यवतमाळ : नववर्षाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खुनाची मालिका सुरू आहे. अशातच सोमवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास कळम शहरातील इंदिरा चौकात युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे कळम शहरात रात्रीपासूनच तणाव निर्माण झाला. आज 17 जानेवारीला मंगळवारी शहरातील नागरिकानी कळंब बंदची हाक देत रस्त्यावर आले. यावेळी संतप्त नागरिकांनी नागपूर मार्गावर चार तास चक्काजाम करून ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी केली. यावेळी संपूर्ण शहराला छावणीचे स्वरूप आले होते.
Breaking News :युवकाच्या हत्याकांडानंतर कळंब येथे तणाव. चक्काजाम केल्याने वाहतूक ठप्प - ईटीव्ही भारत ब्रेकिंग न्यूज
22:06 January 17
युवकाच्या हत्याकांडानंतर कळंब येथे तणाव. चक्काजाम केल्याने वाहतूक ठप्प
21:28 January 17
दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना मुंबई विमानतळावर अटक; 8 किलो सोने पेस्ट स्वरूपात आणले
मुंबई - दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना आज मुंबई विमानतळावर 4.54 कोटी रुपये किमतीचे सुमारे 8 किलो वजनाचे सोने पेस्ट स्वरूपात आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तपास चालू आहे: डीआरआय (महसूल संचालनालय
19:39 January 17
पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मुंबईतील विविध उपक्रमांचे उद्घाटन
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत. तसेच 20 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना'चे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
18:47 January 17
किसन वीर कारखान्यातील दुर्घटनेत ५ कामगार जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
सातारा -भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटनेत ५ कामगार जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर साताऱ्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उच्च दाबामुळे वाढल्याने बाहेर पडलेल्या वाफेने कामगार भाजल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
18:24 January 17
शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरची लातुरात आत्महत्या
लातूर : 'एमबीबीएस'च्या प्रथम वर्षात शिकणा-या लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरात घडली. साक्षी राजेंद्र गायकवाड (वय 21 वर्षे )असे मृत मुलीचे नाव आहे.
18:15 January 17
पंतप्रधान मोदी करणार मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 चे उद्घाटन
मुंबई- मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 चे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून या मेट्रो लाईन्स बांधलेल्या आहेत. ही 18.6 किमी लांबीची मेट्रो लाईन 2A दहिसर ई आणि डीएन नगर जोडते. तसेच 16.5 किमी लांबीची मेट्रो लाईन 7 अंधेरी पूर्व आणि दहिसर ई जोडते.
17:41 January 17
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातासंदर्भातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातासंदर्भातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळले
अनाहिता पंडोले यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक दंड आकारत याचिका फेटाळली
याचिकाकर्त्यांचा कोणताही संबंध नसताना अश्याप्रकारे याचिका दाखल करणे चुकीचं - उच्च न्यायालय
याचिकेत कोणतंही तथ्य नाही, केवळ प्रसिद्धी करिता याचिका दाखल केल्याचं स्पष्ट - उच्च न्यायालय
पालघरचे स्थानिक रहिवासी संदेश जेधे यांनी दाखल केलेली याचिका सुनावणीस योग्य नाही - मुंबई उच्च न्यायालय
17:07 January 17
छोटा राजनचे बॅनर लावणाऱ्यांवर मुंबईत खंडणीचा गुन्हा दाखल; 5 जणांना अटक
मुंबई - डॉन छोटा राजनचा वाढदिवस मुंबईत साजरा करण्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. तपासानंतर पोलिसांनी छोटा राजन टोळीशी संबंधित या लोकांवर खंडणीचा गुन्हाही दाखल केला आहे. ज्यामध्ये 1 महिलेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
17:02 January 17
कोयत्याने मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक
पुणे : शिवाजीनगर मधील मध्यरात्री कोयत्याने धुमाकूळ घालणाऱ्या चार आरोपींना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मे ताब्यात घेतलेला आहे. या चार आरोपी पैकी एक आरोपी अल्पवयीन आहे त्याला बाल सुधार घरामध्ये पाठवण्यात आलेला आहे तर तीन आरोपींना कोर्टाकडून पोलीस रिमांड देण्यात आलेली आहे.
17:02 January 17
वर्ध्यात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक
वर्ध्यात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मनसे मैदानात उतरली असून विद्यार्थ्यांना परीक्षा एक दिवसांवर येऊन ठेपली तरी हॉल तिकीट न मिळाल्याने काल रात्रीसुद्धा विद्यार्थ्यांनी टाहो फोडला होता,
15:59 January 17
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवला
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिली.
15:56 January 17
काँग्रेस नेते आशीष देशमुखांचे काँग्रेस अध्यक्षांना पत्र, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची केली मागणी
नागपूर - महाराष्ट्रातील कॉंग्रेसची परिस्थिती चिंताजनक आहे,त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज असल्याची मागणी करणार पत्र काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले आहे,त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
15:40 January 17
मुंबई मनपासाठी ठाकरे सकारात्मक; अजित पवारांची माहिती
मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढण्यावर सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे देखील हिरवा कंदील दिला आहे. परंतु, युती - आघाडीचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. येत्या निवडणुकीपूर्वी त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे पवार म्हणाले.
14:42 January 17
आरोप करणाऱ्या महिलेविरोधात खा. शेवाळेंची उच्च न्यायालयात धाव
मुंबई -शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सातत्याने आरोप करणाऱ्या महिलेविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत ट्विटर, इंडिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांनाही त्यांनी प्रतिवादी केले आहे. बदनामी करून राजकीय करिअर संपवण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
14:04 January 17
वरुण गांधींचा काँग्रेस प्रवेश अधांतरीच, राहुल गांधींनी केले मोठे वक्तव्य
नवी दिल्ली - वरुण गांधी सध्या भाजपमध्ये आहेत, ते भारत जोडो यात्रेत चालले तर त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते, असे मत राहुल गांधी यांनी मांडले आहे. माझी विचारधारा त्यांच्या विचारसरणीशी जुळत नाही. मी RSS कार्यालयात जाऊ शकत नाही, त्याआधी माझा शिरच्छेद करावा लागेल, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरुणने मात्र दुसरी विचारधारा पत्करली आहे. मी ती विचारधारा स्वीकारू शकत नाही, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
13:50 January 17
जोशीमठमध्ये मदतीसाठी सैन्यदल दल
विशेष मोहिमांसाठी तसेच जोशीमठमध्ये मदतीसाठी सज्ज असल्याचे उत्तराखंडमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी म्हटले आहे.
13:48 January 17
मिठी मारायला आलेल्या व्यक्तीला सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तपासले होते- राहुल गांधी
मला मिठी मारायला आलेली एक व्यक्ती मला दिसली, मला कळत नाही की तुम्ही याला सुरक्षेतील त्रुटी का म्हणत आहात? या यात्रेत खूप उत्साह असतो आणि होतो. सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तपासले आणि तो फक्त उत्साहित झाला, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी होशियारपूरमध्ये म्हटले आहे.
12:50 January 17
बंदोबस्तावरील महिला पोलीस हवालदाराचा अचानक चक्कर येऊन मृत्यू
मुंबई - पोलीस बंदोबस्तावर असताना कांचन भिसे या महिला पोलीस हवालदाराला अचानक चक्कर आली. त्या त्याच ठिकाणी कोसळल्या आणि त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
12:27 January 17
उर्फी जावेदला संरक्षण द्यावे, महिला आयोगाचे पोलिसांना आदेश
मुंबई -उर्फी जावेदला संरक्षण द्यावे तसेच याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्तांना दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरणाऱ्या उर्फी जावेद हिच्या विरोधात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अनेक आरोप केले आहेत. उर्फी जावेदने याबाबत राज्य महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तिने पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
12:08 January 17
दाऊदने केला पाकिस्तानी महिलेशी विवाह, हसिना पारकरच्या मुलाची माहिती
मुंबई - दाऊदची बहिण हसिना पारकरचा मुलगा आणि दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकर याने राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर खळबळजनक दावा केला आहे. दाऊदने पाकिस्तानी पठाण महिलेशी पुनर्विवाह केला असल्याचे त्याने सांगितले आहे.
11:57 January 17
नारायण राणे यांची 2005 मध्ये सभा उधळून लावल्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची 2005 मध्ये सभा उधळून लावल्या प्रकरणी आज सर्व आरोपी सुनावणीसाठी कोर्टात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब करण्यात आली. मात्र विशेष सत्र न्यायायधीश राहुल रोकडे यांनी पुढील सुनावणीच्यावेळी सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याची ताकीद दिली आहे. पुढच्या तारखेला उपस्थित न राहणाऱ्या आरोपींविरोधात वारंट जारी केला जाऊ शकतो. या प्रकरणी पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
11:36 January 17
भारत जोडो यात्रेत एका व्यक्तीचा काँग्रेस खासदार राहुल गांधींना मिठी मारण्याचा प्रयत्न
होशियारपूरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान एका व्यक्तीने काँग्रेस खासदार राहुल गांधींना मिठी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला खेचले.
10:31 January 17
उर्फी जावेदला सुरक्षा पुरवा, महिला आयोगाचे पोलीस आयुक्तांना पत्र
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून जीवाला धोका असल्याने सुरक्षा मेळावा अशी मागणी अभिनेत्री उर्फी जावेदने केली आहे. उर्फी जावेदला सुरक्षा पुरवा, असे पत्र महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना पाठविले आहे.
09:00 January 17
काँग्रेस नेते सत्यजीत तांबे भाजपच्या वाटेवर? सोशल मीडियातील प्रोफाईलमधून हटविले काँग्रेस
काँग्रेस नेते सत्यजीत तांबे हे पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवारीने चर्चेत आले आहेत. अशातच त्यांनी ट्विटर प्रोफाईलमधून काँग्रेसचे नाव काढले आहे. वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावच लागते, असे प्रोफाईल कव्हर ठेवले आहे. त्यामुळे तांबे हे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
08:41 January 17
काँग्रेस पक्षाची पंजाबमधून भारत जोडो यात्रा सुरू
पंजाबमधील होशियारपूरमध्ये काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे.
08:14 January 17
कर्नाटककडून खासदार धैर्यशील यांना कर्नाटकसह बेळगावमध्ये प्रवेश करण्यास बंदी
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक सीमा आणि बेळगावमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. एमईएस कामगार मंगळवारी (आज) शहरात हुतात्मा दिन साजरा करणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष खासदार माने उपस्थित राहणार आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आदेश जारी करून महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने यांच्या जिल्ह्यात प्रवेशावर बंदी घातली आहे.
07:46 January 17
भाजप नेते किरीट सोमैय्या यांचा बीएमसीमधील कथित घोटाळ्यासंदर्भात आणखी नवा दावा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत यांचे कथित भागीदार सुजीत पाटकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसची भागीदारी फर्मची स्थापना व नोंदणी कधीच झालेली नाही, असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.
07:42 January 17
येस बँक-डीएचएफएल प्रकरण: आरोपी अविनाश भोसलेच्या प्रकृतीची एम्सने करावी तपासणी, सीबीआयची मागणी
मुंबई - येस बँकेतील आरोपी अविनाश भोसले या बिल्डरची प्रकृती एम्सच्या बोर्डाने तपासावी, अशी मागणी सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात केली आहे.
07:33 January 17
बोगस इंग्रजी शाळा चालवणाऱ्या 13 मालक आणि प्रशासकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा, जिल्हा परिषदेचा आदेश
पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीबीएसई भारतीय प्रमाणपत्र मंजूर नसतानाही चालणाऱ्या पुणे जिल्ह्यातील १३ खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मालक आणि प्रशासकांविरुद्ध फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.
07:24 January 17
दाव्होसमधून महाराष्ट्रात ४५९०० कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांची माहिती
स्वित्झर्लंड येथील दाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे. गुंतवणुकीतून १० हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचे उद्योग मंत्र्यांनी म्हटले आहे.
07:17 January 17
रस्त्याच्या दुरव्यवस्थेबद्दल मंत्र्यांनी मागितली माफी, नागरिकाचे धुतले पाय
ग्वाल्हेरमधील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल मंत्र्याने माफी मागितल्याने मध्य प्रदेशातील मिन प्रद्युमन सिंह यांनी एका व्यक्तीचे पाय धुतले. रस्त्याच्या वाईट स्थितीबद्दल मी लोकांची माफी मागितली आणि गटार लाइनच्या कामासाठी खोदलेला रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले, असे मंत्री म्हणाले.
07:15 January 17
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ऑनलाइन ट्रोलर्सना दिला इशारा
सुधारा नाहीतर तुरुंगात जाण्यास तयार राहा, असा इशारा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ऑनलाइन ट्रोलर्सना इशारा दिला आहे.
07:14 January 17
धुक्यामुळे उत्तर रेल्वे क्षेत्रात १५ गाड्यांना उशीर
उत्तर भारतामध्ये थंडीमुळे वाहतूक सेवा विस्कळित होत आहे. धुक्यामुळे उत्तर रेल्वे क्षेत्रात १५ गाड्या उशिराने धावत आहेत: भारतीय रेल्वे
07:12 January 17
पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचे पुन्हा एकदा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत नाव
पाकचा अब्दुल रहमान मक्की संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिबंध समितीच्या अंतर्गत जागतिक दहशतवादी म्हणून सूचीबद्ध आहे. अल-कायदा प्रतिबंध समितीने पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून यादीत टाकले आहे.
06:40 January 17
Breaking News : परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका
मुंबई :पुण्यातील 'जी-२०' बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-२० प्रतिनिधींसाठीं सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली.