महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

SSC Result 2023 : प्रतिक्षा संपली! 'या' तारखेला लागणार दहावीचा निकाल; अशा प्रकारे करा चेक - SSC Result 2023

बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतिक्षा असते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत लवकरच या निकालाची तारीख जाहीर केली जाणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा निकाल लागण्याची शक्यता आहे.

ssc 10th Result 2023:
दहावीचा निकाल

By

Published : May 29, 2023, 1:54 PM IST

Updated : May 30, 2023, 5:24 PM IST

मुंबई :महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अ‍ॅण्ड हायर सेकेंडरी एज्युकेशन (MSBSHSE)लवकरच सीनिअर सेकेंडरी म्हणजे 10 वीचा निकाल जाहीर करणार आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ओढ लागते. दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा याचा निर्धार अनेकांनी केला असेल. परंतु किती गुण मिळणार पुढील प्रवेशासाठी मार्कलिस्ट कितीची लागणार यासाठी विद्यार्थी त्यांच्या निकालाच्या प्रतिक्षेत असतात. दरम्यान एसएससीच्या निकालाची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे.

कुठे पाहणार निकाल : 12 वीचा निकाल लागून तीन ते चार दिवस झाले आहेत. आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता त्यांच्या निकालाकडे लागले आहे. या निकालासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी संकेतस्थळ mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in वर निकाल पाहू शकणार आहात. या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी निकालासह आपले मार्कशीट मिळवू शकतील. बोर्डाच्या या वेबसाईटशिवाय दहावीचे परीक्षे दिलेले विद्यार्थी एसएमएस आणि डिजीलॉकरवरही आपला निकाल मिळवू शकतात.

वेबसाईटवर कसा पाहणार निकाल :

  • www.mahresult.nic.in
  • http://sscresult.mkcl.org
  • https://ssc.mahresults.org.in
  • https://hscresult.mkcl.org/
  • https://hsc.mahresults.org.in
  • या वेबसाईटवर विद्यार्थी आपला निकाल मिळू शकतील. पण या वेबसाईटवर निकाल कसा पाहता येईल हे जाणून घेऊ. दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या एसएससी निकालाच्या लिंकवर क्लिक करावे.
  • त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती त्या ठिकाणी भरा.
  • त्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर येईल. तो निकाल डाऊनलोड करा.
  • विद्यार्थी मार्कशीट देखील डाऊनलोड करू शकतील.

कधी झाली होती परीक्षा : दहावीच्या बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा एक आठवड्याने उशिरा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे निकालसाठीही उशीर होणार आहे. दरम्यान,यावर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेला सुमारे 32 लाख विद्यार्थी बसले होते.या विद्यार्थ्यांच्या निकालाविषयी मोठी अपडेट हाती आली आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळ दहावीच्या निकालाची तारीख एक ते दोन दिवसात जाहीर करू शकते.

हेही वाचा -

  1. HSC Exam : उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल, बोर्डाने पाठवली नोटीस
  2. CISCE Board Result 2023 : सीआयएससीई 10 वी आणि 12 वीचा आज निकाल, येथे चेक करा तुमचा निकाल
Last Updated : May 30, 2023, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details