महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केली वॉर रूम; विधानसभा निवडणूक मतमोजणीवर राहणार लक्ष - Maharashtra Exit polls on Assembly

मुंबई येथील बेलॉर्ड पिअर या परिसरातील राष्ट्रवादीच्या  मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसने मागील काही दिवसांपासून टिळक भवन येथे आपली वॉर रूम तयार केली आहे.

संपादित

By

Published : Oct 23, 2019, 9:59 PM IST

मुंबई - राज्यात उद्या निवडणुकीची मतमोजणी आहे. मतमोजणीच्या प्रत्येक क्षणाची माहिती घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून वॉर रुम सुरू करण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांना ११० हून अधिक जागांवर विजय मिळेल, अशा विश्वास आहे.


मुंबई येथील बेलॉर्ड पिअर या परिसरातील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरू करण्यात आली आहे. वॉर रुममधून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवित असलेल्या ११७ मतदारसंघाची माहिती घेतली जाणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मागील काही दिवसांपासून टिळक भवन येथे आपली वॉर रूम तयार केली आहे. काँग्रसकडून राज्यातील प्रत्येक मतदारसंघाची माहिती आणि तक्रारींची दखल घेतली जाणार आहे.

हेही वाचा-MAHA VIDHANSABHA Big Fights : उद्या फैसला.. उमेदवारांचे देव पाण्यात, राज्यातील ५० लक्षवेधी लढती


राष्ट्रवादी काँग्रेसला ५१ हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील कार्यालयात जल्लोष साजरा करण्याची राष्ट्रवादीने तयारी केली आहे. मतमोजणीच्या दिवशी वॉर रुमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते दुपारनंतर उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे आपली बाजू माध्यमांमध्ये भक्कमपणे मांडण्यासाठी राष्ट्रवादीने उद्या तब्बल २४ प्रवक्ते मैदानात उतरविणार आहेत. हे प्रवक्ते राष्ट्रवादीच्या यश आणि अपयशाचे विश्लेषण करणार आहेत. काँग्रेसनेही आपली १५ जणांची फौज मैदानात उतरवली असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

हेही वाचा-भाजपची निकालाआधीच विजयी जल्लोषाची तयारी

ABOUT THE AUTHOR

...view details