मुंबई :या गुन्हयामध्ये पंजाब येथील गँगस्टर सोनू खत्री (Sonu Khatri Gang) याचे साथीदार शिवम अवतारसिंग महालो (वय २२ वर्षे रा. ठि. नवाशहर, पेठ महंत, शहद भगतसिंग नगर, पंजाब, गुरूमुख), नरेशकुमार सिंग उर्फ गोरा (वय २३ वर्षे राठि. उधनेवाला ता. बलाजोर, शहिद भगतसिंग नगर, पंजाब) आणि अमनदिप कुमार गुरमेलचंद उर्फ रॅन्चो (वय २१ वर्षे रा. ठि.खमा चौक ता. बंगाशहर, जि. शहीद भगतसिंग नगर, पंजाब) हे गँगस्टर आरोपी सोनू खत्री यांचे गँगचे सदस्य आहेत. ते गँगस्टर आणि दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा (Terrorist Harvinder Singh) याचे संपर्कातील असून पाहिजे आरोपी हे एन. आर. सी. कॉलनी, आंबिवली, कल्याण जिल्हा ठाणे या परिसरात वास्तव्यास असून या आरोपीतांकडे विदेशी अग्निशस्त्रे असण्याची शक्यता आहे, (Two Terrorist Arrested From Mumbai) अशी माहिती देवून दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची मदत मागितली. (Latest news from Mumbai) त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) तपासाची चक्रे जोरदार फिरवली. (Punjab Anti Gangster Task Force)
संयुक्त कारवाईत आरोपी जेरबंद :प्राप्त माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या निर्देशानुसार वरिल आरोपीतांचा शोध घेण्याबाबत व त्यांच्यावर नियोजनबध्द कारवाई करण्याकरिता पथके तयार केली. पाहिजे आरोपी हे यादवनगर, आंबिवली, कल्याण जि.ठाणे या परिसरात रहात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार, पंजाब पोलीसचे अधिकारी व अंमलदार यानी संयुक्त कारवाई करून या आरोपींना जेरबंद केले. तिन्ही पाहिजे आरोपीविरूध्द पंजाब राज्यात खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, स्फोटक पदार्थ बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत.