महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahaparinirvan Din 2022: महापरिनिर्वाण दिनी 5 लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था - बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Mahaparinirvan Din 2022: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी देखील प्रशासनाने केली असून यावर्षी जवळपास 5 लाख अनुयायी भोजन करतील, याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Mahaparinirvan Din 2022
Mahaparinirvan Din 2022

By

Published : Dec 6, 2022, 11:12 AM IST

मुंबई:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यातूनच नाहीतर देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात देशभरातून अनुयायी 5 डिसेंबर पासूनच चैत्यभूमी येथे जमायला सुरुवात झाली होती.

महापरिनिर्वाण दिनी 5 लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था

5 लाख अनुयायी भोजन करतील: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी देखील प्रशासनाने केली असून यावर्षी जवळपास 5 लाख अनुयायी भोजन करतील, याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून दलित समाजासह सर्वच जाती धर्मातील जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असते. अशावेळी त्या अनुयायांच्या दोन दिवस भोजनाची व्यवस्था व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास प्रशासनाला निर्देश दिले होते.

याची कल्पना राज्य सरकारला होती:अडीच वर्ष राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या देखील कमी होती. मात्र यावेळी सर्व निर्बंध राज्य सरकारकडून हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येतील याची कल्पना राज्य सरकारला होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख अनुयायांना भोजन करता येईल अशी व्यवस्था यावेळी महापरिनिर्वाण दिनी केली असल्याची माहिती शिंदे गटातील आमदार सदा सर्वणकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. 6 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत ही भोजन व्यवस्था अनुयायांसाठी सुरू ठेवणार असल्याचे तरी त्यांनी यावेळी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details