मुंबई -राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांनी ही परिषद घेतली. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या तयारीबाबत अरोरा यांनी यावेळी माध्यमांना माहिती दिली.
दसरा-दिवाळी, विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि सुरक्षा दलांची उपलब्धता यांचा विचार करुनच निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्या जातील. बॅलेट पेपर आता बॅलेट पेपर झाला आहे. ईव्हीएम मशीन हाच पारदर्शक मतदानासाठी उत्कृष्ट पर्याय आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करने शक्य नाही, असे सुनिल अरोरा यांनी सांगितले.