मुंबई- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण यावरती सस्पेन्स कायम आहे. काँग्रेस पक्षाकडे सध्या सदस्य संख्या जास्त असल्यामुळे बहुतेक त्यांचाच विरोधी पक्षनेता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने युवा आमदाराला विरोधी पक्षनेता करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
बैठकीला वेळ झाला -अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आला होता. तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून बैठका देखील पार पडल्या होत्या. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक बोलावली होती. मी पोहोचू शकलो नाही, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.
विरोधी पक्षनेता काँग्रेसचा - विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा होईल हे पाहावे लागेल. माझ्यामते काँग्रेसचा नेता होऊ शकतो. माझी सर्व ज्येष्ठ नेत्यांना विनंती आहे की, कोणत्याही पक्षाचा नेता होवो पण एका युवाला संधी दिली पाहिजे. युवा काय काम करू शकतो याची जाणीव सगळ्यांनाच आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती वाईट आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
अजित पवार- शरद पवार भेट- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे सहकारी मंत्र्यांनी भेट घेतली. यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, ते आले, ते भेटले ते बोलले पण त्यानंतर माझ्यासारख्या नव्या व्यक्तीला हा प्रश्न का? असा माझा प्रश्न आहे. शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे जगात कोणालाच सांगता येणार नाही. मात्र, त्यांची भूमिका ही कायमच महाराष्ट्राच्या हिताची असते.
हेही वाचा -
- NCP Political Crisis: राष्ट्रवादीत हाय होल्टेज ड्रामा; अजित पवारांसह आमदार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
- Maharashtra Monsoon Session : नव्या संदर्भात नीलम गोऱ्हेंच्या उपसभापतीपदावर विरोधकांचा आक्षेप, विरोधकांचा सभात्याग
- Monsoon Session 2023: ५० खोके एकदम ओके... अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून विधाधनसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन