मुंबई :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. देशासह राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलने, निदर्शने करत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाने देखील काँग्रेसच्या या भूमिकेचे स्वागत करत आंदोलन आणि मोर्चातून भाग घेतला होता. नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे वज्रमुठ सभा पार पडली आहे.
भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली :काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या अजून सोळा सभा होणार आहेत. सभांचा झंजावात कायम असताना महाविकासाकडे नेता मुंबई मशाल मोर्चा काढायचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरात पहिली वज्रमुठ सभा झाली. आता मुंबईत येत्या 11 एप्रिलला मशाल मोर्चा काढण्याच्या हालचाली महाविकास आघाडीने सुरू केल्या आहे. वांद्रे पासून चैत्यभूमीपर्यंत हा मोर्चा निघेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत.