महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एक्झिट पोल : सेना-भाजपला स्पष्ट बहुमत.. महायुतीला १९० ते २३० जागांचा अंदाज, भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष - एक्सिट पोल जाहीर

अंतिम मतदानाच्या टक्केवारीचा आकडा अद्याप हातात आलेला नाही. मात्र, मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपला सर्वाधिका १०९ ते १२३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मतदानोत्तर चाचणींचे कल जाहीर

By

Published : Oct 21, 2019, 7:02 PM IST

Updated : Oct 21, 2019, 8:41 PM IST

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घटली आहे. २०१४ मध्ये ६४ टक्के मतदानाची नोंद झाली होती, तर यावेळी ५ वाजेपर्यंत ५४.५३ टक्के मतदान झाले आहे. अद्याप अंतिम टक्केवारीचा आकडा हातात आलेला नाही. मात्र, मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर झाले आहेत.

इंडिया टुडे/एक्सिस -

भाजप १०९ ते १२४
शिवसेना ५७ ते ७०
काँग्रेस ३२ ते ४०
राष्ट्रवादी काँग्रेस ४० ते ५०
वंचित बहुजन आघाडी ० ते २
इतर २२ ते ३२

टीव्ही ९

भाजप १२३
शिवसेना ७४
काँग्रेस ४०
राष्ट्रवादी ३५
इतर १६

रिपब्लिकन टीव्ही/ जन की बात

भाजप १३५ ते १४२
शिवसेना ८१-८८
काँग्रेस २०-२४
राष्ट्रवादी ३० ते ३५


टाईम्स नाऊ

भाजप १३८
शिवसेना ८४
काँग्रेस २२
राष्ट्रवादी ३३
इतर -११

सीएनएन/ न्यूज-१८

भाजप १४१
शिवसेना १०२
काँग्रेस १७
राष्ट्रवादी २२
इतर ०३

एबीपी-सी वोटर

भाजप १३४
शिवसेना ६०
काँग्रेस ४४
राष्ट्रवादी ४२
इतर ०८

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची अशी होती आकडेवारी

राजकीय पक्ष जिंकलेल्या जागा
भाजप १२२
शिवसेना ६३
काँग्रेस ४२
राष्ट्रवादी ४१
मनसे ०१
Last Updated : Oct 21, 2019, 8:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details