महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhaskar Jadhav : 'मी पुन्हा येणार नाही व पुन्हा येईन... पुन्हा येईन... असे म्हटलेसुद्धा नाही' - भास्कर जाधवांचा देवेंद्र फडणवीसांना टोमणा

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. सभागृहात बोलू न दिल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी 'मी पुन्हा येईन...'चा मुद्दा उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 17, 2023, 5:18 PM IST

Updated : Jul 17, 2023, 5:32 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आज गदारोळात संपला. पहिल्या दिवशी विशेष कामकाज नसतानाही शेतकऱ्यांच्या स्थगन प्रस्तावावर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांना सभागृहात बोलू न दिल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. सरकारकडे पूर्ण बहुमत असून त्या बहुमताच्या जोरावर ते आम्हाला बोलू देणार नाहीत, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

सरकार मुजोरपणे वागते - आज सभागृहात विशेष कामकाज नव्हते. आता सरकारकडे बहुमत असून, त्यांच्याकडून सौदाह्यपूर्वक वागणूक मिळेल व ते सामंजस्यपणा दाखवतील अशी अपेक्षा होती. तरी देखील आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थगनद्वारे आपला विषय मांडण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु सरकारने त्यांची काडीमात्र दखल घेतली नाही. सरकार मुजोरपणे वागत असून अशाने शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही. महिलांना न्याय भेटणार नाही. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जाणार नाहीत. आमच्याकडे पूर्ण बहुमत असून त्यावरच हे सरकार चालेल अशा भ्रमात सरकार आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न - याप्रसंगी भास्कर जाधव यांनी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आठवण ताजी करून दिली. भास्कर जाधव म्हणाले की, मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा सरकार आम्हाला बोलू देत नव्हते. मला तर सभागृहात अजिबात बोलू दिले नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. या कारणाने मी अधिवेशनाच्या शेवटी काही दिवस सभागृहात आलोच नाही. जर सभागृहात बोलूच दिले जात नसेल तर सभागृहात यायचा उपयोग काय? असा प्रश्नही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. तसेच पुढे भास्कर जाधव म्हणाले की, यंदासुद्धा तीच परिस्थिती उद्भवणार आहे. परंतु, मी पुन्हा येणार नाही व पुन्हा येईन... पुन्हा येईन, असे कधीच म्हटले नाही, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसेच काही लोक लोकशाहीच्या मंदीराला साष्टांग दंडवत घालतात आणि नंतर लोकशाहीची विटंबना करतात. परंतु मी त्यातला नाही, असा टोमणासुद्धा भास्कर जाधव यांनी मारला आहे.

आमच्यावतीने अविश्वास प्रस्ताव - निलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. त्यांच्यावर मागे भाजप आमदार व तत्कालीन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर चर्चा होऊन मतदान व्हावे ही मागणी योग्य नाही. परंतु प्रविण दरेकर यांनी जर प्रस्ताव मागे घेतला असेल तर आमच्यावतीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाईल, असेही भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा -

  1. NCP MLAs Meet Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट; 'हे' आहे भेटीमागचे कारण
  2. NCP Political Crisis: राष्ट्रवादीत हाय होल्टेज ड्रामा; अजित पवारांसह बंडखोर आमदारांची शरद पवारांसोबत चर्चा
  3. Rohit Pawar : विधानसभा विरोधी पक्षनेता निवड; आमदार रोहित पवारांनी केली 'ही' मागणी
Last Updated : Jul 17, 2023, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details