार असल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली. सोमवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांचे काका या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, कारण त्यांना स्वतःला रुग्णालयात दाखल करावे लागले.

18:00 January 09

अविघ्न टॉवर इमारतीची लिफ्ट कोसळून 2 जणांचा मृत्यू

मुंबई - वरळी येथील अविघ्न टॉवर या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात हे दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

17:49 January 09

Breaking News : सिझान खानच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख, 11 जानेवारीला जामीन अर्जावर होणार पुढील सुनावणी

मुंबई : सिझान खानच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख, 11 जानेवारीला जामीन अर्जावर होणार पुढील सुनावणी

17:05 January 09

अविघ्न टॉवर या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली

मुंबई - वरळी येथील अविघ्न टॉवर या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली आहे. या अपघातात २ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

16:05 January 09

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयितांवर आरोप निश्चिती

कोल्हापूर- काॅम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित सर्व आरोपी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. जिल्हा न्यायाधीश एस एस तांबे यांचासमोर सर्व आरोपींना हजर करण्यात आले. सर्व संशयीत आरोपींकडून न्यायालयात हत्या न केल्याचे सांगितले गेले. यामुळे सर्व संशयित आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आला. हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार आहे.

15:37 January 09

इक्बाल चहल यांच्यानंतर सुरेश काकाणींनाही हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

मुंबई - इक्बाल चहल यांच्यानंतर सुरेश काकाणींनाही हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. कोरोना लसीकरण सक्तीचे करत लोकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ता अंबर कोईरी यांनी केला आहे. त्यानंतर मुलुंड दंडाधिकार्‍यांनी सुरू केलेल्या फौजदारी कार्यवाहीला चार आठवड्यांची स्थगिती देण्यात आली. काकाणी आणि चहल यांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी होणार आहे. प्रतिवादींना नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

15:20 January 09

अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा कायम

मुंबई - उद्योगपती अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाने आजही अंतरिम दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने अनिल अंबानींविरोधात 20 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे प्राप्तिकर विभागाला निर्देश दिले. मात्र याचिकेत थेट कायद्यालाच आव्हान दिलेले असल्याने पुढील सुनावणीस देशाच्या ॲटर्नी जनरल यांना हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. स्विस बँकेतील दोन खात्यात 814 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ठेवत 420 कोटींची कर चुकवेगिरी केल्याचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने अनिल अंबानींना ऑगस्ट 2022 मध्ये बजावलेल्या नोटीशाला आव्हान दिले आहे. मात्र साल 2015 मध्ये तयार झालेल्या कायद्यानुसार साल 2006-07 आणि 2010-11 मधील व्यवहाराचे तपशील कसे मागितले जाऊ शकतात, असा सवाल अंबानींच्या वकिलांनी केला आहे.

15:15 January 09

दाऊद इब्राहिम टोळीला मदत केल्याप्रकरणात 3 आरोपींना 10 वर्षाची शिक्षा

मुंबई - दाऊद इब्राहिम टोळीला कराचीमध्ये गुटखा कारखाना सुरू करण्यासाठी मदत केल्याप्रकरणात तीन आरोपींना दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुटखा व्यवसायिक जे एम जोशी, जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख मन्सुरी यांना शिक्षा देण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका न्यायाधीश बी डी शेळके यांनी याबाबतचा निर्णय दिला.

14:45 January 09

रियालिटी शोच्या ऑडिशनसाठी बोलवून नृत्य स्पर्धकांची फसवणूक

ठाणे - एका रियालिटी शो च्या ऑडिशनसाठी देशभरातून अनेक नृत्य स्पर्धक ठाण्यात दाखल झाले. मात्र या स्पर्धकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय चॅनेलसाठी ऑडिशन होणार असे खोटे सांगून ५ ते ६ हजार स्पर्धकांकडून पैसे घेण्यात आले. देशभरातून स्पर्धक ठाण्यात ऑडिशनसाठी आल्यानंतर हे सर्व थोतांड असल्याचे लक्षात आले. मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी गोंधळ घातला. आता मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष यांनी मध्यस्ती करुन सर्व सपर्धकांना पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले आहे. घटनास्थळी नौपाडा पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत.

14:33 January 09

पंजाबमधील सोनू खत्री गॅंगचे तीन शूटर कल्याण परिसरातून अटक

ठाणे - पंजाबमधील सोनू खत्री गॅंगचे तीन शूटर कल्याण परिसरातून अटक केले आहेत. शुभम सिंग, गुरमुख नरेशकुमार सिंग, अमनदिपकुमार गुरमिलचंद उर्फ रॅचो अशी या सोनू खत्री गँगच्या शूटरची नावे आहेत. पंजाबमधील एका हत्या प्रकरणात हे आरोपी फरार असून सहा महिन्यांपासून अंबिवलीत लपून बसल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.

14:19 January 09

विधानपरिषदेसाठी शिंदे-फडणवीस समन्वयाने उमेदवार देणार - बावनकुळे

मुंबई - विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे-फडणवीस यांच्या समन्वयाने उमेदवार घोषित करत आहोत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. कोकणसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. मराठवाडा पदवीधर किरण पाटील, पश्चिम विदर्भात रंजीत पाटील, पूर्व विदर्भात लवकरच उमेदवार घोषित करू तसेच नाशिक संदर्भातसुद्धा १ ते २ दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

14:16 January 09

ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची 5 पिल्ले आढळली

अहमदनगर - जिल्ह्यातील हनुमंतगाव शिवारात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची 5 पिल्ले आढळून आली. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील कृष्णाजी जेजुरकर यांच्या शेतात उसाची तोड चालू आहे. पहाटे मजूर ऊस तोडत होते. त्यावेळी त्यांना पिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी उसाचे पाचट पेटवून आवाज येणाऱ्या प्राण्यांचा वेध घेतला. तेव्हा त्यांना 5 बिबट्याची छोटी पिले आढळून आली. बिबट्याची पिले पाहून मजुरांची पाचावर धारण बसली. त्यांनी मालकाला फोन केल्यानंतर सोमनाथ जेजुरकर त्या ठिकाणी आले.

13:46 January 09

संशयावरून पतीने पत्नीचा आणि अडीच वर्षीय चिमुकल्याचा केला खून

औरंगाबाद - संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीचा आणि अडीच वर्षीय चिमुकल्याचा खून केला आहे. औरंगाबाद शहरातील कांचनवाडी परिसरातील ही घटना आहे. खून केल्यानंतर 112 नंबरवर स्वतः पोलिसांना आरोपीने माहिती दिली. समीर विष्णू मस्के असे आरोपीचे नाव आहे, सातारा पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी ही माहिती दिली.

12:42 January 09

धुक्यामुळे आज एकूण 267 रेल्वे गाड्या रद्द

नवी दिल्ली - धुके आणि इतर परिस्थितीमुळे आज एकूण 267 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 170 गाड्या उशिराने धावत होत्या. तसेच 170 गाड्यांपैकी 91 ट्रेन खराब हवामानामुळे उशिराने धावत होत्या. रेल्वेने ही माहिती दिली आहे.

12:06 January 09

राहुल गांधींविरोधातील मानहानीचा खटला 4 फेब्रुवारीला पुढील सुनावणी

ठाणे - भिवंडी शहर न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी 4 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. हे प्रकरण शनिवारी न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एल सी वाडीकर यांच्यासमोर सुनावणीसाठी आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यकर्ते गांधी आणि तक्रारदार राजेश कुंटे यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी ठेवली.

11:45 January 09

ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे यांचे निधन

मराठी दूरचित्रवाणी पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे यांचे निधन झाले आहे. त्यांनी मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची पायाभरणी केली. दूरदर्शनसह विविध चॅनेलमध्ये त्यांनी काम केले. ईटीव्ही मराठीचे सुरुवातीच्या काळात ते वृत्त समन्वयक होते.

11:23 January 09

गडचिरोली येथील खाण प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा, प्रशासनाचा दावा

नक्षलग्रस्त सुरजागड, गडचिरोली येथील खाण प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. या प्रकल्पावर वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या सुमारे 1600 तरुणांनी एका वर्षात मोटारसायकल खरेदी केल्या.

उमरगुंडा गावातील रहिवासी, उमरगुंडा गावातील रहिवासी, जे प्रकल्पात सुरक्षा म्हणून काम करतात, म्हणतात, पूर्वी, मी शेती करत होतो. एकदा कंपनी येथे सुरू झाल्यावर मला नोकरी मिळाली आणि मला अधिक कमाई होऊ लागली. आता अधिक समृद्धी आहे. काही लोकांकडे आहेत. वाहने खरेदी केली आहेत आणि काही खरेदी करणार आहेत. या प्रकल्पात अनेक स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. सुमारे 1600 लोकांनी बाइक खरेदी केल्या. कंपनीने प्रशिक्षण अकादमी स्थापन केली आहे. तिथे ते विविध प्रकारचे प्रशिक्षण देत असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी एस गुप्ता यांनी सांगितले.

11:20 January 09

ऑडी चालवणाऱ्यांना पत्ता विचारता का, असे म्हणत वकिलाला बेदम मारहाण

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असून एकीकडे कोयता गँगची दहशत तर दुसरीकडे शहरात विविध गुन्हे वाढत आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर ऑडी चालवणाऱ्याला एका वकिलाने पत्ता विचारल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली आहे. प्रकरणी विशाल शंकर सोनवणे (४२) यांनी डेक्कन पोलिसात तक्रार दिली आहे

10:13 January 09

सेल्फी हॉस्पिटलमध्ये बनावट इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू

चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. रक्तातील तांबड्या पेशी कमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याने एफडीएच्या तक्रारीनंतर व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैफी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचे एफडीएच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून व्ही पी रोड पोलिसांनी मुंबईतील सैफी रुग्णालयातील मेडिकलसह ठाणे पुणे औरंगाबाद तसेच दिल्लीतील अकरा फार्मा सेंटर पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

09:39 January 09

पत्नीच्या चारित्र्याबद्द्ल बोलल्याने साथीदाराचा गोळ्या झाडून खून

नागपूर :हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरात गोळ्या झाडून एकाची हत्या झाली आहे. रात्री ११ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अविनाश अशोक घुमडे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे आरोपीचे नाव आहे. मृत आणि आरोपी दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे. तसेच सोबत राहायचे. आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्य बद्द्ल बोलल्याने झालेल्या वादातून आरोपीने तीन ते चार साथीदारांच्या मदतीने अविनाश अशोक घुमडेवर दोन गोळ्या झाडून हत्या केली. घटेनची माहीती समजताचं हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आणि तपास सुरू केला आहे.

09:32 January 09

बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता

महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 10-12° पर्यंत किमान तापमान. एक अंकि काही ठिकाणी. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

08:46 January 09

भारतातील प्रख्यात लॅप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर टेहेमटन उडवडिया यांचे निधन


पद्मभूषण डॉक्टर उडवाडी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. पचन संस्थेमधील अत्यंत निष्णात वैद्यक आणि सर्जन म्हणून त्यांची खाती होती. ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात होतं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टर उडवाडी गॅस्ट्रो इंडस्टाईल म्हणजे पचनसंस्थेच्या संदर्भात भारतात प्रख्यात मोजक्या डॉक्टरांमधले एक होते. त्यांच्या जाण्यामुळे वैद्य क्षेत्रामध्ये तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलेले आहे.

07:37 January 09

धुक्याने अनेक राज्ये व्यापली

उपग्रह प्रतिमेनुसार आणि उपलब्ध दृश्यमानता धुक्याचा थर पंजाब आणि लगतच्या वायव्य राजस्थानपासून बिहारपर्यंत हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत विस्तारला आहे. ही माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

07:31 January 09

हरियाणात काँग्रेसच सरकार स्थापन करेल-राहुल गांधी

हरियाणात काँग्रेसच सरकार स्थापन करेल यात शंका नाही नसल्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

07:31 January 09

दोन बसची धडक होऊन किमान 40 प्रवाशांचा मृत्यू

मध्य सेनेगलमधील कॅफ्रीन शहराजवळ काल दोन बसची धडक होऊन किमान 40 लोक मरण पावले आणि 85 जखमी झाले.

07:30 January 09

विमानतळावर चॉकलेट पावडरमध्ये मिसळलेले 211 ग्रॅम सोने जप्त

तिरुचिरापल्ली विमानतळावर चॉकलेट पावडरमध्ये मिसळलेले 211 ग्रॅम सोने जप्त केले आहे. त्रिची विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी नेस्ले नेस्क्विक चॉकलेट पावडरमधून काढलेले 211 ग्रॅम वजनाचे सोने आणि दुबईहून आलेल्या एका पुरुष प्रवाशाकडून 175 ग्रॅम (एकूण 386 ग्रॅम वजनाच्या) 3 सोन्याच्या साखळ्या जप्त केल्या आहेत.

07:01 January 09

भारत जोडो यात्रेत आज महिलांचा असणार सहभाग

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सोमवारी महिला राहुल गांधींसोबत फिरताना दिसतील, असे पक्षाचे खासदार जोथिमनी यांनी ट्विटरवर सांगितले. भारत जोडो यात्रेत सर्व महिलांची वाटचाल आहे. सर्वात रोमांचक दिवसांपैकी एक आहे. महिला सक्षमीकरणासाठी खूप उत्कट आणि वचनबद्ध आहेत, पुढे पाहत आहोत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

06:37 January 09

Breaking News : कोव्होव्हॅक्स लसीला येत्या 10 ते 15 दिवसांत बूस्टर म्हणून मान्यता मिळेल-आदर पुनावाला

पुणे :सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी रविवारी सांगितले की त्यांच्या कोव्होव्हॅक्स लसीला येत्या 10 ते 15 दिवसांत बूस्टर म्हणून मान्यता मिळेल. ही लस कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरियंटवर चांगले काम करते.

Last Updated : Jan 9, 2023, 6:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details