मुंबई :गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत तिन्ही पक्षातील जागा वाटप फॉर्मुल्यासंदर्भात वेगवेगळे प्रकारचे वक्तव्य समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी टिकेल का यावरती चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे राज्यातील जनतेमध्येही महाविकास आघाडी संदर्भातील संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधी पक्ष नेते अजित पवार, पाहिजे तर स्टॅम्प घेऊन त्यावर लिहून देतो. तिन्ही पक्षांची शंभर टक्के एकत्र महाविकास आघाडी कायम राहणार आहे, असे म्हणाले आहेत.
नवाब मालिकांचे आरोप : तत्कालीन एनसीपी अधिकारी समीर वानखेडे यांना कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांना 8 जून पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. सीबीआय आर्यन खान प्रकरणी खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बद्दल पत्रकार परिषद वारंवार खुलासे केले होते. त्यावेळी समीर वानखेडे क्लीन इमेज दाखवण्याचा प्रयत्न झाला. आता सीबीआय तपास करत आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे ठरताना दिसत आहे.
अजित पवार आणि केजरीवाल होणार भेट :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सोबत पंजाबचे मुख्यमंत्री, व एक खासदार हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार आणि केजरीवाल यांच्या भेटीच्या वेळी मी उपस्थित राहणार असे पवार म्हणाले आहेत. यावेळी आमचे काही सहकारी देखील असणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
चौकशीला बोलावण्याचा अधिकार :केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणाणा वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिकांना चौकशीला बोलावण्याचा अधिकार असतो. ते देखील सहकार्य करीत असतात. याबाबत जयंत पाटील यांनी देखील पत्रकार परिषदेनंतर सांगितले सहकार्य करतात हे सांगितले. राजकीय सूडबुद्धीने द्वेष भावनेतून कोणालाही चौकशीला बोलवू नये. त्यांना काही वाटलं तर नोटीस पाठवण्याचा अधिकार केंद्रीय एजन्सींना आहे.
जाणीवपूर्वक अर्थ लावण्याचा प्रयत्न :राष्ट्रवादीतील गटबाजीचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले. ईडी चौकशी दरम्यान जयंत पाटील एकटे पडल्याचे बोलले जात आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. आम्ही दिवसापासून सत्तेत आहोत. कोणत्या व्यक्ती बाबत मी स्टेटमेंट केले आहे का? जयंतराव यांना एकटयालाच तिथं बोलावले नाही. यापूर्वी छगन भुजबळ, नवाब मलिक, अनिल देशमुख, प्रफुल पटेल यांनाही बोलावले होते त्यावेळचे माझे स्टेटमेंट दाखवा. माध्यम जाणीवपूर्वक अर्थ लावण्याचा प्रयत्न करताय तुम्ही करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. त्यामुळे मी स्टेटमेंट करत नाही. 22 ठिकाणी धाडी टाकल्या त्यावेळी मी स्टेटमेंट केले आणि कामाला लागलो होतो. दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र यात जनतेची गैरसोय होऊ देऊ नये असे आवाहन पवार यांनी केले आहे.सत्ताधाऱ्यांकडून महागाई, बोरोजगारी विषयचा मुद्दा भरकटवण्यासाठी वेगवेगळे विषय समोर आणले जात आहे असा आरोप विरोधी पक्षानेते अजित पवार यांनी केला आहे.
हेही वाचा -
- UPSC Result 2022 : नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, इशिता किशोरीने पटकावला प्रथम क्रमांक
- Manohar Joshi Admitted : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल ; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात रवाना
- Narendra Modi Live : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींना म्हटले 'बॉस', पहा LIVE