नागपूरMaharashtra assembly winter session 2023 Day 3 - हिवाळी अधिवेशासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अधिवेशनात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांवरून मोर्चा काढणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे नेतेही सहभागी होणार आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी विरोधकांची मागणी आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालेली आहेत. जनभावना लक्षात घेता मराठा आरक्षण देण्याची मागणी विरोधकांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
Live Updates-
- सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. पीकविमा योजना एका रुपयात केली आहे. शेतकऱ्यांना मिळणारी मदत ६ हजारावरून १२ हजारावर केली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. दीड वर्षात शेतकऱ्यांना १० ते १२ हजार कोटी दिले आहेत. कांदे निर्यातबंदीबाबत पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यातून सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. इथेनॉल निर्मितीच्या बंदीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमिथ शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. समुद्र किनारी वाहन घेऊन चालविल्यानं माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी माहिती घेऊन बोलावे.
- विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. शेतकरी प्रश्नावर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकारचा धिक्कार, अशा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घोषणा दिल्या आहेत. कांदा निर्यातबंदीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कांद्याच्या माळा घालीत आंदोलनात सहभाग घेतला.
काय आहे राज्यातील परिस्थिती? कांदे निर्यातबंदी लागू केल्यानं राज्यातील शेतकरी संतप्त आहे. गेली दोन दिवस नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प आहेत. एकीकडं शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसताना अवकाळी पावसामुळे मिरची, कापूस, द्राक्ष इत्यादी पिकांचे मोठे नुकसानं झाले. नैसर्गिक आपत्तीमुळं संकटात मदत मिळावी आणि शेतमालाला भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.