महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

APMC Results 2023 : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर; महाविकास आघाडीचा बोलबाला, तर आम्हीच नंबर वनचा भाजपचा दावा - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती आले आहेत. राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. त्याचे निकाल शनिवारी समोर आले आहेत. या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसेच आम्हीच जास्त जागा जिंकल्याचा दावा भाजपनेही केला आहे.

APMC results Live Update
APMC results Live Update

By

Published : Apr 29, 2023, 11:03 AM IST

Updated : Apr 29, 2023, 10:44 PM IST

धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्यातील 148 पैकी 75 बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असून यावरून राज्यातील जनता आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आज राज्यातील बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 8-10 महिन्यांत शेतकर्‍यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने 1 हजार 200 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवाय बाजार समितीची निवडणूक अधिक गुंतागुंतीची करण्याचा प्रयत्नही शिंदे सरकारने केला. त्यामुळे या विरोधात जनमत किती मोठे आहे हे शेतकरी, व्यापाऱ्यांनी सरकारला दाखवून दिले आहे.

थोरातांचा दणदणीत विजय, विखे पाटीलांचा सुपडा साफ

संगमनेर :संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची सत्ता आली आहे. तर भाजपचे नेते, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाला खातेही उघडता आले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने जिंकल्या आहेत. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निकालानंतर कार्यकर्तांयाच जल्लोष

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-सेना-रिपाइंचे वर्चस्व

चाळीसगाव : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाई पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व दिसून येत आहे. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष केला. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचे वर्चस्व कायम राहिले. भाजप शिवसेना पॅनलने 18 पैकी 15 जागा जिंकल्या. आमदार मंगेश चव्हाण यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर केला. यावेळी मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

कर्जतमध्ये मोठी चुसर; रोहित पवार गट, राम शिंदेना समान जागा

कर्जत :अहमदनगरमधील कर्जत बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांना समसमान मते मिळाली आहेत. भाजप आमदार राम शिंदे यांच्या गटाला 9 तर, रोहित पवार यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या आहेत.

अलिबाग बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

रायगड :रायगड जिल्ह्यातील अलिबाग बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आली असून सर्व १८ जागांवर माविआच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. माविआने 7 जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित 11 जागांसाठी निवडणूक झाली. अलिबाग बाजार समितीत शिरकाव करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसला आहे.

भुजबळ समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी

येवला :येवला बाजार समितीवर भुजबळ गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा झेंडा. 18 पैकी 13 जागांवर उमेदवार विजयी झाले, तर दराडे गटाच्या शेतकरी समर्थक पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. उमेदवारांना केवळ तीन जागांवरच शेतकरी समर्थक पॅनेला समाधान मानावे लागले. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले असून भुजबळ समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला.

छत्रपती संभाजीनगर :कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबादचा निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे. औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी भाजपचा गड राखला आहे. भाजपचे 11 तर महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आर एम वाणी यांची सून अनिताताई वाणी विजयी झाल्या. प्रशांत सदाफल विजयी झाले. नजन रजनीकांत, शिवकन्या मधुकर पवार हे इतर विजयी उमेदवार आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती :माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या आपला पॅनलच्या विजयाची घोडदौड सुरू आहे. आपला पॅनलचे विनायक माळेकर, जगन्नाथ काटळे, भास्कर गावित, निर्मला कड विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे आपला पॅनेल आहे. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीची घोडदौड सुरू असल्याचे दिसत आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी गड राखला-अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळेसही विजय मिळवला आहे. त्यांच्या गटांनी 18 शून्य असा दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊनही काहीही उपयोग झाला नाही. हे यश जनतेचे असून, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना याचा फायदा अधिक कसा करता येईल यासाठी प्रयत्न करू, असे शिवाजी कर्डिले म्हणाले.

नागपूर :जिल्ह्यातील कृषीउत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल लागत आहेत.रामटेकमध्ये केदार-जयस्वाल युतीचा मोठा पराभव झाला आहे. सर्व 18 जागांवर ते पराभूत झाले आहेत. सचिन किरपान/ बिनू गुप्ता प्रणित काँग्रेस गट 14 जागी विजयी झाला तर भाजपच्या रेड्डी गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. परशिवणीमध्ये केदार गटाचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर आमदार आशिष जयस्वाल गट पूर्णपणे पराभूत झाला आहे. त्यामुळे फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच कुही-मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही काँग्रसचे 17 उमेदवार विजयी झाले. भाजपला या ठिकाणी केवळ 1 जागा मिळाली आहे.

बीड :जिल्ह्यातीलकेज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जोरदार झाली. केज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंदडा-आडसकर यांच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील ४ पैकी ४ जागा बजरंग बप्पा सोनवणे यांना मिळाल्या. केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत-१८ पैकी १४ जागा घेत मुंदडा-आडसकर गटाचे सर्व वर्चस्व दिसून आले. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. प्रतिष्ठित आंबेजोगाई बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या आंबेजोगाई समितीमध्ये राष्ट्रवादीने 15 जागा मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 18 जागापैकी पंधरा जागेवर राष्ट्रवादी विजय, तर 3 जागावर भाजप विजयी झाले.

अमरावती: सहकार क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. भाजप समर्थीत शेतकरी परिवर्तन पॅनलच्या एकाही उमेदवाराला आपले खाते उघडता आले नाही. एकूण १८ पैकी १८ ही जागांवर काँग्रेस महाविकास आघाडी सहकार पॅनलचे उमेदवार बहुमताने विजयी झाले. अमरावती जिल्ह्यातील एकूण 12 कृषी उत्पन्न बाजार समिती साठी झालेल्या निवडणुकींपैकी पाच कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल स्पष्ट झाले. सहाव्या बाजार समितीचा निकाल देखील दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. एकूणच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे: राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक जणांची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिली गाव पातळीवरील आणि प्रत्यक्षात शेतकरी सहभागी असणारी निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची सध्या चर्चा महाराष्ट्रात सुरू असून पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये सुद्धा ही निवडणूक लागली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक हत्ती सत्ता मिळवली आहे.

अहमदनगर :कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काल ७ ठिकाणी निवडणूक झाली. त्यामध्ये अहमदनगर, राहुरी, संगमनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत बाजार समितीचा समावेश आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल कालच लागला. बाकीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार निलेश लंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार शिवाजीराव कर्डिले आणि खासदार सुजय विखे अशी लढत झाली. पाथर्डीमध्ये आमदार मोनिका राजळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार रोहित पवार विरुद्ध आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगर जिल्ह्यात एकूणच सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली आहे. आता निकाल काय हाती येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माजी मंत्री सुनील केदार गटाचे वर्चस्व कायम - नागपूर जिल्ह्यातील तीनही कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रतिष्ठेच्या रामटेक बाजार समितीच्या निवडणुकीत सुनील केदार-आशिष जयस्वाल युतीचा सुपडा साफ झाला आहे, तर पारशिवनी आणि कुही-मांडळची बाजार समिती आमदार सुनील केदार यांनी कायम राखण्यात यश मिळाले आहे.

नागपूर :जिल्हातील लोकांचे लक्ष रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निकाला कडे लागले होते. कारण इथे काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली होती. सुनील केदार यांना वगळून काँग्रेसचा तिसरा गट तयार झाला. त्या शेतकरी सहकारी पॅनलचे 14 उमेदवार तर भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेस गज्जू यादव यांच्या शेतकरी विकास सहकारी सहकारी पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. रामटेक बाजार समिती निवडणुकीत आमदार सुनील केदार आणि आमदार आशिष जयस्वाल गटाचा धुव्वा झाला आहे. पारशिवनी बाजार समिती निवडणुकीत सुनील केदार गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. पारशिवनी बाजार समिती निवडणूकीत महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. कुही- मांढळ बाजार समितीत देखील 18 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

वैजापूर बाजार समिती भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार रमेश बोरनारे यांची प्रतिष्ठा असलेल्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-शिवसेनेनं आपली सत्ता काबीज केलीय. भाजप-शिवसेना युतीला 11जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे वैजापूर बाजार समितिवर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना स्पष्ट बहुमत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Irrfan still lives in memories : मृत्यूच्या तीन वर्षांनंतरही इरफान आठवणीत जीवंत, सहकाऱ्यांनी सांगतिले किस्से

Last Updated : Apr 29, 2023, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details