मुंबई- भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पेच सुटेल अशी चिन्ह दिसत आहेत. मुंबईत होणाऱ्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाचा पेच सुटण्याची शक्यता - एकनाथ खडसे
भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा हे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीला उपस्थीत राहतील. नड्डा यांच्या उपस्थीतीत भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदाचा पेच सुटेल अशी चिन्ह दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे पारडे जड मानले जात आहे.
यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, वर्षातून दोनदा व गरज असल्यास तिनदा कार्यकारिणीच्या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष सहभागी होत असतात. प्रदेशाध्यक्ष पदाच्या निर्णय केंद्रीय समितीत घेतला जातो. त्यानुसार राज्य कार्यकरिणीतही त्या नावाची चर्चा होते. २१ जुलैच्या बैठकीतही काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते. अशी प्रतिक्रिया दिली.
जे पी नड्डा यांच्या उपस्तिथीत होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत आमदारांच्या प्रगती अहवालावर देखील चर्चा होण्याची दाट शक्यता असून खासदारांप्रमाणे काही विद्यमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरजित सिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा असली तरी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे पारडे जड मानले जात आहे.