महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Assembly Session 2023 : राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा, अर्थसंकल्पावर होणार चर्चा - राज्य विधिमंडळ अधिवेशन

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षाने लावून धरली आहे. आज अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा सुरू होणार आहे.

Maharashtra Assembly Session
राज्य विधिमंडळ

By

Published : Mar 13, 2023, 7:49 AM IST

मुंबई :आजपासून राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होत आहे. गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडल्यानंतर चर्चा सुरू होणार आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे. त्यांना मदत करावी, कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. आज दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे.

अधिवेशनाचा तिसरा आठवडा :अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर आज चर्चा सुरू होणार आहे. यावेळी अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेराव घालणार आहेत. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सर्व भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षाने लावून धरली आहे.

कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान : आजही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पावर चर्चा आजपासून सुरू होणार आहे. यावेळी विरोधक वाढती बेरोजगारी, महागाई, हे मुद्दे मांडतील, तसचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देखील राज्यातली महत्त्वाचा मुद्दा आहे. अवकळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालय. त्यांना मदत करावी, कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.

7 जिल्ह्यांत सभा :राज्यातील नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर कराव्यात अशी मागणी महाविकास आघाडीचे नेत्यांना दिली आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या विरोधात या निवडणुकांमध्ये जनता मतदान करेल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला. शिंदे फडणवीस सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी, महाविकास आघाडीने राज्यातील प्रमुख सात जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या त्यात 7 जिल्ह्यात सभा घेणार असल्याचे महाविकास अघाडीच्या नेत्यांनी सांगितले. 2 एप्रिलला पहिली सभा संभाजी नगर येथे होणार आहे. या सभेची जबाबदारी अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, 16 एप्रिलला दुसरी सभा नागपूरला होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर 1 मे तिसरी सभा होणार आहे. पुण्यात चौथी सभा होईल.

हेही वाचा :Maharashtra Politics: सरकारवर भोपळा आणि खोक्यांचा आसूड; ही तर बिरबलची खिचडी- रवींद्र वायकर यांचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details